Uncategorized Archives - Dainik Yashwant, Latur https://dailyyashwant.com/category/uncategorized/ Online Portal Sun, 10 Mar 2024 13:47:20 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.4 शासन आपल्या दारी उपक्रमात मुख्यमंत्र्यांचा सरकारी योजनांवर भर https://dailyyashwant.com/the-chief-ministers-emphasis-on-government-schemes-in-his-dari-activities/4253/ https://dailyyashwant.com/the-chief-ministers-emphasis-on-government-schemes-in-his-dari-activities/4253/#respond Sun, 10 Mar 2024 13:47:20 +0000 https://dailyyashwant.com/?p=4253 हिंगोली – प्रतिनिधी शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी हिंगोली येथील रामलीला मैदानावर रविवारी दहा मार्च रोजी तीन वाजेच्या सुमारास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यासपीठावर आले असता मी तुमचे दर्शन घेण्यासाठी आलो असे म्हणून शिंदे सरकारने राबविण्यात येणाऱ्या सरकारी योजनांचा त्यांनी नागरिकासमोर पाढा वाचल्याने नागरिक ही कंटाळले होते.यावेळी या कार्यक्रमाला मात्र दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पाठ फिरविल्याने भाजप […]

The post शासन आपल्या दारी उपक्रमात मुख्यमंत्र्यांचा सरकारी योजनांवर भर appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
हिंगोली – प्रतिनिधी

शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी हिंगोली येथील रामलीला मैदानावर रविवारी दहा मार्च रोजी तीन वाजेच्या सुमारास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यासपीठावर आले असता मी तुमचे दर्शन घेण्यासाठी आलो असे म्हणून शिंदे सरकारने राबविण्यात येणाऱ्या सरकारी योजनांचा त्यांनी नागरिकासमोर पाढा वाचल्याने नागरिक ही कंटाळले होते.यावेळी या कार्यक्रमाला मात्र दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पाठ फिरविल्याने भाजप व राष्ट्रवादीच्या पदाधिकारी ,कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.

येथील रामलीला मैदानावर रविवारी दुपारी तीन वाजता शासन आपल्या दारी उपक्रमाची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री अब्दुल सत्तार ,खासदार हेमंत पाटील, माजी खासदार शिवाजी माने, आमदार संतोष बांगर ,तानाजी मुटकुळे, राजू नवघरे , माजी आमदार गजानन घुगे, राजश्री पाटील, विभागीय आयुक्त मधुकर राजे अरदड, जिल्हाधिकारी पापळकर , निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे ,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त सीईओ अनुप शेंगुलवार आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना शिंदे म्हणाले , हे डबल इंजिन सरकार असून दोन वर्षात वेगाने विकास करत आहे. मुंबईची वारी कमी वेळात करण्यासाठी जनशताब्दी रेल्वे सुरू केली त्यामुळे माता, भगिनींना कामासाठी चकरा माराव्या लागत होत्या त्या आता कमी झाल्या असल्याचे त्यांनी स्पस्ट केले.

शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी शासन आपल्या दारी उपक्रमातून आतापर्यंत २२ कार्यक्रम झाले. यामध्ये ५ कोटी ६५ हजार लोकांना लाभ मिळाल्याचे त्यांनी सांगून ,या योजनेत रेशन कार्ड, मतदान नोंदणी, पंतप्रधान मातृ वंदना , कुटुंब योजना ,लेक लाडकी, कन्या समृद्धी योजना ,जमीन भूमापन ,घरकुल , सर्व योजना एका छताखाली सुरू केल्या असल्याचे सांगताच भर सभेत शिव सैनिकाकडून घोषणाबाजी सुरू होती.

दरम्यान, माझी शाळा मुख्यमंत्री उपक्रमात राज्यातील दोन कोटी शाळांनी सहभाग घेतला असून या योजनेची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्याचे त्यांनी स्पस्ट केले. असं सांगून लिगो प्रकल्पासाठी २६०० कोटीच्या निधीची तरतूद केल्याने जगात हा प्रकल्प प्रसिद्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्या मुळे बाळासाहेब हळद संशोधन केंद्रासाठी १०० कोटी रुपयांचा निधी दिला. त्यामुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना सोयीचे होणार आहे. यावेळी शिंदे यांनी त्याच त्याच योजनांची माहिती देऊन प्रातिनिधिक स्वरूपात दोन शेतकऱ्यांचा सत्कार केला. या सरकार मध्ये भाजप व अजित पवार गटाचे प्रतिनिधी असताना मुख्यमंत्री शिंदे यांनी हा कार्यक्रम हायजॅक करून आपलीच पोळी भाजण्याचा प्रयत्न केला.

जिल्हा प्रशासनाचे नियोजन ढासळले..

पत्रकारांना बसण्यासाठी जागा अपुरी पडली तर व्हीआयपी कक्षात कोण कुठे बसते याचे नियोजन नसल्याने पुरता गोंधळ उडाला होता.

स्टेजवर बाया नाचविल्या

शासन आपल्या दारी उपक्रमात नागरिकांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी लावणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात विविध गाण्यावर बाया थिरकल्या असून जमलेल्या नागरिकांची करमणूक करण्यात आली. परंतु जिल्हा प्रशासनाचे लाखो रुपयांचा चुराडा झाला असून याकडे कोणी फिरकले देखील नाही.

नागरिकांना भांड्याचे आमिष दाखविले

शासन आपल्या दारी कार्यक्रमात यावेच लागते तेंव्हा तुम्हाला बांध कामगार कार्यलयाकडून भाड्याची किट देतो म्हणून कार्यक्रमाला आणले असल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले.

