क्रीडा Archives - Dainik Yashwant, Latur https://dailyyashwant.com/category/sports/ Online Portal Mon, 26 Feb 2024 08:35:41 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 भारताने चौथ्या कसोटीसह मालिकाही जिंकली https://dailyyashwant.com/india-also-won-the-series-with-the-fourth-test/4139/ https://dailyyashwant.com/india-also-won-the-series-with-the-fourth-test/4139/#respond Mon, 26 Feb 2024 08:35:41 +0000 https://dailyyashwant.com/?p=4139 रांची : चौथ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडला धुळ चारत दणदणीत विजय साकारला. या विजयासह भारताने कसोटी मालिकाही जिंकली आहे. कारण पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने हा सलग तिसरा विजय मिळवला आहे. त्यामुळे भारताने या मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. इंग्लंडने भारतापुढे विजयासाठी १९२ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने […]

The post भारताने चौथ्या कसोटीसह मालिकाही जिंकली appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
रांची : चौथ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडला धुळ चारत दणदणीत विजय साकारला. या विजयासह भारताने कसोटी मालिकाही जिंकली आहे. कारण पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने हा सलग तिसरा विजय मिळवला आहे. त्यामुळे भारताने या मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. इंग्लंडने भारतापुढे विजयासाठी १९२ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने अर्धशतक झळकावले आणि संघाच्या विजयाचा मार्ग प्रशस्त केला. पण त्याला विजयावर शिक्कामोर्तब करता आले नाही. पण भारताच्या शुभमन गिलने ही जबाबदारी चोख पार पाडली आणि भारताला पाच विकेट्स राखून विजय मिळवून दिला. रोहित शर्माने यावेळी ५५ धावांची खेळी साकारली, तर शुभमन गिलने नाबाद ५२ धावा करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

भारतीय संघ चौथ्या दिवसाची सुरुवात कशी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. कारण पहिल्या अर्ध्या तासात सामन्याला कल ठरणार होता. रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी भारताला आश्वासक सुरुवात करून दिली. यशस्वी यावेळी संयतपणे खेळत होता, पण रोहित मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांना ऐकत नव्हता. कारण रोहितने यावेळी जोरदार फटकेबाजीला सुरुवात केली होती. जेम्स अँडसरनला ११ व्या षटकात खणखणीत षटाकर खेचत रोहित शर्माने आपले इरादे स्पष्ट केले. यावेळी रोहित शर्माचे बेन स्टोक्सेही कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. रोहित शर्मा आता काही थांबणारा नव्हता, हे स्पष्ट झाले होते. पण त्याचवेळी भारताला धक्का बसला तो यशस्वी जैस्वालच्या रुपात. यशस्वीचा अप्रतिम झेल यावेळी जेम्सने पकडला. रुटच्या गोलंदाजीवर यशस्वी हा ५ चौकारांनिशी ३७ धावा करून बाद झाला.

यशस्वी बाद झाला तरी रोहित आपल्या लयीत खेळत होता. रोहितने यावेळी आपले अर्धशतक साकारले. रोहित आता मोठी खेळी साकारणार, असे वाटत होते. पण यावेळी एक मोठा फटका मारण्याच्या नादात रोहित बाद झाला. टॉम हार्टलीला मोठा फटका मारण्यासाठी रोहित पुढे सरसावला, पण त्याचा अंदाज चुकला. त्यामुळे चेंडू थेट यष्टीरक्षकाकडे गेला आणि रोहित यष्टीचीत झाला. रोहितने यावेळी पाच चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५५ धावांची खेळी साकारली. रोहित बाद झाला आणि त्यानंतर आलेला रजत पाटीदार एकही धाव न करता बाद झाला. पण त्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि रवींद्र जडेजा यांनी चांगलाच किल्ला लढवला.

The post भारताने चौथ्या कसोटीसह मालिकाही जिंकली appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/india-also-won-the-series-with-the-fourth-test/4139/feed/ 0
भारताने विजयासह रचला इतिहास https://dailyyashwant.com/india-created-history-with-victory/4053/ https://dailyyashwant.com/india-created-history-with-victory/4053/#respond Sun, 18 Feb 2024 11:59:24 +0000 https://dailyyashwant.com/?p=4053 राजकोट : राजकोटवर अखेर भारताचेच राज्य असल्याचे पाहायला मिळाले. कारण भारताच्या गोलंदाजांची इंग्लंडच्या फलंदाजांना आपल्यापुढे लोटांगण घालायला भाग पाडले आणि विजय साकारला. यशस्वी जैस्वालच्या द्विशतकाच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात ४ बाद ४३० धावसंख्या उभारली आणि डाव घोषित केला. त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी ५५७ धावांचे आव्हान देण्यात आले आहे. भारताच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून इंग्लंडच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला. त्यामुळे […]

The post भारताने विजयासह रचला इतिहास appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
राजकोट : राजकोटवर अखेर भारताचेच राज्य असल्याचे पाहायला मिळाले. कारण भारताच्या गोलंदाजांची इंग्लंडच्या फलंदाजांना आपल्यापुढे लोटांगण घालायला भाग पाडले आणि विजय साकारला. यशस्वी जैस्वालच्या द्विशतकाच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात ४ बाद ४३० धावसंख्या उभारली आणि डाव घोषित केला. त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी ५५७ धावांचे आव्हान देण्यात आले आहे. भारताच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून इंग्लंडच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला. त्यामुळे इंग्लंडचा संघ बॅकफूटवर ढकलला गेला. त्यानंतर दडपणाखाली इंग्लंडचे फलंदाज बाद होत गेले आणि भारताने ४३४ धावांनी दमदार विजय साकारला. या विजयासह भारताने कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. रवींद्रसजडेजाने यावेळी दुसऱ्या डावात पाच बळी मिळवले.

