महाराष्ट्र Archives - Dainik Yashwant, Latur https://dailyyashwant.com/category/maharashtra/ Online Portal Sat, 18 May 2024 12:44:00 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 शिवभक्तांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ तुळजापुरात रास्ता रोको https://dailyyashwant.com/block-road-in-tuljapur-to-protest-lathi-charge-on-shiv-devotees/4407/ https://dailyyashwant.com/block-road-in-tuljapur-to-protest-lathi-charge-on-shiv-devotees/4407/#respond Sat, 18 May 2024 12:44:00 +0000 https://dailyyashwant.com/?p=4407 तुळजापूर,दि. 18 : धाराशिव शहरात छत्रपती संभाजी महाराज जयंती मिरवणुकीदरम्यान पोलिसांकडून शिवभक्तांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ शनिवारी तुळजापुरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. लाठीमार करणाऱ्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. तुळजापूर शहरातील जुन्या बस स्टॅन्ड समोरील चौकात शहरातील शिवशंभुप्रेमींनी रस्ता रोको आंदोलन करीत पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा निषेध नोंदवला. धाराशिव शहरातील इंगळे गल्ली […]

The post शिवभक्तांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ तुळजापुरात रास्ता रोको appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
तुळजापूर,दि. 18 : धाराशिव शहरात छत्रपती संभाजी महाराज जयंती मिरवणुकीदरम्यान पोलिसांकडून शिवभक्तांवर करण्यात आलेल्या
लाठीचार्जच्या निषेधार्थ शनिवारी तुळजापुरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. लाठीमार करणाऱ्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

तुळजापूर शहरातील जुन्या बस स्टॅन्ड समोरील चौकात शहरातील शिवशंभुप्रेमींनी रस्ता रोको आंदोलन करीत पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा निषेध नोंदवला. धाराशिव शहरातील इंगळे गल्ली परीसरात सन्मित्र गणेश मंडळाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करून
मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी मंडळाच्या कार्यकत्यांवर लाठीचार्ज केला. यामध्ये मंडळाचे पदाधिकारी, सदस्य जखमी झाले.
संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा राज्यभर
आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनावर माजी नगरसेवक अमर मगर, सुदर्शन वाघमारे, महेश गवळी, प्रशांत सोंजी,आण्णासाहेब क्षीरसागर, कुमार टोले, गिरीश लोहारेकर, सत्यजित साठे, अजय साळुंके, अनिल हंगरगेकर, बालाजी जाधव, परीक्षेत साळुंके, गणेश पाटील,दिनेश धनके, सौरभ धर्माधिकारी, ओमकार बोबडे, संतोष भोरे, अक्षय साळवे आदींसह शिवभक्तांची स्वाक्षरी आहे.

The post शिवभक्तांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ तुळजापुरात रास्ता रोको appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/block-road-in-tuljapur-to-protest-lathi-charge-on-shiv-devotees/4407/feed/ 0
लोकसभेला भाजपला मदत करा; आम्ही विठ्ठल कारखान्याला मदत करू https://dailyyashwant.com/help-bjp-in-lok-sabha-we-will-help-vitthal-factory/4402/ https://dailyyashwant.com/help-bjp-in-lok-sabha-we-will-help-vitthal-factory/4402/#respond Mon, 29 Apr 2024 07:09:11 +0000 https://dailyyashwant.com/?p=4402 राज्य सहकारी बॅंकेने केलेल्या कारवाईमुळे आर्थिक कचाट्यात अडकलेले विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी सोलापूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. विठ्ठल कारखान्याला मदत करण्याबाबत फडणवीस हे सकारात्मक असल्याचे दिसून आले. तसेच, तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही तुम्हाला मदत करू, असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे,’ अशी माहिती अभिजित पाटील यांनी फडणवीसांच्या […]

The post लोकसभेला भाजपला मदत करा; आम्ही विठ्ठल कारखान्याला मदत करू appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
राज्य सहकारी बॅंकेने केलेल्या कारवाईमुळे आर्थिक कचाट्यात अडकलेले विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी सोलापूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. विठ्ठल कारखान्याला मदत करण्याबाबत फडणवीस हे सकारात्मक असल्याचे दिसून आले. तसेच, तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही तुम्हाला मदत करू, असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे,’ अशी माहिती अभिजित पाटील यांनी फडणवीसांच्या भेटीनंतर दिली.

