ajit pawar Archives - Dainik Yashwant, Latur https://dailyyashwant.com/tag/ajit-pawar/ Online Portal Wed, 21 Feb 2024 07:42:20 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.4 अजितदादांविरोधात बोलत राहील पण काकींविरोधात बोलणार नाही – रोहित पवार https://dailyyashwant.com/will-continue-to-speak-against-ajit-dada-but-will-not-speak-against-kaki-rohit-pawar/4099/ https://dailyyashwant.com/will-continue-to-speak-against-ajit-dada-but-will-not-speak-against-kaki-rohit-pawar/4099/#respond Wed, 21 Feb 2024 07:42:20 +0000 https://dailyyashwant.com/?p=4099 महायुतीत दाखल झाल्यानंतर अजित पवारांनी बारामती मतदारसंघावर दावा ठोकलाय. नुकत्याच बारामतीमधील सभेत अजित पवार यांनी मी दिलेला उमेदवार निवडून द्या, अशी भावनिक साद दिली. त्यामुळे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार उमेदवार देणार यावर शिक्कमोर्तब झालं. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार  मैदानात उतरणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. नणंद भावजय असा सामना बारामतीमध्ये रंगण्याची शक्यता आहे. […]

The post अजितदादांविरोधात बोलत राहील पण काकींविरोधात बोलणार नाही – रोहित पवार appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
महायुतीत दाखल झाल्यानंतर अजित पवारांनी बारामती मतदारसंघावर दावा ठोकलाय. नुकत्याच बारामतीमधील सभेत अजित पवार यांनी मी दिलेला उमेदवार निवडून द्या, अशी भावनिक साद दिली. त्यामुळे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार उमेदवार देणार यावर शिक्कमोर्तब झालं. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार  मैदानात उतरणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. नणंद भावजय असा सामना बारामतीमध्ये रंगण्याची शक्यता आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातील लढतीबाबत रोहित पवार यांना विचारण्यात आलं. सुनेत्रा काकींविरोधात बोलणार नाही, पण अजितदादांविरोधात बोलत राहील, असे त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.

आंबेगावमध्ये शरद पवार कार्यकर्त्यांन संबोधित करणार आहेत. त्या सभेला रोहित पवारही उपस्थित राहणार आहेत. त्याआधी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं. त्याशिवाय बारामतीमध्ये काकी विरुद्ध आत्या अशी लढत झाली तर सुनेत्रा काकींविरोधात बोलणार नाही, असेही सांगितलं. रोहित पवार म्हणाले की, बारामती लोकसभेत सुनेत्रा काकींविरुद्ध आत्या अशी लढत झालीच. तर आम्ही सुनेत्रा काकींविरोधात बोलणार नाही. कारण त्या आतापर्यंत राजकारणात नव्हत्या. त्यांनी केवळ समाजसेवा केली. त्यामुळं बारामतीत खरी लढत ही सुप्रिया ताई विरुद्ध अजित दादा अशी होणार आहे, म्हणून अजित दादांविरोधात बोलू, असे रोहित पवार म्हणाले.

अजित दादा सध्या कुटुंबात एकटे आहेत, असं चित्र आहे. पण ते सध्या ते स्वतःसाठी आणि मलिदा गॅंग साठी बोलतात, असा टोलाही यावेळी रोहित पवार यांनी लगावला. त्याशिवाय युगेंद्र पवार म्हणत असतील ‘शरद पवार साहेब तसं’, म्हणजे याचं स्वागत करायला हवं. आमच्या सारख्या बच्चाला हे कळतंय, साहेबांना साथ देण्याची गरज आहे, असे म्हणत अजित पवारांना टोला लगावला.

प्रसार माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, “मी पुन्हा येईन नंतर आता अमोल कोल्हे यांना पाडणार असं अजित पवार म्हणतात. आता अमोल कोल्हे यांच्याविरोधात पार्थ पवार ही असू शकतात. मात्र अजित दादांना महायुतीत चार जागा मिळतील, पण त्यात शिरूर लोकसभा मिळायची नाही. ” दरम्यान, महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर अजित पवारांनी पुणे जिल्ह्यातील शुरुर आणि बारामती मतदारसंघावर दावा केला होता, तो दावा आजही कायम आहे. पुढील काही दिवसांत महायुतीमध्ये जागावटपाची बैठक पार पडणार आहे. त्यानंतर कुणाला किती जागा याबाबत समोर येईल.