कसोटीच्या तिसऱ्या दिवशी यशस्वी जैस्वालची बॅट चांगलीच तळपल्याचे पाहायला मिळाले. यशस्वीने यावेळी धमाकेदार फटकेबाजी करत द्विशतक झळकावले. यशस्वीचे हे सलग दुसरे द्विशतक ठरले. यशस्वीने यावेळी १४ चौकार आणि १२ षटकारांच्या जोरावर नाबाद २१४ धावांची खेळी साकारली. यशस्वीला यावेळी सर्फराझ खानने चांगली साथ दिली. सर्फराझने दुसऱ्या डावातही अर्धशतक साकारले. सर्फराझने यावेळी ६ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद ६८ धावा केल्या. भारतीय क्रिकेट संघाने रविवारी ऐतिहासिक कामगिरी केली. इंग्लंडवर ४३४ धावांनी विजय नोंदवला. भारताने कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच चारशेहून अधिक धावांनी विजय नोंदवला. इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर आहे. इंग्लंडने मालिकेतील पहिली कसोटी २८ धावांनी जिंकली होती. त्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत १०६ धावांनी बाजी मारली होती. अर्थात, या पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली. त्यानंतर राजकोटला झालेल्या तिसऱ्या कसोटीत कोण बाजी मारणार, याबाबत उत्सुकता होती. भारताने पहिल्या डावात ४४५ धावा केल्या होत्या. मात्र, भारताला मोठा फटका बसला.

फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आई आजारी असल्याने कसोटी सोडून घरी परतला होता. तरीही भारतीय संघाने इंग्लंडचा डाव ३१९ धावांत रोखला आणि पहिल्या डावात १२६ धावांची आघाडी मिळवली. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघाने यशस्वी जयस्वालच्या द्विशतकाच्या जोरावर ४ बाद ४३० धावांवर डाव घोषित केला होता. त्यामुळे इंग्लंडसमोर विजयासाठी ५५७ धावांचे अशक्यप्राय वाटणारे लक्ष्य आले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवातीलाच ४ बाद २८ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर जो रूट आणि कर्णधार बेन स्टोक्स यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, जडेजाने रुटला पायचीत केले आणि ही जोडी फोडली. त्यानंतर इंग्लंडचा डाव स्थिरावला नाही. अखेरीस इंग्लंडचा डाव १२२ धावांत गारद झाला आणि भारताने ४३४ धावांनी विजय नोंदवला. आजपर्यंतचा भारताचा धावांनी सर्वांत मोठा विजय ठरला. यापूर्वी, २०२१मध्ये भारतीय संघाने वानखेडे स्टेडियममध्ये न्यूझीलंडवर ३७२ धावांनी विजय नोंदवला होता.

The post भारताने विजयासह रचला इतिहास appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/india-created-history-with-victory/4053/feed/ 0
भारताच्या सेमीफायनल विजयाचा हिरो बीडचा सचिन धस! त्याच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. https://dailyyashwant.com/sachin-dhas-of-beed-the-hero-of-indias-semi-final-victory/3855/ https://dailyyashwant.com/sachin-dhas-of-beed-the-hero-of-indias-semi-final-victory/3855/#respond Wed, 07 Feb 2024 06:28:07 +0000 https://dailyyashwant.com/?p=3855 नवी दिल्ली: भारताच्या अंडर-१९ संघाने शानदार कामगिरी करत पाचव्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे. विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेच्या बाद फेरीच्या सामन्यात जेव्हा एखादा संघ १२ षटकांत केवळ ३२ धावांत चार महत्त्वाचे विकेट गमावतो, तेव्हाच चमत्कारानेच विजय मिळवता येतो. सचिन धस (९६) आणि कर्णधार उदय सहारन (८१) यांनी मिळून १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध असाच […]

The post भारताच्या सेमीफायनल विजयाचा हिरो बीडचा सचिन धस! त्याच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
नवी दिल्ली: भारताच्या अंडर-१९ संघाने शानदार कामगिरी करत पाचव्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे. विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेच्या बाद फेरीच्या सामन्यात जेव्हा एखादा संघ १२ षटकांत केवळ ३२ धावांत चार महत्त्वाचे विकेट गमावतो, तेव्हाच चमत्कारानेच विजय मिळवता येतो. सचिन धस (९६) आणि कर्णधार उदय सहारन (८१) यांनी मिळून १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध असाच चमत्कार केला. दोघांमधील पाचव्या विकेटसाठी विक्रमी १७१ धावांच्या भागादारीच्या जोरावर भारताला अंतिम फेरी गाठण्यात यश आले.