गावोगावी बसेस रिकाम्या फिरल्या

या कार्यक्रमासाठी जिल्ह्यात ३०० बसेस नागरिकांसाठी पाठविण्यात आल्या होत्या, परंतु मराठा आरक्षण संदर्भात मराठा समाजाच्या काही युवकांनी बसेस वरील पोस्टर फाडून रिकाम्याच पाठविल्याने लाखो रुपये पाण्यात गेले.

The post शासन आपल्या दारी उपक्रमात मुख्यमंत्र्यांचा सरकारी योजनांवर भर appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/the-chief-ministers-emphasis-on-government-schemes-in-his-dari-activities/4253/feed/ 0
रवींद्र वायकर अखेर शिंदेंच्या शिवसेनेत जाणार https://dailyyashwant.com/ravindra-waikar-will-eventually-join-shindes-shiv-sena/4242/ https://dailyyashwant.com/ravindra-waikar-will-eventually-join-shindes-shiv-sena/4242/#respond Sun, 10 Mar 2024 12:17:26 +0000 https://dailyyashwant.com/?p=4242 मुंबई : सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडी चौकशीचं शुक्लकाष्ठ मागे लागलेले ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. रवींद्र वायकर मुंबईतील जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. जोगेश्वरीतील आरक्षित जागेवर परवानगी न घेता रवींद्र वायकर यांनी अवैधरित्या बांधकाम करून हॉटेल उभारल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर […]

The post रवींद्र वायकर अखेर शिंदेंच्या शिवसेनेत जाणार appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
मुंबई : सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडी चौकशीचं शुक्लकाष्ठ मागे लागलेले ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. रवींद्र वायकर मुंबईतील जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. जोगेश्वरीतील आरक्षित जागेवर परवानगी न घेता रवींद्र वायकर यांनी अवैधरित्या बांधकाम करून हॉटेल उभारल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वायकर यांचा शिंदे गटातील प्रवेश हा ठाकरेंसाठी धक्का असेल. पक्ष बदलण्यासाठी रवींद्र वायकर यांच्यावर प्रचंड दबाव असल्याचा दावाही ठाकरे गटाने गेल्या काही दिवसांत वारंवार केला.

मुंबई महापालिकेच्या मैदानासाठीचा आठ हजार चौरस मीटरच्या राखीव भूखंडावर फसवणुकीने पंचतारांकित हॉटेल उभारणी आणि मनी लॉंडरिंगप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांची सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून चौकशी सुरू आहे. ईडीच्या निशाण्यावर असलेले तरीही उद्धव ठाकरे यांना साथ देणारे आमदार वायकर यांच्या पक्षबदलाच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून सुरूवात झाली होती. ना जेलमध्ये जायचं ना शिंदे गटात, अशी वायकर यांची द्विधा मनस्थिती झालेली होती. तशा भावना त्यांनी काही पदाधिकाऱ्यांकडे व्यक्त केल्या होत्या. मात्र दरम्यानच्या काळात त्यांच्या मनाने शिवसेना शिंदे गटाच्या बाजूले कौल दिल्याने आज सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्षा निवासस्थानी त्यांचा अधिकृत प्रवेश पार पडेल, अशी माहिती आहे.

फसवणुकीने पंचतारांकित हॉटेल उभारणी प्रकरणात रवींद्र वायकर यांना अटकेची भीती होती. मी कोणताही गैरव्यवहार केला नाहीये परंतु तरीही राजकीय आकसापोटी माझ्या मागे चौकशीचं शुक्लकाष्ट लागलेले आहे, अशा भावना त्यांनी त्यांच्या निकटवर्तीयांकडे बोलून दाखवल्या होत्या. पण लोकसभेआधी हा पक्षप्रवेश होणे सत्ताधाऱ्यांसाठी महत्त्वाचे असल्याने अखेर आज सायंकाळी त्यांच्या शिवसेना शिंदे गटाच्या प्रवेशाचा मुहूर्त ठरलेला आहे.

The post रवींद्र वायकर अखेर शिंदेंच्या शिवसेनेत जाणार appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/ravindra-waikar-will-eventually-join-shindes-shiv-sena/4242/feed/ 0
रायगडावर ‘तुतारी’चे नाद घुमले, शरद पवार गटाच्या चिन्हाचं अनावरण https://dailyyashwant.com/the-sound-of-tutari-sounded-at-raigad-the-unveiling-of-the-symbol-of-sharad-pawar-group/4117/ https://dailyyashwant.com/the-sound-of-tutari-sounded-at-raigad-the-unveiling-of-the-symbol-of-sharad-pawar-group/4117/#respond Sat, 24 Feb 2024 05:26:47 +0000 https://dailyyashwant.com/?p=4117 राष्ट्रवादी काँग्रेस  शरद पवार  पक्षाच्या तुतारी चिन्हाचं अनावरण करण्यात आलं आहे.  तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह तळागाळात पोहोचवण्यासाठी रायगड किल्ल्यावर भव्य कार्यक्रम झाला.   छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं तुतारी चिन्हाचं स्वागत केलं.  या कार्यक्रमाला शरद पवार स्वतः उपस्थित होते. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड,  अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी तुतारी […]

The post रायगडावर ‘तुतारी’चे नाद घुमले, शरद पवार गटाच्या चिन्हाचं अनावरण appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
राष्ट्रवादी काँग्रेस  शरद पवार  पक्षाच्या तुतारी चिन्हाचं अनावरण करण्यात आलं आहे.  तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह तळागाळात पोहोचवण्यासाठी रायगड किल्ल्यावर भव्य कार्यक्रम झाला.   छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं तुतारी चिन्हाचं स्वागत केलं.  या कार्यक्रमाला शरद पवार स्वतः उपस्थित होते. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड,  अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी तुतारी वाजवून आगामी निवडणुकींचं रणशिंग फुंकलं. चिन्ह अनावराच्या निमित्ताने शरद पवार तब्बल 40 वर्षानंतर रायगडवार गेले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस’ चिन्ह बहाल करण्यात आले आहे.  आज रायगडावर भव्य कार्यक्रम पार पडला. ‘तुतारी’ चिन्हांचं लॉन्चिंग  या वेळी करण्यात आले.  केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ पक्षाला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे पक्षचिन्ह बहाल केले आहे. न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत शरद पवार गटाकडे हे चिन्ह असणार आहे.