The post अजितदादांविरोधात बोलत राहील पण काकींविरोधात बोलणार नाही – रोहित पवार appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/will-continue-to-speak-against-ajit-dada-but-will-not-speak-against-kaki-rohit-pawar/4099/feed/ 0
अजितदादा आणि अशोक चव्हाण यांची गुप्त बैठक, तिथेच सगळं ठरलं? लवांडे यांचा दावा https://dailyyashwant.com/ajitdada-and-ashok-chavans-secret-meeting-everything-was-decided-there/4006/ https://dailyyashwant.com/ajitdada-and-ashok-chavans-secret-meeting-everything-was-decided-there/4006/#respond Mon, 12 Feb 2024 16:31:46 +0000 https://dailyyashwant.com/?p=4006 राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात भूकंप झालाय. भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, असे त्यांनी थेटपणे सांगितले नसले तरी त्यांनी तसे उघड उघड संकेत दिले आहेत. राजीनाम्याची गोष्ट कधीपासून तुमच्या डोक्यात सुरू होती, असा प्रश्न ज्यावेळी पत्रकारांनी विचारला त्यावेळी सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात, असं म्हणून […]

The post अजितदादा आणि अशोक चव्हाण यांची गुप्त बैठक, तिथेच सगळं ठरलं? लवांडे यांचा दावा appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात भूकंप झालाय. भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, असे त्यांनी थेटपणे सांगितले नसले तरी त्यांनी तसे उघड उघड संकेत दिले आहेत. राजीनाम्याची गोष्ट कधीपासून तुमच्या डोक्यात सुरू होती, असा प्रश्न ज्यावेळी पत्रकारांनी विचारला त्यावेळी सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात, असं म्हणून त्यांनी यावर अधिकचं बोलणं टाळलं. परंतु शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांनी अशोक चव्हाण यांच्याविषयी धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. राजीनाम्याची बिजं कधीपासून पेरली गेली, हेच सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

आज माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाचा व विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. याबाबत त्यांची अजित पवार यांच्या सोबत दि. २७ की २८ जून २०२३ रोजी मुंबईत देवगिरी या शासकीय बंगल्यावर गुप्त बैठक झाली होती. देवगिरीवर त्याच दिवशी अजितदादांनी मला बोलावून घेतले होते. दादांची माझी राजकीय सद्यस्थिती बाबत चर्चा चालू असताना अशोक चव्हाण तिथे आल्यावर मग दादांनी मला आपण नंतर चर्चा करू असे सांगितले व मी तिथून बाहेर पडलो.

त्यानंतर त्यांची दोघांची बराच वेळ बंद दाराआड चर्चा झाली होती. अजितदादा आणि अशोक चव्हाण यांचा निर्णय तेव्हाच झालेला होता. त्यानंतर लगेच दि. २ जुलै २०२३ रोजी अजितदादा मित्र मंडळ राज्य सरकार मध्ये सामील झाले. आता अशोक चव्हाण काँग्रेस मधून बाहेर पडले हे पूर्वनियोजित होते. मला त्यात धक्कादायक काहीच वाटत नाही.

ते भाजपा किंवा कदाचित अजितदादा गटात सुध्दा जातील कारण अजितदादा मित्र मंडळ आणि अशोक चव्हाण हे ईडी ग्रस्त असल्याने समदुःखी आहेत. जेल मध्ये जाण्यापेक्षा भाजपा सोबत गेलेले बरे .असे सद्या देशभर वातावरण आहे. साम दाम दंड भेद या भाजपच्या राजनीतीचे देशाला दररोज दर्शन होत आहे. सत्तेचा दुरुपयोग कसा करायचा हे भाजपाने जगाला दाखवून दिले आहे. आपली संसदीय लोकशाही आणि भारतीय संविधान धोक्यात आहे हे नक्की !

The post अजितदादा आणि अशोक चव्हाण यांची गुप्त बैठक, तिथेच सगळं ठरलं? लवांडे यांचा दावा appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/ajitdada-and-ashok-chavans-secret-meeting-everything-was-decided-there/4006/feed/ 0
अजित पवार थेट अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात https://dailyyashwant.com/ajit-pawar-directly-in-amol-kolhens-constituency/3399/ https://dailyyashwant.com/ajit-pawar-directly-in-amol-kolhens-constituency/3399/#respond Tue, 26 Dec 2023 03:27:15 +0000 https://dailyyashwant.com/?p=3399 पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. पण, अजित पवारांचा पुणे दौरा सध्या चर्चेचा विषय ठरलाय, तो म्हणजे त्यांनी खासदार अमोल कोल्हेंना  दिलेल्या आव्हानामुळे. काल पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवारांनी अमोल कोल्हेंविरोधात थेट दंड थोपटले आणि एकेकाळी अमोल कोल्हेंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, पण यावेळी पाडणार म्हणजे पाडणारच, असं म्हणत अमोल कोल्हेंना थेट […]

The post अजित पवार थेट अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. पण, अजित पवारांचा पुणे दौरा सध्या चर्चेचा विषय ठरलाय, तो म्हणजे त्यांनी खासदार अमोल कोल्हेंना  दिलेल्या आव्हानामुळे. काल पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवारांनी अमोल कोल्हेंविरोधात थेट दंड थोपटले आणि एकेकाळी अमोल कोल्हेंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, पण यावेळी पाडणार म्हणजे पाडणारच, असं म्हणत अमोल कोल्हेंना थेट आव्हानच दिलं. काल अजित दादांनी आव्हान दिलं आणि आज सकाळीच अजित दादा अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात पाहणी करण्यासाठी पोहोचले. महत्त्वाचं म्हणजे, अजित पवारांना याबाबत विचारणाही झाली. पण त्यावेळी मात्र ते म्हणाले की, अमोल कोल्हेंना दिलेल्या आव्हानाचा आणि दौऱ्याचा संबंध नाही, हा दौरा पूर्वनियोजित होता.