सामनावीराचा पुरस्कार कर्णधार उदय सहारन याला देण्यात आला असला, तरी भारतीय डावाचा संघर्ष जर तुम्ही बारकाईने पाहिला असेल, तर सचिन धसचे योगदान दुर्लक्ष करून चालणार नाही. सचिन धसच्या आक्रमक फलंदाजी करत त्याने ४७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले तेव्हा कर्णधार उदय सहारन ६० चेंडूत २३ धावांवर खेळत होता. पण हा महाराष्ट्राचा धाकड फलंदाज सचिन धस आहे तरी कोण त्याच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

४ धावांनी हुकले शतक

दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या सेमीफायनल सामन्यात सचिन धसने आपल्या प्रतिस्पर्ध्यांची पार झोपच उडवली. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने संघाला अडचणीतून बाहेर काढत महत्त्वपूर्ण खेळी केली. महान सचिन तेंडुलकरसारखा संयम बाळगला. संधी मिळेल तेव्हा एकेरी आणि दुहेरी घेत धावफलक पुढे नेला. जिथे त्याला संधी मिळेल तिथे एकापेक्षा एक कमाल शॉटस खेळण्यात त्याने मागे पुढे पाहिले नाही. १७१ धावांच्या भागीदारीत निम्म्याहून अधिक धावा सचिन धसच्या बॅटमधून आल्या.

क्रीझवर १२१ मिनिटे घालवत त्याने ११ चौकार आणि एक षटकार मारला. सलग दोन चौकारांसह ४७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने स्पर्धेतील आपले सलग दुसरे शतक झळकावले असते, परंतु स्पर्धेतील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज माफाकाच्या स्लोअर चेंडूने तो झेलबाद झाला आणि संघाची धावसंख्या २०३ धावा असताना ४३व्या षटकात तो बाद झाला.

सचिनच्या नावाचे तेंडुलकरशी कनेक्शन

सचिन धसचे वडील संजय धस, महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील रहिवासी, हे महान भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरचे खूप मोठे चाहते आहेत. यामुळेच त्यांनी मुलाचे नाव सचिन ठेवले. सचिन महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२३ मध्ये कोल्हापूर टस्कर्सचा भाग होता. सचिन धसची फलंदाजी पुण्यात खूप प्रसिद्ध आहे. १९ वर्षांखालील एका स्पर्धेत या खेळाडूने इतके षटकार मारले होते की, आयोजकही चक्रावून गेले होते. आयोजकांनी सचिन धसच्या बॅटचीही यानंतर तपासणी केली होती.

स्पर्धेतील पहिल्या ४ सामन्यांमध्ये, त्याने २६*, ३२*, २० आणि १५ धावांचे डाव खेळले. त्याच्या याच खेळींच्या जोरावर भारतीय संघ त्या सामन्यांमध्ये शेवटच्या १० षटकांत मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरला. सचिनने सुपर सिक्सच्या शेवटच्या सामन्यात नेपाळविरुद्ध ११६ धावांची शानदार खेळी केली होती. आता या सामन्यातही त्याने आपल्या धडाकेबाज फटकेबाजीने आफ्रिकन गोलंदाजांना बॅकफूटवर खिळवून ठेवले.

बीडच्या सुपरस्टारच्या नावामागचं कारण?

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात राहणाऱ्या सचिन धसचे वडील संजय धस हे क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचे मोठे चाहते आहे. यामुळे त्यांनी मुलाचे नाव सचिन ठेवले. वडीलांना क्रिकेट आवडत होते आणि त्यामुळे लहानपणीच ठरवले होते की सचिन क्रिकेटर बनणार. असे स्वतः सचिन धस कर्णधार उदय सहारनशी बोलताना म्हणाला. त्यांचा व्हिडिओ भारतीय क्रिकेट नियामक मंडळने सोशल मीडिया पोस्ट केला आहे.

पैसे उसने घेऊन मुलासाठी खेळपट्टी केली तयार 

सचिन धसचे वडील संजय धस यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना खुलासा केला की, त्यांनी आपल्या मुलाला प्रशिक्षण देण्यासाठी पैसे उधार घेऊन खेळपट्टी तयार केली. मात्र, बीडमध्ये आधीच पाण्याचं संकट आणि त्यात खेळपट्टीला लागणारं अधिकचं पाणी यात खेळपट्टी सुस्थितीत राखण्याचं आव्हान सचिनच्या वडिलांसमोर होतं. पण मुलाला क्रिकेटर बनवण्याची त्यांची इच्छा इतकी दांडगी होती की, त्यांनी यावरही उपाय शोधून काढला. दोन दिवसातून एकदा ते खेळपट्टीसाठी टँकर मागवायचे. संजय धस सचिनच्या यशाचं सर्व श्रेय त्याचे प्रशिक्षक अझहर देतात. अझहर यांनी सचिनला फलंदाज म्हणून घडवण्यासाठी अथक परिश्रम घेतल्याचं संजय धस यांनी सांगितलं.

19 वर्षांखालील विश्वचषकात सचिन धसच्या मोक्कार धावा 

2024 च्या अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत सचिन धस हा दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. आतापर्यंत त्यानं 6 सामन्यांत 73.50 च्या सरासरीनं 294 धावा केल्या आहेत. भारताचा फलंदाज मुशीर खान पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानं 6 सामन्यात 67.60 च्या सरासरीनं 338 धावा केल्या आहेत.