राज्य सहकारी बॅंकेने 430 कोटी रुपयांच्या थकीत प्रकरणात विठ्ठल सहकारी साखर काखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे. तीन गोदामेही सील केली आहेत. त्यामुळे अभिजित पाटील  यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर अभिजित पाटील हे माध्यमांशी बोलत होते. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर  झालेल्या जप्तीच्या कारवाईबाबतचा विषय आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातला आहे. आमचं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं आहे. शेतकऱ्यांची संस्था वाचविण्याची विनंती आम्ही फडणवीस यांना केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठल कारखान्याच्या मदतीबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. कारखान्यासाठी मदत करण्याचा त्यांनी शब्द दिला आहे आणि ते आम्हाला मदत करतील, अशी अपेक्षा आहे, असेही अभिजित पाटील यांनी स्पष्ट केले.

भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याबाबत आजच्या भेटीत कोणतीही चर्चा झालेली नाही. या भेटीत केवळ कारखान्याला मदत करण्याबाबत चर्चा झाली. भाजपमध्ये जण्याबाबत आमच्या दोघांमध्ये अजून तरी कसलीही चर्चा झाली नाही. असेही अभिजित पाटील यांनी स्पष्ट केले.

आम्हाला (लोकसभा निवडणुकीत) मदत करा, आम्ही तुम्हाला (विठ्ठल कारखाना जप्ती प्रकरण) मदत करू, असा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला दिला आहे. ते (देवेंद्र फडणवीस) आम्हाला मदत करत असतील, तर लोकसभा निवडणुकीत आम्ही देखील त्यांना (भाजपला) मदत करू, असे सांगून अभिजित पाटील यांनी भाजपला पाठिंबा देण्याबाबची भूमिका घेतल्याचे दिसून येते.

The post लोकसभेला भाजपला मदत करा; आम्ही विठ्ठल कारखान्याला मदत करू appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/help-bjp-in-lok-sabha-we-will-help-vitthal-factory/4402/feed/ 0
भाजपच्या बॅनरवर बेरोजगार तरुणाचे बॅनर https://dailyyashwant.com/banner-of-unemployed-youth-on-bjp-banner/4399/ https://dailyyashwant.com/banner-of-unemployed-youth-on-bjp-banner/4399/#respond Mon, 29 Apr 2024 06:41:06 +0000 https://dailyyashwant.com/?p=4399 पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा आज पुण्यातील रेसकोर्स मैदानावर होत आहे. त्या पार्श्वभूमीवर रेसकोर्स परिसरात मोदींच्या स्वागतासाठी बॅनर लावण्यात आले. पण याच बॅनरवर एका तरुणानं थेट त्याचे बॅनर लावले. त्यातून त्यानं रोजगार, नोकऱ्यांचे प्रश्न उपस्थित केले. हा प्रकार समजताच पोलिसांची एकच तारांबळ उडाली. विशेष म्हणजे या तरुणानं बॅनरवर त्याचं नाव आणि मोबाईल नंबरही छापला आहे. […]