शिरुर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हेंचा पराभव करणारच असं ओपन चॅलेंज अजित पवारांनी दिलं आणि आज त्यांनी अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात पाहणी दौरा केला. अजित पवारांनी पुण्यातील हडपसरमध्ये माजंरी पुलाची पाहणी केली. आपला हा दौरा पूर्वनियोजित होता. अमोल कोल्हेंना दिलेल्या आव्हानाचा आणि दौऱ्याचा संबंध नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी अजित पवारांनी दिली. तसेच, अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया आली असेल तर त्यांना लखलाभ, मी काल जे सांगितलं तेच फायनल आहे, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

The post अजित पवार थेट अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/ajit-pawar-directly-in-amol-kolhens-constituency/3399/feed/ 0
देवेंद्र फडणवीसांच्या लेटरबॉम्बमुळे अजित पवार गट नाराज https://dailyyashwant.com/ajit-pawar-faction-upset-over-devendra-fadnavis-letter-bomb/3030/ https://dailyyashwant.com/ajit-pawar-faction-upset-over-devendra-fadnavis-letter-bomb/3030/#respond Fri, 08 Dec 2023 06:21:42 +0000 https://dailyyashwant.com/?p=3030 नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशानातील एंट्री चांगलीच गाजली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ते थेट सत्तापक्षाच्या बाकांवर विराजमान झालेत. त्यावर विरोधकांनी केलेल्या टीकेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महायुतीत तुर्तास घेऊ नये, असे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहीले. या संपूर्ण घटनाक्रमावर मलिक यांनी मौन बाळगले असले तरी युतीतील नेते सध्या बॅकफूटवर आल्याचे […]

The post देवेंद्र फडणवीसांच्या लेटरबॉम्बमुळे अजित पवार गट नाराज appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशानातील एंट्री चांगलीच गाजली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ते थेट सत्तापक्षाच्या बाकांवर विराजमान झालेत. त्यावर विरोधकांनी केलेल्या टीकेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महायुतीत तुर्तास घेऊ नये, असे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहीले. या संपूर्ण घटनाक्रमावर मलिक यांनी मौन बाळगले असले तरी युतीतील नेते सध्या बॅकफूटवर आल्याचे चित्र आहे.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मलिक यांची अधिवेशनातील एंट्रीने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटामध्ये चैतन्य संचारले होते. विधानसभेत ते सत्तापक्षाच्या बाकांवर बसलेत. त्यामुळे अजितदादांनी ही लढाई जिंकल्याचा विजयीभाव त्यांच्या गटात दिसून आला. नवाब मलिक तेव्हादेखील मौन होते. पहिल्या दिवशी त्यांनी कुठल्याही गटात नाही तर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले. पण, सत्तापक्षाच्या बाकावर बसून त्यांनी स्वत:च्या कृतीतून त्यांची बाजू स्पष्ट केल्याचे चित्र होते. त्यावर विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत ‘देशद्रोहाचे आरोप असलेल्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार का,’ असा सवाल केला होता. या संपूर्ण घटनाक्रमानंतर सायंकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राने राजकीय भूंकप झाला. त्या पत्राचे पडसाद राष्ट्रवादीच्या अजित पवार गटावर पडल्याचे शुक्रवारी दिसून आले. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील म्हणाले,‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पत्र जाहीर झाले नसते तर बरे झाले असते. मित्रपक्ष म्हणून यासंदर्भात चर्चा करायला पाहिजे होती. आमचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केल्यामुळे युतीत मिठाचा खडा पडला, असे म्हणण्याचे काहीही कारण नाही.’

आमदार नवाब मलिक यांना कुठे बसू द्यावे, हा विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे. त्यावर मी बोलणे योग्य नाही. काल नवाब मलिक वैद्यकीय जामीनावर सुटल्यानंतर पहिल्यांदाच यंदाच्या हिवाळी अधिवेशनात आलेत. त्यानंतर ते सहकाऱ्यांशी भेटलेत. मात्र, ते कुठल्या गटात आहेत, याबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर मी यावर भाष्य करेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेत.