सचिनची आई महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत 

सचिन धस यांची आई सुरेखा धस या महाराष्ट्र पोलिसांत सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) आहेत. त्यांच्या काळात त्या कबड्डीपटू होत्या. सचिनचे वडील विद्यापीठ स्तरावर क्रिकेट खेळले आहेत. सचिनची बहीण प्रतीक्षा पुण्यात यूएसपीसी परीक्षेची तयारी करत आहे.

The post भारताच्या सेमीफायनल विजयाचा हिरो बीडचा सचिन धस! त्याच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/sachin-dhas-of-beed-the-hero-of-indias-semi-final-victory/3855/feed/ 0
स्टार खेळाडू सुर्यकुमार यादव ‘या’ आजाराने ग्रस्त, जर्मनीत होणार शस्त्रक्रिया https://dailyyashwant.com/star-player-suryakumar-yadav-suffering-from-this-disease-will-undergo-surgery-in-germany/3550/ https://dailyyashwant.com/star-player-suryakumar-yadav-suffering-from-this-disease-will-undergo-surgery-in-germany/3550/#respond Mon, 08 Jan 2024 07:50:05 +0000 https://dailyyashwant.com/?p=3550 मुंबई : टीम इंडियाचा स्टार खेळाडू आणि टी-20 क्रिकेटचा बादशहा असलेल्या सुर्यकुमार यादवबाबत मोठी बातमी समोर आली आहे. सुर्यकुमार यादव याच्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तीन दिवसांनी सुरू होणाऱ्या अफगाणिस्तानविरूद्धचा मालिकेसाठीही तो उपलब्ध नाही. आधीच दुखापत असताना सुर्याच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झालीये. सुर्या एका आजाराने ग्रस्त असून यावर उपचार घेण्यासाठी तो परदेशी जाणार असल्याची माहिती […]

The post स्टार खेळाडू सुर्यकुमार यादव ‘या’ आजाराने ग्रस्त, जर्मनीत होणार शस्त्रक्रिया appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
मुंबई : टीम इंडियाचा स्टार खेळाडू आणि टी-20 क्रिकेटचा बादशहा असलेल्या सुर्यकुमार यादवबाबत मोठी बातमी समोर आली आहे. सुर्यकुमार यादव याच्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तीन दिवसांनी सुरू होणाऱ्या अफगाणिस्तानविरूद्धचा मालिकेसाठीही तो उपलब्ध नाही. आधीच दुखापत असताना सुर्याच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झालीये. सुर्या एका आजाराने ग्रस्त असून यावर उपचार घेण्यासाठी तो परदेशी जाणार असल्याची माहिती समजत आहे. टीम इंडियाला वर्ल्डकप आणि आयपीएल तोंडावर असताना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

सुर्यकुमार यादव याला हर्नियाचं निदान झाल्याची माहिती समजत आहे.  सुर्या आता बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहे. हर्निया आजारावर उपचार घेण्यासाठी सुर्या जर्मनीमधील म्युनिक येथे जाणार आहे. सुर्यकुमार यादव याच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर रिकव्हर होण्यासाठी वेळ लागणार आहे. याबाबत अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे सुर्यकुमार यादव यंदाच्या आयपीएलमध्येही खेळताना दिसण्याची कमीच शक्यता आहे. आयपीएल न खेळल्यामुळे सूर्याचं वर्ल्ड कपमधील संघातील जागेवर प्रश्नचिन्ह आहे.

 

The post स्टार खेळाडू सुर्यकुमार यादव ‘या’ आजाराने ग्रस्त, जर्मनीत होणार शस्त्रक्रिया appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/star-player-suryakumar-yadav-suffering-from-this-disease-will-undergo-surgery-in-germany/3550/feed/ 0
टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेवर 78 धावांनी विजय, 2-1 ने मालिका जिंकली https://dailyyashwant.com/https-aajparbhani-in-team-india-beat-south-africa-by-78-runs-clinching-the-series-2-1-4939/3336/ https://dailyyashwant.com/https-aajparbhani-in-team-india-beat-south-africa-by-78-runs-clinching-the-series-2-1-4939/3336/#respond Fri, 22 Dec 2023 02:39:34 +0000 https://dailyyashwant.com/?p=3336 टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात 78 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 297 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 45.5 ओव्हरमध्ये 218 धावांवर गुंडाळलं. दक्षिण आफ्रिकेकडून टोनी डी झोर्झी याने सर्वाधिक 81 धावा केल्या.  भारतीय गोलंदाजांसमोर टोनी डी झोर्झीशिवाय एकालाही टिकता आलं नाही.  अर्शदीप […]

The post टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेवर 78 धावांनी विजय, 2-1 ने मालिका जिंकली appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात 78 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 297 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 45.5 ओव्हरमध्ये 218 धावांवर गुंडाळलं. दक्षिण आफ्रिकेकडून टोनी डी झोर्झी याने सर्वाधिक 81 धावा केल्या.  भारतीय गोलंदाजांसमोर टोनी डी झोर्झीशिवाय एकालाही टिकता आलं नाही.  अर्शदीप सिंह,  संजू सॅमसन आणि तिलक वर्मा,  हे तिकडी टीम इंडियाच्या विजयाची शिल्पकार ठरली. तर इतरांनीही चांगलं योगदान दिलं.  टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांची मालिका ही 2-1 ने जिंकली आहे.