The post भाजपच्या बॅनरवर बेरोजगार तरुणाचे बॅनर appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा आज पुण्यातील रेसकोर्स मैदानावर होत आहे. त्या पार्श्वभूमीवर रेसकोर्स परिसरात मोदींच्या स्वागतासाठी बॅनर लावण्यात आले. पण याच बॅनरवर एका तरुणानं थेट त्याचे बॅनर लावले. त्यातून त्यानं रोजगार, नोकऱ्यांचे प्रश्न उपस्थित केले. हा प्रकार समजताच पोलिसांची एकच तारांबळ उडाली. विशेष म्हणजे या तरुणानं बॅनरवर त्याचं नाव आणि मोबाईल नंबरही छापला आहे. त्यामुळे त्याला पोलिसांकडून चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राचे उद्योग परराज्यात घेऊन गेले. इथल्या प्रत्येक सुशिक्षित बेरोजगाराचा आक्रोश येणाऱ्या काळात तुम्हाला परवडणार नाही, असा इशारा बॅनरवरुन देण्यात आला होता. भाजपनं मोदींच्या स्वागतासाठी लावलेल्या बॅनरवर बरोजगारीचा प्रश्न विचारणारे बॅनर लावल्याचा प्रकार समोर येताच पोलिसांची धावपळ झाली. आयुष कांबळे नावाच्या तरुणानं हे बॅनर लावले होते. या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो होते. पोलिसांनी हे बॅनर खाली उतरवले.

आयुष कांबळे टेम्पो चालवून गुजरात करतो. तो सध्या पदवीचं शिक्षण घेत आहे. तरुणांना रोजगार मिळत नाही. सुशिक्षित तरुणांचा नोकऱ्या नाहीत. त्यामुळे कोणी तरी या प्रश्नांना वाचा फोडण्याची गरज होती. विरोधात बोलल्यावर कारवाई होणार याची कल्पना होती. आपणच का बोलू नये असा प्रश्न पडला. त्यामुळे तरुणांचा प्रश्न उपस्थित केला, असं आयुषनं सांगितलं.

आमच्या हक्काचे रोजगार राज्याबाहेर गेले. त्यामुळे तरुणांच्या नोकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. माझ्या मनात असलेले विचार मी बॅनरच्या माध्यमातून मांडले. मी हे कोणाच्याही सांगण्यावरुन केलेलं नाही. मी स्वत: ते फ्लेक्स बांधले आहेत. फ्लेक्स लावल्यावर दडपशाही होणार याची कल्पना होती. पण मी काहीही चुकीचं केलेलं नाही. त्या फ्लेक्सवर शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांचे फोटो आहेत. ही माझी दैवतं आहेत. ती माझ्याशी पाठिशी आहेत. मी कोणताही गु्न्हा केलेला नाही. पोलिसांकडून अद्याप तरी फोन आलेला नाही. काही कारवाई केल्यास कायदेशीर उत्तर देऊ, अशा शब्दांत आयुषनं बॅनर लावण्यामागील त्याचा हेतू सांगितला.

The post भाजपच्या बॅनरवर बेरोजगार तरुणाचे बॅनर appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/banner-of-unemployed-youth-on-bjp-banner/4399/feed/ 0
मुंबई, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पारा ४० पार https://dailyyashwant.com/mumbai-madhya-maharashtra-marathwada-and-vidarbha-with-mercury-below-40-par/4394/ https://dailyyashwant.com/mumbai-madhya-maharashtra-marathwada-and-vidarbha-with-mercury-below-40-par/4394/#respond Mon, 29 Apr 2024 05:51:45 +0000 https://dailyyashwant.com/?p=4394 मुंबई: राज्यामध्ये तापमानाचा पारा रविवारी चढा होता. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या तीनही विभागांमध्ये कमाल तापमान ४० अंशांपलीकडे नोंदले गेले. मुंबईतही कमाल तापमानाचा पारा ३८ अंशांहून अधिक असल्याची नोंद झाली. रविवारी लग्नाचा मुहूर्त असल्याने उष्णतेच्या लाटेचा सामना करत मुंबईकर इच्छित स्थळी पोहोचले. एप्रिलमधील ही दुसरी उष्णतेची लाट होती. मे महिन्यातही असेच वातावरण असू शकेल, असाही अंदाज […]

The post मुंबई, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पारा ४० पार appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
मुंबई: राज्यामध्ये तापमानाचा पारा रविवारी चढा होता. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या तीनही विभागांमध्ये कमाल तापमान ४० अंशांपलीकडे नोंदले गेले. मुंबईतही कमाल तापमानाचा पारा ३८ अंशांहून अधिक असल्याची नोंद झाली. रविवारी लग्नाचा मुहूर्त असल्याने उष्णतेच्या लाटेचा सामना करत मुंबईकर इच्छित स्थळी पोहोचले. एप्रिलमधील ही दुसरी उष्णतेची लाट होती. मे महिन्यातही असेच वातावरण असू शकेल, असाही अंदाज या निमित्ताने वर्तवण्यात येत आहे.