फडणवीसांच्या लेटरबॉम्बवर बोचरी टीका करताना काँग्रसेचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले,‘भाजप सत्तेसाठी कुठल्याही थराला जाण्यास तयार आहे; हे या पत्रावरून स्पष्ट होते.’ त्यांनी खासगीत पत्र लिहीणे शक्य होते, ते जाहीर करण्याची गरज नव्हती, असेदेखील ते म्हणाले.

The post देवेंद्र फडणवीसांच्या लेटरबॉम्बमुळे अजित पवार गट नाराज appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/ajit-pawar-faction-upset-over-devendra-fadnavis-letter-bomb/3030/feed/ 0
नवाब मलिक कोणत्या गटात मला माहिती नाही; अजित पवारांचं स्पष्टीकरण https://dailyyashwant.com/nawab-malik-in-which-group-i-do-not-know-explanation-of-ajit-pawar/3027/ https://dailyyashwant.com/nawab-malik-in-which-group-i-do-not-know-explanation-of-ajit-pawar/3027/#respond Fri, 08 Dec 2023 06:15:48 +0000 https://dailyyashwant.com/?p=3027 नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमच्या गटाने महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला, त्याबाबत नवाब मलिक यांना कोणतीही माहिती नव्हती. हिवाळी अधिवेशनाच्यानिमित्ताने ते पहिल्यांदाच सभागृहात आले होते. मात्र, ते कोणत्या गटासोबत आहेत, याबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर मी या सगळ्यावर प्रतिक्रिया देईन, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]

The post नवाब मलिक कोणत्या गटात मला माहिती नाही; अजित पवारांचं स्पष्टीकरण appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमच्या गटाने महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला, त्याबाबत नवाब मलिक यांना कोणतीही माहिती नव्हती. हिवाळी अधिवेशनाच्यानिमित्ताने ते पहिल्यांदाच सभागृहात आले होते. मात्र, ते कोणत्या गटासोबत आहेत, याबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर मी या सगळ्यावर प्रतिक्रिया देईन, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना गुरुवारी रोखठोक भाषेत पत्र धाडून नवाब मलिक यांच्या सत्ताधारी गटातील समावेशाला विरोध दर्शविला होता. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची आजची प्रतिक्रिया सूचक आणि अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. अजितदादांच्या एकूण बोलण्याचा रोख पाहता आगामी काळात अजित पवार गटाकडून नवाब मलिक यांना अंतर दिले जाण्याची शक्यता आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यासंदर्भात लिहेलेल पत्र मला मिळाले, ते मी वाचलं. नवाब मलिक हे काल पहिल्यांदाच सभागृहात आले होते. ते सभागृहात कुठे बसले, याबाबत मीडियाने माहिती दिली. पण आम्ही महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर नवाब मलिक हे पहिल्यांदाच सभागृहात आले होते. त्यांची भूमिका काय आहे, हे ऐकल्यानंतरच मी त्यांच्याबद्दल माझं मत देईन. नबाव मलिक यांना न्यायालयाने वैद्यकीय कारणामुळे बाहेर येण्याची संधी दिली आहे. त्यांच्यावरील केस अजून सुरु आहे. सभागृहात कोणी कुठे बसायचे, हा माझा अधिकार नाही. तो निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतात. नवाब मलिक कोणासोबत आहेत, हे अद्याप त्यांनी स्पष्ट केलेले नाही. त्यांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतरच मी बोलेन. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राबाबत काय करायचं ते मी करेन. त्याबाबत मीडियाला सांगण्याचं काही कारण नाही, असे अजित पवार यांनी म्हटले. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवार यांच्यावर एकापाठोपाठ एक प्रश्नांची सरबत्ती केली. त्यामुळे अजित पवार चांगलेच वैतागल्याचे दिसत होते.

जमीन गैरव्यवहारप्रकरणात ईडी कोठडीत तुरुंगवास भोगलेल्या आणि भाजपकडून देशद्रोहाचे आरोप झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चांगलीच कोंडी झाली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गुरुवारी नवाब मलिक हे सभागृहात बसले होते. यावेळी ते सत्ताधाऱ्यांच्या रांगेत शेवटच्या बाकावर बसले होते. इतके दिवस भाजपने देशद्रोहाचे आरोप केलेले नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या रांगेत बसल्याने अनेकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले होते. या सगळ्या घटनाक्रमानंतर देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी संध्याकाळी अजित पवार यांना एक पत्र लिहले. योगायोगाने हे पत्र प्रसारमाध्यमांच्या हाती लागले. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांना सोबत घेण्यास स्पष्ट विरोध केला होता. यानंतर अजित पवार काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या.

The post नवाब मलिक कोणत्या गटात मला माहिती नाही; अजित पवारांचं स्पष्टीकरण appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/nawab-malik-in-which-group-i-do-not-know-explanation-of-ajit-pawar/3027/feed/ 0