दरम्यान त्याआधी दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही.काही विकेट्स गमावल्यानंतर मधल्या फळीत संजू सॅमसन, तिलक वर्मा आणि रिंकू सिंह या तिघांनी टीम इंडियासाठी निर्णायक भूमिका बजावली. संजू सॅमसन याने पहिलंवहिलं शतक तर तिलक वर्मा याने पहिलंवहिलं अर्धशतक लगावलं. तर रिंकू सिंह याने फिनिशिंग टच दिला.

टीम इंडियाकडून संजूने 108 आणि तिलकने 52 धावांची खेळी केली. तर रिंकूने अखेरी येऊन 38 धावा केल्या. या तिघांशिवाय रजत पाटीदार याने 22, कॅप्टन केएल याने 21 आणि साई सुदर्शनने 10 धावा केल्या. या व्यतिरिक्त इतरांना विशेष काही करता आलं नाही. टीम इंडियाने अशाप्रकारे 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 296 पर्यंत मजल मारली. दक्षिण आफ्रिकेकडून ब्यूरन हेंड्रिक्स याने 3 विकेट्स घेतल्या. नांद्रे बर्गर याला 2 विकेट्स मिळाल्या. तर लिझाद विल्यम्स, विआन मुल्डर आणि केशव महाराज या तिघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.

दक्षिण आफ्रिकेकडून ओपनर टोनी डी झोर्झी याने सर्वाधिक 81, रिझा हेंडीक्स 19, रॅसी व्हॅन डर ड्युसेन 2, कॅप्टन एडन मारक्रम 36 आणि हेनरिक क्लासेन याने 21 धावा केल्या. डेव्हिड मिलर याने 10, केशव महाराज याने 14 आणि ब्यूरन हेंड्रिक्स याने 18 धावांचं योगदान दिलं. नांद्रे बर्गर 1 वर नाबाद परतला. तर तिघांना 2 पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत. टीम इंडियाकडून अर्शदीप सिंह याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर मुकेश कुमार आणि अक्षर पटेल या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.

The post टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेवर 78 धावांनी विजय, 2-1 ने मालिका जिंकली appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/https-aajparbhani-in-team-india-beat-south-africa-by-78-runs-clinching-the-series-2-1-4939/3336/feed/ 0
पॅट कमिन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू https://dailyyashwant.com/pat-cummins-is-the-most-expensive-player-in-ipl-history/3236/ https://dailyyashwant.com/pat-cummins-is-the-most-expensive-player-in-ipl-history/3236/#respond Tue, 19 Dec 2023 09:45:22 +0000 https://dailyyashwant.com/?p=3236 दुबई : आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक बोली यावेळी IPL 2024 Auction मध्ये लागल्याचे पाहायला मिळाले. कारण यापूर्वी इंग्लंडचा सॅम करन हा आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू होता. गेल्या आयपीएलच्या लिलावात पंजाब किंग्स या संघाने करनला १८.५० कोटी रुपये देत आपल्या संघात सहभागी केले होती. पण या आयपीएलमध्ये मात्र सर्वाधिक पैसे मोजले ते सनरायझर्स हैदराबादच्या संघाने. हैदराबदच्या संघाने […]

The post पॅट कमिन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
दुबई : आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक बोली यावेळी IPL 2024 Auction मध्ये लागल्याचे पाहायला मिळाले. कारण यापूर्वी इंग्लंडचा सॅम करन हा आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू होता. गेल्या आयपीएलच्या लिलावात पंजाब किंग्स या संघाने करनला १८.५० कोटी रुपये देत आपल्या संघात सहभागी केले होती. पण या आयपीएलमध्ये मात्र सर्वाधिक पैसे मोजले ते सनरायझर्स हैदराबादच्या संघाने. हैदराबदच्या संघाने यावेळी तब्बल १० पट जास्त किंमत मोजली आणि मॅचविनर खेळाडूला आपल्या संघात स्थान दिले.

ऑस्ट्रेलियाने यावर्षी वनडे वर्ल्ड कप जिंकला. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या विजयात सर्वात मोलाचा वाटा उचलला होता तो कर्णधार पॅट कमिन्सने. त्यामुळे कमिन्सचे नाव जेव्हा लिलावात घेतले तेव्हा त्याच्यावर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांनी बोली लावायला सुरुवात केली. चेन्नई आणि मुंबई यांच्यात यावेळी चांगलीच चुरस रंगली होती. पण काही वेळात मुंबईच्या संघाने माघार घेतली आणि त्यामुळे चेन्नईचा संघ आता कमिन्सला आपल्या संघात स्थान देणार, असे वाटत होते. पण त्यावेळी हैदराबादच्या काव्या मारनने यावेळी लिलावात एंट्री घेतली. त्यानंतर चेन्नई आणि हैदराबाद यांच्यामध्ये बोली सुरु झाली. काही वेळात चेन्नईच्या संघानेही माघार घेतली. त्यामुळे आता कमिन्स हैदराबादच्या संघात जाईल, असे वाटत होते. पण त्यावेळी लिलावात एंट्री झाली ती आरसीबीच्या संघाची. त्यानंतर आरसीबी आणि हैदराबाद यांच्यामध्ये चांगलीच शर्यत रंगल्याचे पाहायला मिळाले. कारण हैदराबाद आणि आरसीबी या दोन्ही संघांनी कमिन्ससाठी मोठ्या बोली लावायला सुरुवात केली. त्यावेळी कोणताही संघ मागे हटण्याच्या तयारीत नव्हता. त्यामुळे तब्बल १० पट रक्कम कमिन्सला मिळाली. हैदराबादने अखेर २० कोटी ५० लाख रुपयांची बोली कमिन्सवर लावली. त्यानंतर आरसीबीने माघार घेतली आणि आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू हैदराबादच्या संघाने घेतला.