The post रायगडावर ‘तुतारी’चे नाद घुमले, शरद पवार गटाच्या चिन्हाचं अनावरण appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/the-sound-of-tutari-sounded-at-raigad-the-unveiling-of-the-symbol-of-sharad-pawar-group/4117/feed/ 0
भ्रष्टाचाराचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा, हा नारा अशोक चव्हाणांनी दिला; संजय राऊतांचा बोचरा वार https://dailyyashwant.com/ashok-chavan-gave-this-slogan-that-bjp-is-better-than-jail-for-the-single-slogan-of-corruption/4003/ https://dailyyashwant.com/ashok-chavan-gave-this-slogan-that-bjp-is-better-than-jail-for-the-single-slogan-of-corruption/4003/#respond Mon, 12 Feb 2024 16:22:21 +0000 https://dailyyashwant.com/?p=4003 आता नवा नारा आला आहे,  भ्रष्टाचाराचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा.  हा नारा अशोक चव्हाण यांनी दिला, अशी सडकडून टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. शिवसेना ठाकरे गटाची जनसंवाद यात्रा छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचली. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी अशोक चव्हाणांचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी अब्दुल सत्तार यांचाही खोचक शब्दात समाचार घेतला. राऊत पुढे  म्हणाले […]

The post भ्रष्टाचाराचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा, हा नारा अशोक चव्हाणांनी दिला; संजय राऊतांचा बोचरा वार appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
आता नवा नारा आला आहे,  भ्रष्टाचाराचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा.  हा नारा अशोक चव्हाण यांनी दिला, अशी सडकडून टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. शिवसेना ठाकरे गटाची जनसंवाद यात्रा छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचली. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी अशोक चव्हाणांचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी अब्दुल सत्तार यांचाही खोचक शब्दात समाचार घेतला.

राऊत पुढे  म्हणाले की, भारतीय जनता पार्टीला विस्मरणाचा रोग झाला आधी काय बोललो होतो ते त्यांना आठवत नाही. दोन-तीन वर्षांपूर्वी मोदींनी नांदेडमध्ये जाऊन अशोक चव्हाणांविरोधात भाषण केलं होतं. अशोक चव्हाण किती भ्रष्टाचारी आहे ते सांगितलं होतं. संजय राऊत यांनी त्याच भाषणाची क्लीप व्यासपीठावर ऐकवली. देवेंद्र फडणवीस यांनी देखील जे बोलले होते त्याची क्लिपही ऐकवली.

अब्दुल सत्तार नावाचा चोर जेलमध्ये असेल

संजय राऊत यांनी अब्दुल सत्तार यांच्यावरही तोफ डागली. अब्दुल सत्तार नावाचा चोर पुढील चार महिन्यात जेलमध्ये असेल. आपलं सरकार येईल आणि किमान 12 महिने जेलमध्ये असेल, असा इशारा राऊत यांनी दिला.

तत्पूर्वी, बोलताना माजी मंत्री चंद्रकांत खैरे यांनी सुद्धा चंद्रकांत खैरे यांच्यावर तोफ डागली. खैरे यांनी सत्तार यांच्या विरोधात ईडीकडे 17 हजार पानांचा पुरावा दिला होता तो गठ्ठा दाखवला. ईडीवर यावर कोणती कारवाई करणार आहे का? असा सवाल त्यांनी केला. भुमरे मला म्हणतात की मी काम केलं नाही. मी मंदिर उभा केलं, पण दारूची दुकाने उघडली नाही, अशी टीका करताना खैरे यांनी भूमऱ्या असा उल्लेख केला. पोलिस पालकमंत्री यांचं ऐकत असेल, तर आम्हाला कोर्टात जावं लागेल असा इशाराही त्यांनी दिला.

The post भ्रष्टाचाराचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा, हा नारा अशोक चव्हाणांनी दिला; संजय राऊतांचा बोचरा वार appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/ashok-chavan-gave-this-slogan-that-bjp-is-better-than-jail-for-the-single-slogan-of-corruption/4003/feed/ 0
सोलापूर विद्यापीठातील अजब प्रकार; 50 गुणांच्या परीक्षेत दिले 99 गुण https://dailyyashwant.com/solapur-university-awarded-99-marks-in-50-marks-exam/3853/ https://dailyyashwant.com/solapur-university-awarded-99-marks-in-50-marks-exam/3853/#respond Wed, 07 Feb 2024 06:21:05 +0000 https://dailyyashwant.com/?p=3853 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा  परीक्षा निकालांचा  भोंगळ कारभार समोर आला आहे. विद्यार्थ्यांना 50 पैकी 99 गुण दिल्याने विद्यार्थीही चक्रावले. बीएससी सेमिस्टर तीनच्या निकालातील प्रकार हा प्रकार समोर आला आहे. 50 गुणांच्या परीक्षेत 99 गुण काही विद्यार्थ्यांना 50 गुणांच्या परीक्षेत एका विषयाला 50 हून अधिक गुण दिले गेले. सोलापूर विद्यापीठाकडून 13 डिसेंबर 2023 पासून 22 […]

The post सोलापूर विद्यापीठातील अजब प्रकार; 50 गुणांच्या परीक्षेत दिले 99 गुण appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा  परीक्षा निकालांचा  भोंगळ कारभार समोर आला आहे. विद्यार्थ्यांना 50 पैकी 99 गुण दिल्याने विद्यार्थीही चक्रावले. बीएससी सेमिस्टर तीनच्या निकालातील प्रकार हा प्रकार समोर आला आहे.