सांताक्रूझ येथे रविवारी ३८.१ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा ४.८ अंशांनी अधिक होते. राज्यभरात ४०च्या पुढे तापमानाचा पारा पोहोचला असताना सांताक्रूझ येथील कमाल तापमान आणि सरासरी तापमान यातील तफावत सर्वाधिक होती. मुंबईत रविवारी काही भागांमध्ये ४०हून अधिक तापमानाची जाणीव झाली. भारतीय हवामान विभागाची स्वयंचलित केंद्रे तसेच महापालिकेची नोंद यावर पूर्व उपनगरांमध्ये तापमानाचा पारा अधिक असल्याचे समोर आले.

भारतीय हवामान विभागाच्या स्वयंचलित केंद्राच्या नोंदीनुसार, विक्रोळी येथे ४५.२, कोपरखैरणे येथे ४३.१, राममंदिर येथे ४३.६, विद्याविहार येथे ४०.४, माटुंगा येथे ३७.३ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. या वातावरणाशी सामना करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांनी रविवारी एसी लोकल, एसी टॅक्सी यांचा अधिक वापर केला. कोरड्या, उष्ण झळांनी हैराण झालेले मुंबईकर वाऱ्याची झुळूक कधी येते या प्रतीक्षेत होते. मात्र हे वारेही उष्ण झळांचीच जाणीव अधिक करून देत होते.

आज, सोमवारीही ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यामध्ये रविवारप्रमाणेच उष्णतेची लाट अनुभवायला येऊ शकते, असे प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी सुषमा नायर यांनी सांगितले. या तीनही जिल्ह्यांत उद्या, मंगळवारीही वातावरण उष्ण आणि आर्द्रतायुक्त असेल असा अंदाज आहे.

वातावरण बदलामुळे उष्णतेच्या लाटांचे प्रमाण वाढत असल्याचे पर्यावरण अभ्यासक केदार गोरे यांनी सांगितले. यामध्ये शहरात झालेले काँक्रीटीकरण भर घालत आहे. या काळामध्ये शहरातील पाणथळ जागा टिकवणे आवश्यक आहे. पाणथळ जागा ही सर्वांत दुर्लक्षित परिसंस्था आहे. पाणथळ जागा टिकल्या तर उष्णतेच्या लाटेची परिणामकारकता काहीशी कमी होऊ शकेल, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्रात कोकण विभाग वगळता भारतीय हवामान विभागाच्या बहुतांश केंद्रांवर कमाल तापमानाचा पारा ४०हून अधिक होता. सोलापूर येथे सर्वाधिक ४३.७ अंश सेल्सिअस कमाल तापमान रविवारी नोंदले गेले. महाबळेश्वर येथे ३४.१ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. महाबळेश्वर आणि कुलाबा येथील कमाल तापमानात रविवारी केवळ ०.३ अंशांचा फरक होता. विदर्भात पावसाच्या परिणामाने गोंदिया, नागपूर येथे कमाल तापमानात घट झाली. अमरावती, वर्धा, बुलडाणा येथील कमाल तापमान ४० अंशांच्या आसपास होते. तर इतर केंद्रांवर ४०हून अधिक कमाल तापमानाची नोंद झाली.