वर्ल्डकप गाजवणाऱ्या रचिन रवींद्रला किंमतच नाही

खरा धक्का तेव्हा बसला ज्यावेळी वर्ल्डकप गाजवणाऱ्या रचिन रवींद्रला  खूपच कमी बोली लावण्यात आली. न्यूझीलंडचा ऑलराऊंडर रचिन रवींद्रवर सर्वाधिक बोली लागेल, असा अंदाज लावला जात होता.  न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्रवर खूप कमी बोली लावली, तर त्याच्या नावासाठी मोठी बोली अपेक्षित होती. रचिन रवींद्रला चेन्नई सुपर किंग्सनं अवघ्या 1 कोटी 80 लाख रुपयांना विकत घेतलं आहे. या खेळाडूच्या नावावरही मोठी बोली लागेल, अशी अपेक्षा होती. मात्र, रचिन रवींद्रवर सर्वात कमी बोली लागली.

The post पॅट कमिन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/pat-cummins-is-the-most-expensive-player-in-ipl-history/3236/feed/ 0
अर्शदीप सिंगने रचला इतिहास https://dailyyashwant.com/history-made-by-arshdeep-singh/3198/ https://dailyyashwant.com/history-made-by-arshdeep-singh/3198/#respond Sun, 17 Dec 2023 14:48:51 +0000 https://dailyyashwant.com/?p=3198 जोहान्सबर्ग : अर्शदीप सिंगच्या भेदक माऱ्यापुढे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला गुडघे टेकावे लागले. पण या नेत्रदीपक कामगिरीसह आता अर्शदीपने इतिहास रचला आहे. कारण अर्शदीपसारखी कामगिरी कोणालाही करता आलेली नाही. अर्शदीप सिंगचा हा चौथा वनडे सामना होता, पण त्याला यापूर्वी एकही विकेट मिळवता आली नव्हती. पण अर्शदीपने ही सर्व कसर यावेळी भरून काढली. कारण अर्शदीपने या सामन्यात […]

The post अर्शदीप सिंगने रचला इतिहास appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
जोहान्सबर्ग : अर्शदीप सिंगच्या भेदक माऱ्यापुढे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला गुडघे टेकावे लागले. पण या नेत्रदीपक कामगिरीसह आता अर्शदीपने इतिहास रचला आहे. कारण अर्शदीपसारखी कामगिरी कोणालाही करता आलेली नाही.

अर्शदीप सिंगचा हा चौथा वनडे सामना होता, पण त्याला यापूर्वी एकही विकेट मिळवता आली नव्हती. पण अर्शदीपने ही सर्व कसर यावेळी भरून काढली. कारण अर्शदीपने या सामन्यात पाच विकेट्स मिळवत भारताच्या विजयाचा पाया रचला. आतापर्यंत टी-२० सामन्यात अर्शदीपने चांगली गोलंदाजी केली होती. पण या मालिकेतील पहिल्याच सामन्यात अर्शदीपने पाच बळी मिळवले आणि इतिहास रचला. आतापर्यंत भारताच्या कोणत्याही गोलंदाजाला दक्षिण आफ्रिकेत वनडे क्रिकेटमध्ये पाच विकेट्स मिळवता आले नव्हते. पण अर्शदीपने ही किमया आपल्या चौथ्याच वनडे सामन्यात करून दाखवली आहे.

अर्शदीपला यावेळी अवेश खानची चांगली साथ मिळाली. कारण अवेश खानने चार बळी मइळवत अर्शदीपला चांगली साथ दिली. या दोघांनी दक्षिण आफ्रिकेच्या ९ फलंदाजांना माघारी धाडले. त्यामुळे भारताला दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पहिल्या वनडे सामन्यात ११६ धावांवर ऑल आऊट करता आले. दक्षिण आफ्रिकेने यावेळी टॉस जिंकला आणि त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय किती चुकीचा होता हे अर्शदीपने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर दाखवून दिले.

अर्शदीपने आपल्या पहिल्याच षटकात विकेट मिळवली. अर्शदीप या सामन्यात हॅट्रीकवरही होता. कारण सलग दोन चेंडूंमध्ये त्याने विकेट्स मिळवल्या होत्या. पण यावेळी अर्शदीपला हॅट्रीक मिळवता आली नाही. पण हॅट्रीक मिळाली नसली तर अर्शदीपने यावेळी पाच विकेट्स मिळवल्या आणि भारतासाठी विजयाचा पाया रचला. त्यामुळे अर्शदीपने आपले काम चोख बजावले आहे. आता फलंदाज कशी कामगिरी करतात यावर भारताचा विजय अवलंबून असेल.