50 गुणांच्या परीक्षेत 99 गुण

काही विद्यार्थ्यांना 50 गुणांच्या परीक्षेत एका विषयाला 50 हून अधिक गुण दिले गेले. सोलापूर विद्यापीठाकडून 13 डिसेंबर 2023 पासून 22 डिसेंबरपर्यंत बीएससी सेमिस्टर 3 च्या परीक्षा पार पडल्या. याचा निकाल समोर येताच सर्वजण चकीत झाले. या निकालामध्ये विद्यापीठाने 40 गुणांचा लेखी पेपर तर 10 गुणांची असाइनमेंट अशी एकूण 50 गुणांची परीक्षा घेतली होती.

सोलापूर विद्यापीठाचा अजब कारभार

दरम्यान, या परीक्षेचा 5 फेब्रुवारीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, या निकालात झालेल्या चुकामुळे विद्यार्थी चांगलेच चक्रवले आहेत. क्लेरीकल चुकीमुळे हे घडल्याचं समोर आलं आहे. चूक लक्षात येताच विद्यार्थ्यांना गुणपत्रिका बदलून दिल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे. दरम्यान, क्लेरीकल चुकीमुळे केवळ चार विद्यार्थ्यांच्या बाबतीत असा प्रकार घडल्याची विद्यापीठ प्रशासनाने दिली कबुली आहे.

The post सोलापूर विद्यापीठातील अजब प्रकार; 50 गुणांच्या परीक्षेत दिले 99 गुण appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/solapur-university-awarded-99-marks-in-50-marks-exam/3853/feed/ 0
जयंत पाटील निवडून आलेले नव्हे निवड झालेले प्रदेशाध्यक्ष, अजित पवार गटाचा युक्तिवाद; आमदार अपात्रता प्रकरणावरुन घमासान https://dailyyashwant.com/argument-of-jayant-patil-not-elected-state-president-ajit-pawar-group-ghamasan-over-mla-disqualification-case/3745/ https://dailyyashwant.com/argument-of-jayant-patil-not-elected-state-president-ajit-pawar-group-ghamasan-over-mla-disqualification-case/3745/#respond Wed, 24 Jan 2024 08:42:20 +0000 https://dailyyashwant.com/?p=3745 मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर  यांच्यासमोर राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची  सुनावणी सुरु आहे. अध्यक्षांसमोर जयंत पाटलांची   उलट साक्ष घेतली जातेय. यादरम्यान जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरील निवडीवर अजित पवार गटाच्या वकिलांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले. जयंत पाटील हे निवडून आलेले नव्हे तर निवड झालेले प्रदेशाध्यक्ष असल्याचा आरोप अजित पवार गटाच्या वकिलांनी केला. तर मी निवडून आलोय, प्रदेशाध्यक्ष […]

The post जयंत पाटील निवडून आलेले नव्हे निवड झालेले प्रदेशाध्यक्ष, अजित पवार गटाचा युक्तिवाद; आमदार अपात्रता प्रकरणावरुन घमासान appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर  यांच्यासमोर राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची  सुनावणी सुरु आहे. अध्यक्षांसमोर जयंत पाटलांची   उलट साक्ष घेतली जातेय. यादरम्यान जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरील निवडीवर अजित पवार गटाच्या वकिलांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले. जयंत पाटील हे निवडून आलेले नव्हे तर निवड झालेले प्रदेशाध्यक्ष असल्याचा आरोप अजित पवार गटाच्या वकिलांनी केला. तर मी निवडून आलोय, प्रदेशाध्यक्ष पदावर निवड झाल्याचं पत्र प्रफुल पटेल यांनी पाठवलं, असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर झालेल्या सुनावणाीत जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरील निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. अजित पवार गटाच्या वकिलांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष पदावर जयंत पाटील यांची निवड तीन वर्षांसाठी करण्यात आली आहे. 2022  सालीच जयंत पाटील यांचा कार्यकाळ संपला  होता. अजित पवार गटाचे वकिलांकडून मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

मला प्रदेशाध्यक्ष पदावर निवड झाल्याचे पत्र प्रफुल्ल पटेल यांनी पाठवले  

जयंत पाटील यांनी बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. सुमारे तीन वर्षांसाठी निवड असल्याने कार्यकाळ संपत नाही. पुढील निवडीपर्यंत किंवा निवडणूक होईपर्यंत कार्यकाळ सुरु राहतोय. जयंत हे निवडून आलेले नव्हे तर निवड झालेले प्रदेशाध्यक्ष असा आरोप अजित पवार गटाच्या वकिलांचा आहे.  मी निवडून आलेलो असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मला प्रदेशाध्यक्ष पदावर निवड झाल्याचे पत्र प्रफुल्ल पटेल यांनी पाठवल्याचा खुलासा  जयंत पाटील यांनी केला आहे.

जयंत पाटील आणि अजित पवार गटाचे वकिल  यांच्यातील युक्तीवाद 

अजित पवार गटाचे वकिल: तुम्ही पक्षात कुठल्या पदावर होता व कधी, तुमची निवड कशी झाली?