The post मुंबई, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पारा ४० पार appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/mumbai-madhya-maharashtra-marathwada-and-vidarbha-with-mercury-below-40-par/4394/feed/ 0
मोदीजी तुम्हाला सहा भाऊ, योगी आदित्यनाथांना सात भावंडं, मग फक्त मुस्लिमांवरच टीका का? काँग्रेस नेत्याचा बिनतोड सवाल https://dailyyashwant.com/modiji-you-have-six-brothers-yogi-adityanath-has-seven-siblings-so-why-criticize-only-muslims-a-question-from-the-congress-leader/4388/ https://dailyyashwant.com/modiji-you-have-six-brothers-yogi-adityanath-has-seven-siblings-so-why-criticize-only-muslims-a-question-from-the-congress-leader/4388/#respond Tue, 23 Apr 2024 07:26:51 +0000 https://dailyyashwant.com/?p=4388 पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना सहा भावंडं आहेत, तर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचेही सहा-सात भावंडं आहेत. त्यामुळे जास्त मुलं असल्या संदर्भात मुस्लिमांवर टीका करू नका, अशी आठवण काँग्रेसचे (Congrss) मुस्लिम नेते पंतप्रधान मोदी यांना करून देत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्यात हिंदूं एवढेच योगदान मुस्लिमांचेही होते आणि मुस्लिम तर मृत्यूनंतर […]

The post मोदीजी तुम्हाला सहा भाऊ, योगी आदित्यनाथांना सात भावंडं, मग फक्त मुस्लिमांवरच टीका का? काँग्रेस नेत्याचा बिनतोड सवाल appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना सहा भावंडं आहेत, तर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचेही सहा-सात भावंडं आहेत. त्यामुळे जास्त मुलं असल्या संदर्भात मुस्लिमांवर टीका करू नका, अशी आठवण काँग्रेसचे (Congrss) मुस्लिम नेते पंतप्रधान मोदी यांना करून देत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्यात हिंदूं एवढेच योगदान मुस्लिमांचेही होते आणि मुस्लिम तर मृत्यूनंतर दफनही या जमिनीतच होतात, हे विसरू नका, असे वक्तव्य नागपूर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नैश नुसरत अली (Nash Nusrat Ali) यांनी केले आहे.

देशाच्या स्वातंत्र्यात मुस्लिमांचा समसमान योगदान असताना ही पंतप्रधान मुस्लिमांना घुसखोर म्हणत असतील, तर हे अत्यंत दुर्दैवी असल्याचेही नैश नुसरत अली म्हणाल्या. निवडणूक आयोग या संदर्भात काही कारवाई का करत नाही, याचे आश्चर्य वाटते. लवकरच काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात तक्रार करेल. काँग्रेस पक्षाने तक्रार केली नाही, तर वैयक्तिकरित्या मी पंतप्रधान यांच्या वक्तव्याची तक्रार आयोगाकडे करेल असेही नैश नुसरत अली म्हणाल्या.

…. मग मुस्लिम घुसखोर कसा?

या देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार हा मुस्लिम लोकांचा असल्याचं काँग्रेसने (Congrss) या आधीच आपल्या जाहिरनाम्यातून स्पष्ट केलंय, त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधत ज्यांना जास्त मुलं त्यांना जास्त संपत्ती मिळेल, असा याचा अर्थ असल्याचे सांगितले. काँग्रेसने आदिवासींच्या हिताकडे दुर्लक्ष केलं असून त्यांचा जाहीरनामा हा शहरी नक्षलवादाला बळ देणारा आहे, असा आरोपही पंतप्रधानांनी केला. अशातच काँग्रेसने याला प्रत्युत्तर दिलं असून मोदींकडे काही बोलण्यासारखं नसल्याने पुन्हा त्यांनी हिंदू-मुस्लिम असा वाद सुरू केल्याचा आरोप केलाय. देशाच्या स्वातंत्र्यात मुस्लिमांचा समसमान योगदान असताना ही पंतप्रधान मुस्लिमांना घुसखोर म्हणत असतील, तर हे अत्यंत दुर्दैवी असल्याची खंत नागपूर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नैश नुसरत अली यांनी बोलून दाखवली आहे. शिवाय या विरोधात आक्रमक पवित्रा घेत निवडणूक आयोगाकडे आपण तक्रार करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. त्यामुळे पंतप्रधानांच्या या वक्तव्याची निवडणूक आयोग कशा पद्धतीने दखल घेतं, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नेमकं काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी? 