The post अर्शदीप सिंगने रचला इतिहास appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/history-made-by-arshdeep-singh/3198/feed/ 0
धोनीच्या सन्मानार्थ ७ नंबरची जर्सी रिटायर; BCCIचा मोठा निर्णय; नव्या खेळाडूंना सूचना जारी https://dailyyashwant.com/no-7-jersey-retired-in-honor-of-dhoni-bccis-big-decision-notice-issued-to-new-players/3151/ https://dailyyashwant.com/no-7-jersey-retired-in-honor-of-dhoni-bccis-big-decision-notice-issued-to-new-players/3151/#respond Fri, 15 Dec 2023 06:15:36 +0000 https://dailyyashwant.com/?p=3151 मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज कर्णधार महेंद्रसिंह धोनीची ७ क्रमांकाची जर्सी रिटायर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धोनीच्या निवृत्तीनंतर ३ वर्षांनी बीसीसीआयनं हा निर्णय घेतला आहे. धोनीनं त्याच्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ७ नंबरची जर्सी परिधान केली. ती जर्सी रिटायर करण्याचा घेण्यात आला आहे, अशी माहिती बीसीसीआयनं दिली आहे. धोनीची जर्सी रिटायर करण्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं […]

The post धोनीच्या सन्मानार्थ ७ नंबरची जर्सी रिटायर; BCCIचा मोठा निर्णय; नव्या खेळाडूंना सूचना जारी appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज कर्णधार महेंद्रसिंह धोनीची ७ क्रमांकाची जर्सी रिटायर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धोनीच्या निवृत्तीनंतर ३ वर्षांनी बीसीसीआयनं हा निर्णय घेतला आहे. धोनीनं त्याच्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ७ नंबरची जर्सी परिधान केली. ती जर्सी रिटायर करण्याचा घेण्यात आला आहे, अशी माहिती बीसीसीआयनं दिली आहे.

धोनीची जर्सी रिटायर करण्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे. याआधी असा सन्मान केवळ सचिन तेंडुलकरला मिळाला आहे. सचिननं त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत कायम १० क्रमांकाची जर्सी परिधान केली होती. ती रिटायर करण्याचा निर्णय बीसीसीआयनं २०१७ मध्ये घेतला होता. धोनीच्या ७ क्रमांकाची प्रतिष्ठित जर्सी आता अन्य कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूला परिधान करता येणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीनं दिलेल्या योगदानाबद्दल त्याचा जर्सी नंबर रिटायर करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

धोनीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियानं २००७ मध्ये टी-२० विश्वचषक, २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स चषक स्पर्धा जिंकली. धोनीनं १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. त्यानं २०१४ मध्येच कसोटी क्रिकेटला अलविदा केला होता.

बीसीसीआयनं टीम इंडियाच्या खेळाडूंना, विशेषत: पदार्पण करणाऱ्या खेळाडूंना याबद्दलची माहिती दिली आहे. तेंडुलकर आणि धोनीशी संबंधित जर्सीचे क्रमांक निवडण्याचा पर्याय तुमच्याकडे नाही, असं बीसीसीआयनं खेळाडूंना कळवलं आहे. धोनीचा जर्सी नंबर ७ निवडू नका, अशी सूचना नव्या खेळाडूंना देण्यात आल्याचं बीसीसीआयशी संबंधित अधिकाऱ्यानं दिली.

The post धोनीच्या सन्मानार्थ ७ नंबरची जर्सी रिटायर; BCCIचा मोठा निर्णय; नव्या खेळाडूंना सूचना जारी appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/no-7-jersey-retired-in-honor-of-dhoni-bccis-big-decision-notice-issued-to-new-players/3151/feed/ 0
खराब खेळपट्टीवर खेळला गेला वर्ल्ड कप फायनल सामना https://dailyyashwant.com/the-world-cup-final-match-was-played-on-a-bad-pitch/3018/ https://dailyyashwant.com/the-world-cup-final-match-was-played-on-a-bad-pitch/3018/#respond Fri, 08 Dec 2023 05:50:02 +0000 https://dailyyashwant.com/?p=3018 नवी दिल्ली: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून ६ विकेटने पराभूत झाला. या पराभवामुळे कोट्यवधी भारतीय चाहत्यांचे आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले. मात्र, अहमदाबादची खेळपट्टी अंतिम फेरीत अतिशय संथ होती आणि या प्रकरणावरही प्रश्न उपस्थित केले गेले. […]

The post खराब खेळपट्टीवर खेळला गेला वर्ल्ड कप फायनल सामना appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
नवी दिल्ली: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून ६ विकेटने पराभूत झाला. या पराभवामुळे कोट्यवधी भारतीय चाहत्यांचे आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले. मात्र, अहमदाबादची खेळपट्टी अंतिम फेरीत अतिशय संथ होती आणि या प्रकरणावरही प्रश्न उपस्थित केले गेले. आता आयसीसीनेही विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील खेळपट्टीचे रेटिंग केले आहे. ICC म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अंतिम सामन्यात वापरलेल्या खेळपट्टीला सरासरी रेटिंग दिले आहे.

एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्याची खेळपट्टी अतिशय संथ खेळत होती. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने केवळ २४० धावा केल्या, ज्याचा ऑस्ट्रेलियाने सहज पाठलाग केला. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सेमीफायनललाही आयसीसीने सरासरी रेटिंग दिली आहे.