पाटील : होय मी प्रदेश अध्यक्ष पदावर होतो, निवडणूक झाली व माझी निवड झाली

जयंत पाटील : 2019 पासtन मी या  पदावर आहे. 2018 साली माझी प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली होती. 2022 साली विविध जिल्ह्यांमध्ये निवडणुका पार पडत होत्या. विविध राज्यात निवडणुका पार पडल्या होत्या. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनात पवार साहेबांची अध्यक्ष म्हणून निवड झाली. 2018  साली निवडणूक झाली, त्यात माझी राज्य प्रदेशाध्यक्ष पदावर निवड झाली.2022 मध्ये राज्य पदाधिकारी निवडणूक प्रक्रिया सुरु होती. त्यात काही जिल्ह्यातील पदाधिकारी निवड झाली तर काही जिल्ह्यात ती सुरु होती.  राष्ट्रीय पातळीवर इतर राज्यातील पदाधिकारी निवड प्रक्रिया पूर्ण झाली . राष्ट्रीय निवडणुकीत शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यानंतर दिल्लीत नॅशनल कन्व्हेन्शन पार पडली. त्यात शरद पवार यांना कार्यालय निवडीचे सर्वाधिकार देण्यात आले. इतर राज्यातील प्रदेशाध्यक्ष निवडीबाबत मला माहिती नाही, पण माझ्या निवडीचे पत्र प्रफुल्ल पटेल यांच्याकडून मला मिळाले

वकिल : याचा अर्थ तुम्ही प्रदेशाध्यक्ष म्हणून निवडून आला नाही तर तुमची निवड शरद पवार यांनी केली?

पाटील : कमिटीचा कार्यकाळ हा सुमारे ३ वर्षांचा असतो. त्यावेळी मी निवडून आलेला प्रदेशाध्यक्ष होतो. राज्यातील काही जिल्ह्यात निवडणूक सुरु होती. पण तोपर्यंत मी कमिटामार्फत निवडून आलेला प्रदेशाध्यक्ष होतो

वकिल :तुम्ही २०१८पासून प्रदेशाध्यक्ष होता?

पाटील : मी सांगितले की सुमारे तीन वर्षांचा कमिटीचा कार्यकाळ असतो फक्त तीन वर्षांचा असतो असे नाही. त्यामुळे राज्य पातळीवर निवडणूक पूर्ण होईपर्यंत ही कमिटी कार्यरत असते. तसेच माझी निवड प्रदेशाध्यक्ष म्हणून कायम राहते.

वकिल :२०२२ साली राज्य कमिटीची निवडणूक होईपर्यंत तुमची प्रदेशाध्यक्ष पदी निवड कुणी केली किंवा तुम्ही निवडून कसे आला?

पाटील : २०२२ नंतर जिल्हा कमिटीची निवडणूक झाली असे मी म्हटलं नाही.राज्य कमिटीची निवडणूक प्रक्रिया सुरु होती, असे मी नमूद केले आहे.

वकिल : तुमच्या मते २०२१ साली सुरु झालेली राज्य कमिटीची निवडणूक कधी संपली? की ती अजूनही सुरु आहे?

पाटील : प्रक्रिया सुरु आहे. काही लोक पक्षातून बाहेर पडले, त्यामुळे काही जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने सुरु आहे. त्यामुळे राज्य कमिटी निवडणूक घेता आलेली नाही.

वकिल : राष्ट्रीय कमिटीची निवड कशी होते? निवडणूकीद्वारे की निवडी द्वारे?

पाटील : सर्व राज्यातील प्रतिनिधी राष्ट्रीय कमिटीचे सदस्य आहेत. ते राष्ट्रीय अध्यक्ष, उपाध्यक्ष व खजिनदार यांची निवड करतात.

वकिल : अर्थात सर्व राज्य कमिटीच्या निवडणूक झालेल्या नसतील तर घटनेप्रमाणे राष्ट्रीय कमिटीची स्थापना वैध ठरू शकत नाही, हे खरे आहे का?

(शरद पवार गटाच्या वकिलांनी या प्रश्नावर आक्षेप घेतला आहे)

जयंत पाटील:  मी असे म्हणालो नाही की सर्वच राज्यात निवडणुका सुरू होत्या. महाराष्ट्रात सुरू होत्या. त्या पूर्ण झाल्या नव्हत्या. पक्षाच्या घटनेनुसार अस्तित्वात असेलेले सर्व पद त्या राज्याच्या निवडणुका पूर्ण होईपर्यंत सुरू राहू शकतात.

वकिल:  कार्यक्रम सर्व निवडणुकांना लागू होतो का?

जयंत पाटील: हा कार्यक्रम सर्व देशभरातील निवडणुकींसाठी लागू होता. पण त्यानंतर हा कार्यक्रम  आधी एका पत्रानुसार पुढे ढकलण्यात आला.

The post जयंत पाटील निवडून आलेले नव्हे निवड झालेले प्रदेशाध्यक्ष, अजित पवार गटाचा युक्तिवाद; आमदार अपात्रता प्रकरणावरुन घमासान appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/argument-of-jayant-patil-not-elected-state-president-ajit-pawar-group-ghamasan-over-mla-disqualification-case/3745/feed/ 0
मनोज जरांगेंच्या पदयात्रेत लाखोंचा जनसमुदाय अवतरला! https://dailyyashwant.com/lakhs-of-people-came-in-manoj-jarangs-padayatra/3740/ https://dailyyashwant.com/lakhs-of-people-came-in-manoj-jarangs-padayatra/3740/#respond Wed, 24 Jan 2024 08:11:29 +0000 https://dailyyashwant.com/?p=3740 मनोज जरांगे पाटील  यांची पदयात्रा पुण्यातून मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे. पुण्यामध्ये आज मनोज जरांगे पाटील यांच्या यात्रेत अभूतपूर्व गर्दी झाली आहे. पुण्यामध्ये सुद्धा न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांच्या पदयात्रेचे स्वागत करण्यात आले. इतकेच नव्हे तर, पुण्यात आज पहाटे पाच वाजता महाराज मनोज जरांगे यांची सभा पार पडली. यावेळी आबालवृद्धांनी […]

The post मनोज जरांगेंच्या पदयात्रेत लाखोंचा जनसमुदाय अवतरला! appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
मनोज जरांगे पाटील  यांची पदयात्रा पुण्यातून मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे. पुण्यामध्ये आज मनोज जरांगे पाटील यांच्या यात्रेत अभूतपूर्व गर्दी झाली आहे. पुण्यामध्ये सुद्धा न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांच्या पदयात्रेचे स्वागत करण्यात आले. इतकेच नव्हे तर, पुण्यात आज पहाटे पाच वाजता महाराज मनोज जरांगे यांची सभा पार पडली. यावेळी आबालवृद्धांनी केलेली गर्दी ही लक्षणीय होती. यानंतर आता मुंबईच्या दिशेने पदयात्रेचा प्रवास सुरू झाला आहे. पुण्यामध्ये सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला न भूतो न भविष्यती असाच पाठिंबा मिळाला.

हाडं गारठवणाऱ्या थंडीतही मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी  एल्गार पुकारलेल्या मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे पुण्यामध्ये अत्यंत दिमाखात स्वागत करण्यात आले. कडाक्याची थंडी असताना सुद्धा त्याची ताम न  बाळगता अवघा मराठा जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी पुण्यातील रस्त्यांकडे डोळे लावून उभा होता. रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करत जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर पहाटेला झालेली भव्य सभा भव्यदिव्य ठरली. मनोज जरांगे पाटील यांनी आज मध्यरात्री दीडच्या सुमारास वडूज येथे आगमन झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतले. भीमा कोरेगाव परिसरामध्ये विजयस्तंभ परिसरात जरांगे पाटलांच्या स्वागताला रस्त्याच्या दुतर्फा लोक होते. लहानग्यांपासून आबालवृद्धापर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी हजर होता.

जरांगे-पाटील यांच्यासह मराठा बांधवांचे मोठ्या उत्साहात स्वागत

तत्पूर्वी, पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात जरांगे-पाटील यांच्यासह मराठा बांधवांचे मोठ्या उत्साहात स्वागत झाले. ठिकठिकाणी स्वागताचे बॅनर लावण्यात आले होते. पदयात्रेतील सहभागी बांधवांसाठी शिरदाळे व खडकी ग्रामस्थांनी चटणी-भाकरी अशी भोजनाची व्यवस्था केली. खडकी ग्रामस्थांच्या पुढाकाराने साडेतीन हजार चपात्या, पन्नास किलो शेंगदाण्याची चटणी, 50 किलो लसणाची चटणी यांचे वाटप मराठा बांधवांना करण्यात आले. रांजणगाव गणपती-कारेगाव परिसरातील सर्व गावांत चपाती आणि शेंगदाणा चटणी करण्यात आली होती.

मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी हजारो मराठा स्वयंसेवक मदत करत आहेत. वाहतुकीस कोणताही अडथळा होऊ दिला जाणार नाही, याची सुक्ष्म काळजी प्रत्येक स्वयंसेवकाकडून घेतली जात आहे.  आंदोलकांना जेवण, पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्याविषयी आंदोलकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आरोग्य मदत केंद्रे उभारली जाणार आहेत. पुण्यातील पदयात्रा मार्गावर मदत केंद्रे उभारून सहकार्य करण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाकडून करण्यात आलं आहे.

आजच्या यात्रेचा मार्ग कसा असणार?

मनोज जरांगे-पाटील यांची पदयात्रा आज सांगवी फाटा येथे दाखल होईल. तेथून  रक्षक चौक,जगताप डेअरी, काळेवाडी फाटा, डांगे चौक, पदमजी पेपर मिलमार्गे चापेकर चौक चिंचवडगाव असा मार्ग असणार आहे. पुढे चिंचवड स्टेशन- खंडोबा मंदिर, आकुर्डीमार्गे निगडी, भक्ती-शक्ती समूह शिल्पावरून तळेगावमार्गे आंदोलक लोणावळा येथे मुक्कामी असतील.

The post मनोज जरांगेंच्या पदयात्रेत लाखोंचा जनसमुदाय अवतरला! appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/lakhs-of-people-came-in-manoj-jarangs-padayatra/3740/feed/ 0
एक आठवड्याच्या आत मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करू आणि पुढील निर्णय घेऊ; मंत्री हसन मुश्रीफांचा दावा https://dailyyashwant.com/within-a-week-we-will-prove-that-the-maratha-community-is-backward-and-take-further-decisions-minister-hasan-mushrifs-claim/3663/ https://dailyyashwant.com/within-a-week-we-will-prove-that-the-maratha-community-is-backward-and-take-further-decisions-minister-hasan-mushrifs-claim/3663/#respond Sat, 20 Jan 2024 07:01:10 +0000 https://dailyyashwant.com/?p=3663 कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारलेल्या मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून (20 जानेवारी) मुंबईच्या दिशेनं कूच केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी 26 जानेवारीपासून मुंबईमध्ये आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. यानंतर आता शासकीय पातळीवर सुद्धा धावाधाव सुरू झाली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी  कोल्हापूरमध्ये बोलताना मोठा दावा केला […]

The post एक आठवड्याच्या आत मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करू आणि पुढील निर्णय घेऊ; मंत्री हसन मुश्रीफांचा दावा appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारलेल्या मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून (20 जानेवारी) मुंबईच्या दिशेनं कूच केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी 26 जानेवारीपासून मुंबईमध्ये आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. यानंतर आता शासकीय पातळीवर सुद्धा धावाधाव सुरू झाली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी  कोल्हापूरमध्ये बोलताना मोठा दावा केला आहे.

मराठा समाज मागासलेपण सिद्ध करू आणि पुढील निर्णय घेऊ

एक आठवड्याच्या आत मराठा समाज मागासलेपण सिद्ध करू आणि पुढील निर्णय घेऊ असा दावा हसन मुश्रीफ यांनी केला. कोल्हापूरमध्ये बोलतानाते म्हणाले की सरकारच्या निर्णयाने मराठा समाजाच्या समाधान केले जाईल. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे चालत जाऊ नये, त्यांच्या तब्येतीची काळजी म्हणून त्यांनी चालत जाऊ नये. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे ते म्हणाले.