आयसीसीचे सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी २०२३ च्या विश्वचषक फायनलच्या खेळपट्टीचे मूल्यांकन केले आहे. जवागल श्रीनाथ (ICC रेफरी आणि माजी भारतीय गोलंदाज) यांनी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या खेळपट्टीचे मूल्यांकन केले. याशिवाय भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या खेळपट्टीबद्दल बोलायचे झाले तर वानखेडेच्या खेळपट्टीला चांगले रेटिंग मिळाले आहे. सेमीफायनलच्या खेळपट्टीवर बराच गदारोळ सुरु होता. शेवटच्या क्षणी खेळपट्टी बदलण्यात आली आणि जुन्या खेळपट्टीवरच सामना खेळवण्यात आला.

The post खराब खेळपट्टीवर खेळला गेला वर्ल्ड कप फायनल सामना appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/the-world-cup-final-match-was-played-on-a-bad-pitch/3018/feed/ 0
तुम्हाला टी-२० वर्ल्ड कपसाठी मी हवा असेल तर मला आत्ताच सांगा – रोहित शर्मा https://dailyyashwant.com/if-you-want-me-for-t20-world-cup-tell-me-now-rohit-sharma/2926/ https://dailyyashwant.com/if-you-want-me-for-t20-world-cup-tell-me-now-rohit-sharma/2926/#respond Wed, 06 Dec 2023 02:14:38 +0000 https://dailyyashwant.com/?p=2926 बीसीसीआयच्या उच्च पदाधिकाऱ्यांनी अलीकडेच भारतीय क्रिकेटबद्दल विविध गोष्टींवर चर्चा करण्यासाठी भारतीय कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि निवड समितीसोबत मॅरेथॉन बैठक घेतली. भारताच्या एकदिवसीय विश्वचषक मोहिमेचा आढावा हा सर्वोच्च अजेंडा होता. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर ते उपविजेते ठरले. बीसीसीआयचे सचिव जय शाह, उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि खजिनदार आशिष शेलार यांनाही भारतीय क्रिकेटचा […]

The post तुम्हाला टी-२० वर्ल्ड कपसाठी मी हवा असेल तर मला आत्ताच सांगा – रोहित शर्मा appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
बीसीसीआयच्या उच्च पदाधिकाऱ्यांनी अलीकडेच भारतीय क्रिकेटबद्दल विविध गोष्टींवर चर्चा करण्यासाठी भारतीय कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि निवड समितीसोबत मॅरेथॉन बैठक घेतली. भारताच्या एकदिवसीय विश्वचषक मोहिमेचा आढावा हा सर्वोच्च अजेंडा होता. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर ते उपविजेते ठरले. बीसीसीआयचे सचिव जय शाह, उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि खजिनदार आशिष शेलार यांनाही भारतीय क्रिकेटचा रोडमॅप जाणून घ्यायचा होता, विशेषत: टी२० विश्वचषक अवघ्या सहा महिन्यांवर आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी एकदिवसीय, टी-20 आणि कसोटी संघांचीही या बैठकीत निवड करण्यात आली.

रोहित, नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत झूम कॉलद्वारे सामील झाला कारण तो त्यावेळी लंडनमध्ये होता, काही महिन्यांच्या नॉन-स्टॉप क्रिकेटनंतर आपल्या कुटुंबासोबत दर्जेदार वेळेचा आनंद घेत होता, असे बीसीसीआयचे उच्च अधिकारी आणि निवडकर्त्यांना सांगितले. जर त्यांना वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकाचा भाग व्हायचा असेल. दैनिक जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, बैठकीत उपस्थित असलेल्या एका अधिकाऱ्याने रोहित आणि इतरांमधील संभाषण कथन केले.

 निवडकर्त्यांना T20 वर्ल्ड कपच्या भविष्याबद्दल विचारले

रोहितने उपस्थित अधिकाऱ्यांना आणि अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निवड समितीला विचारले की त्यांनी त्याला टी-२० वर्ल्ड कपमध्ये खेळताना पाहिले आहे का? ‘तुम्हाला T20 विश्वचषकासाठी माझी निवड करायची असेल तर आता मला सांगा की त्याबद्दल कसे जायचे,’ रोहितने या बैठकीत सांगितले, हिंदी दैनिकात वृत्त आहे.

उपस्थित अधिकारी, प्रशिक्षक द्रविड आणि निवडकर्त्यांनी एकमताने सहमती दर्शवली की रोहित हा T20 विश्वचषकात संघाचे नेतृत्व करण्यासाठी योग्य माणूस आहे. अहवालात असे म्हटले आहे की निवडकर्त्यांना, खरं तर, रोहितने दक्षिण आफ्रिका दौर्‍यापासूनच T20I संघाची जबाबदारी स्वीकारावी अशी इच्छा होती परंतु अनुभवी सलामीवीराने संपूर्ण पांढऱ्या चेंडूपासून विश्रांती घेण्याची विनंती केली.

निवडकर्त्यांनी त्यास सहमती दर्शवली आणि 10 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपद कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे केएल राहुलकडे एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले. 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत रोहित कर्णधार म्हणून पुनरागमन करेल.

The post तुम्हाला टी-२० वर्ल्ड कपसाठी मी हवा असेल तर मला आत्ताच सांगा – रोहित शर्मा appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/if-you-want-me-for-t20-world-cup-tell-me-now-rohit-sharma/2926/feed/ 0