काही तथ्य नसल्यास रोहित पवार चौकशीला सामोरे जातील

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडून आपल्यावर ट्रॅप केला जात असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर बोलताना मुश्रीफ यांनी कोणी ट्रॅप केला हे सांगावे, असे सांगितले. दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या सुरू असलेल्या सुनावणी संदर्भात बोलताना जयंत पाटील यांच्याकडून सुनावणीबाबत कोणती खबरदारी घेतली, मला माहित नाही असे सांगितले. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं असून 24 जानेवारीला त्यांची चौकशी केली जाणार आहे. याबाबत विचारण्यात आले असता मुश्रीफ यांनी काही तथ्य नसल्यास रोहित पवार चौकशीला सामोरे जातील, असे सांगितले.

मुश्रीफ करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरामध्ये स्वच्छता करणार

दुसरीकडे, मुश्रीफ करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरामध्ये स्वच्छता करणार आहेत. याबाबत बोलताना म्हणाले की, राम मंदिर कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकप्रतिनिधींना मंदिर स्वच्छतेचं आव्हान केलं आहे. याच पार्श्वभूमीवर मुश्रीफ स्वच्छता करणार आहेत. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावर, मनाप आयुक्त के. मंजुलक्ष्मी मंदिर परिसरात उपस्थित राहणार आहेत. ते म्हणाले की, अनेक वर्षांपासून देशवासियांची इच्छा होती की राम मंदिर व्हावे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मंदिर तयार झाले मी राम, राम माझा ही भावना सगळ्यांची आहे. कागलमध्ये एक लाख लोकांना प्रसाद दिला जात असल्याचे ते म्हणाले.

The post एक आठवड्याच्या आत मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करू आणि पुढील निर्णय घेऊ; मंत्री हसन मुश्रीफांचा दावा appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/within-a-week-we-will-prove-that-the-maratha-community-is-backward-and-take-further-decisions-minister-hasan-mushrifs-claim/3663/feed/ 0
नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या 42 जणांवर कारवाई बडगा https://dailyyashwant.com/take-action-against-42-people-selling-nylon-manja/3531/ https://dailyyashwant.com/take-action-against-42-people-selling-nylon-manja/3531/#respond Sun, 07 Jan 2024 11:08:27 +0000 https://dailyyashwant.com/?p=3531 सर्वत्र मकर संक्रांत  सणानिमित्ताने पंतग उडविण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. परंतु, पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पारंपारिक मांजाऐवजी नायलॉन  तसेच काचेचा वापर करून तयार करण्यात आलेल्या प्रतिबंधित मांजाची विक्री काही जणांकडून केली जात असल्याचे आढळून आले आहे. अशांवर नाशिक पोलिसांनी  कारवाईचा बडगा उगारला असून शहरात अवैध नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या 42 जणांविरोधात हद्दपारीची कारवाई करण्यात […]

The post नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या 42 जणांवर कारवाई बडगा appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
सर्वत्र मकर संक्रांत  सणानिमित्ताने पंतग उडविण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. परंतु, पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पारंपारिक मांजाऐवजी नायलॉन  तसेच काचेचा वापर करून तयार करण्यात आलेल्या प्रतिबंधित मांजाची विक्री काही जणांकडून केली जात असल्याचे आढळून आले आहे. अशांवर नाशिक पोलिसांनी  कारवाईचा बडगा उगारला असून शहरात अवैध नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या 42 जणांविरोधात हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.

पतंगाच्या मांजामुळे पक्षी, प्राणी व मानवी जिवीतास धोका निर्माण होतो. पक्षी, प्राणी, नागरीक, बालके, वयोवृद्ध, वाहनस्वार जखमी होण्याचे अथवा प्राण गमाविण्याच्या घटना याआधी घडल्या आहेत. तुटलेला मांजा विजेच्या तांरामध्ये अडकून काही ठिकाणी आगी देखील लागण्याच्या घटना घडलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांकडून दि. 23 जानेवारीपर्यंत नायलॉन मांजा (Nylon Manja) विक्री व वापरावर मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.

४२ जणांवर हद्दपारीची कारवाई

त्याअनुषंगाने नाशिक पोलिसांनी पंचवटी, सरकारवाडा, अंबड व नाशिकरोड विभागातील नायलॉन तसेच काचेचा वापर करून तयार करण्यात आलेल्या मांजा विक्री करणाऱ्या एकूण 42 जणांवर हद्दपरीची कारवाई केली आहे. आडगाव परिसरात 3,  म्हसरूळ 2, पंचवटी, 2, भद्रकाली 5, सरकारवाडा 8, गंगापूर 5, मुंबईनाका 5,सातपूर 1, अंबड 2, इंदिरानगर 3,  उपनगर 3, नाशिकरोड 2, देवळाली कॅम्प 1, अशा एकूण 42 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

70 नायलॉन मांजाचे गट्टू जप्त

नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या संशयितास अंबड पोलीस ठाण्याच्या (Ambad Police Station) गुन्हे शोध पथकाने नुकतेच ताब्यात घेतले. त्याच्याकडून 28 हजार रुपये किमतीचे 70 नायलॉन मांजाचे गट्टू जप्त करण्यात आले आहेत. अमृतेश्वर महादेव मंदिराजवळ केवलपार्करोड, या ठिकाणी एक व्यक्ती गोणीमधून संशयित नायलॉन मांजाची (Nylon Manja) विक्री करत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. पोलिसांनी संशयितास सप्ला रचून अटक केली आहे.

नायलॉन मांजा विक्री व वापरावर दि. 23 जानेवारीपर्यंत नाशिक पोलिसांनी (Nashik Police) मनाई केली आहे. या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कारवाई केली जाणार आहे. तसेच गुन्हा दाखल केल्यानंतरही मांजाचा वापर व विक्री करत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितास तडीपार, हद्दपार व इतर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

The post नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या 42 जणांवर कारवाई बडगा appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/take-action-against-42-people-selling-nylon-manja/3531/feed/ 0
रायगडचे भाविक नेपाळमध्ये अडकले, फडणवीसांच्या एका मेसेजने 58 प्रवासी सुखरुप परतले! https://dailyyashwant.com/raigad-devotees-stuck-in-nepal-58-passengers-returned-safely-with-a-message-from-fadnavis/3490/ https://dailyyashwant.com/raigad-devotees-stuck-in-nepal-58-passengers-returned-safely-with-a-message-from-fadnavis/3490/#respond Fri, 29 Dec 2023 09:10:43 +0000 https://dailyyashwant.com/?p=3490 मुंबई : पैसे नाहीत, पर्यटन कंपनीने हात वर करून नेपाळमध्ये अडकवून ठेवलेले. अनेक नेत्यांना आणि त्यांच्या पीएला फोन करून मदत मागितली. पण प्रतिसाद मिळेना. शेवटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेसेज केला आणि त्यांनी सर्व यंत्रणा हलविली. नेपाळपासून ते उत्तर प्रदेशापर्यंत अक्षरश: व्हीआयपी ट्रिटमेंट मिळून हे भाविक रायगड जिल्ह्यातील आपल्या गावी पोहोचले. काठमांडूमध्ये देवेंद्र फडणवीस आमच्या मदतीला […]

The post रायगडचे भाविक नेपाळमध्ये अडकले, फडणवीसांच्या एका मेसेजने 58 प्रवासी सुखरुप परतले! appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
मुंबई : पैसे नाहीत, पर्यटन कंपनीने हात वर करून नेपाळमध्ये अडकवून ठेवलेले. अनेक नेत्यांना आणि त्यांच्या पीएला फोन करून मदत मागितली. पण प्रतिसाद मिळेना. शेवटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेसेज केला आणि त्यांनी सर्व यंत्रणा हलविली. नेपाळपासून ते उत्तर प्रदेशापर्यंत अक्षरश: व्हीआयपी ट्रिटमेंट मिळून हे भाविक रायगड जिल्ह्यातील आपल्या गावी पोहोचले. काठमांडूमध्ये देवेंद्र फडणवीस आमच्या मदतीला धावून आले, अशी भावना पर्यटकांनी व्यक्त केली.

नेपाळमध्ये अडकलेला एक भाविक संजू म्हात्रे यांनी सांगितले की, आम्ही  रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कामोठे गावातील 58 भाविक नेपाळमध्ये धार्मिक पर्यटनासाठी गेलो होतो. 35 महिला आणि 23 पुरुष त्यामध्ये होते. गोरखपूरहून नेपाळपर्यंत सगळे व्यवस्थित पोहोचले. लुंबीनी, पोखरा, जनकपुरी, मनोकामना या ठिकाणी दर्शन घेतले. मात्र, काठमांडूला आल्यावर त्यांना राधाकृष्ण ट्रॅव्हल्सच्या एका बसमध्ये कोंबण्यात आले. भाविकांनी गावाहून निघतानाच सर्व पैसे भरलेले होते. मात्र, त्यांची फसवणूक झाली होती.  तुमच्या पर्यटन कंपनीकडून पैसे आले नाहीत. सहा लाख रुपये दिले नाहीत तर सोडणार नाही, असे या ट्रॅव्हल्सचा मालक अंकीत जायस्वाल आणि त्याच्या साथीदारांनी धमकावयला सुरूवात केली. परक्या गावात उद‌्भवलेल्या या प्रसंगामुळे काय करायचे हा प्रश्न या भाविकांसमोर उभा राहिला. त्यांनी ओळखीच्या लोकांमार्फत नेत्यांना आणि त्यांच्या पीएला फोन करायला सुरुवात केली. पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळेना. शेवटी संजू म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेसेज करून सर्व प्रसंग सांगितला. त्यांचा तातडीने प्रतिसाद आला. त्यांनी माहिती घेतली. लगेचच फडणवीस यांचे खासगी सचिव दिलीप राजूरकर आणि  दिल्लीतील स्वीय सहायक मनोज मुंडे यांनी या भाविकांशी संपर्क साधला.

देवेंद्र फडणवीस यांच्या टीमने संदीप राणा यांना याबाबत कळवले. राणा यांनी स्वत: या भाविकांची भेट घेतली व  सर्व भाविकांची व्यवस्था करून विशेष बसने त्यांना गोरखपूरला पोहोचवले. देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संपर्क साधला होता. त्यामुळे भाविक गोरखपूरला पोहोचल्यावर तेथील जिल्हाधिकारी स्वत: भेटीला आले. त्यांनी दोन दिवस भाविकांची निवासाची आणि भोजनाची व्यवस्था केली. त्यांना मुंबईपर्यंत कसे न्यायचे प्रश्न होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून गोरखपूरपासून मुंबईपर्यंत खास बोगी जोडण्याची विनंती केली. रेल्वेने त्याप्रमाणे भाविकांसाठी गोरखपूरहून मुंबईपर्यंत रेल्वेची एक बोगी आरक्षित करून दिली. दोन दिवस प्रवास करून सर्व जण सुखरुपपणे मुंबईला पोहोचले.

The post रायगडचे भाविक नेपाळमध्ये अडकले, फडणवीसांच्या एका मेसेजने 58 प्रवासी सुखरुप परतले! appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/raigad-devotees-stuck-in-nepal-58-passengers-returned-safely-with-a-message-from-fadnavis/3490/feed/ 0