राजस्थानमधील बांसवाडा येथे काँग्रेसवर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले, “काँग्रेसचा जाहीरनामा हा माओवादाला चालना देण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेस आता डाव्यांच्या जाळ्यात अडकली आहे. येथे आलेल्या एका मित्राने सांगितले की, काँग्रेसचा जाहीरनामा बघा. काँग्रेसचं सरकार आले तर तुमच्या मालमत्तेचे ऑडिट होईल. आई आणि बहिणींच्या सोन्याचे आणि दागिन्यांचे मूल्य देखील मोजले जाईल, त्याचं वाटपही हे लोक करतील. देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार हा मुस्लिमांचा आहे असं काँग्रेसने या आधीच म्हटलंय. तुमच्या संपत्तीवर यांचा अधिकार आहे का? हे लोक तुमच्या आया-बहिणींचे मंगळसूत्रही अंगावर राहू देणार नाहीत. भ्रष्टाचार हाच काँग्रेसचे शिष्टाचार आहे.

The post मोदीजी तुम्हाला सहा भाऊ, योगी आदित्यनाथांना सात भावंडं, मग फक्त मुस्लिमांवरच टीका का? काँग्रेस नेत्याचा बिनतोड सवाल appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/modiji-you-have-six-brothers-yogi-adityanath-has-seven-siblings-so-why-criticize-only-muslims-a-question-from-the-congress-leader/4388/feed/ 0
निवडणुकीच्या धामधुमीत शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून 47 लाख 60 हजार चोरीला https://dailyyashwant.com/47-lakh-60-thousand-was-stolen-from-the-account-of-the-school-education-department-in-the-frenzy-of-election/4385/ https://dailyyashwant.com/47-lakh-60-thousand-was-stolen-from-the-account-of-the-school-education-department-in-the-frenzy-of-election/4385/#respond Tue, 23 Apr 2024 07:14:39 +0000 https://dailyyashwant.com/?p=4385 मुंबई :  शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या (Education Department)  खात्यातून तब्बल 47 लाख 60 हजार चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपींनी शालेय शिक्षण विभागाचे बनावट स्टॅम्प, बनावट चेक आणि स्वाक्षरीद्वारे चार टप्यात 47 लाख 60 हजार काढल्याची (Maharashtra News) माहिती समोर आली आहे. शालेय शिक्षण विभागाचे बनावट स्टॅम्प, बनावट चेक आणि स्वाक्षरीद्वारे चार टप्यात 47 लाख 60 […]

The post निवडणुकीच्या धामधुमीत शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून 47 लाख 60 हजार चोरीला appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
मुंबई :  शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या (Education Department)  खात्यातून तब्बल 47 लाख 60 हजार चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपींनी शालेय शिक्षण विभागाचे बनावट स्टॅम्प, बनावट चेक आणि स्वाक्षरीद्वारे चार टप्यात 47 लाख 60 हजार काढल्याची (Maharashtra News) माहिती समोर आली आहे.

शालेय शिक्षण विभागाचे बनावट स्टॅम्प, बनावट चेक आणि स्वाक्षरीद्वारे चार टप्यात 47 लाख 60 हजार काढल्याची माहिती समोर आली आहे.  या प्रकरणी मरीनड्राइव्ह पोलिस ठाण्यात  चौघांवर कलम 419, 420, 465, 467, 471, 473, 34 भादवी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून काढण्यात आलेले पैसे हे नमिता बग, प्रमोद सिंग, तप कुमार, झितन खातून यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाल्याचे तपासात समोर आले आहे. हे चौघे कोण आहेत? यामागे नेमका कुणाचा हात आहे? याबाबत पोलिस अधिक चौकशी करत आहे.

शालेय शिक्षण विभागाच्या मंत्रालयातील बँकेत गैरप्रकार

शालेय शिक्षण विभागाच्या मंत्रालय येथील बँकेत असलेल्या खात्यातून हा गैरप्रकार घडला आहे.  मात्र अशा प्रकारे शासनाच्या खात्यातून पैसे चोरीला जाण्याचीही काही पहिली वेळ नाही. या आधी पर्यटन विभागाच्या खात्यातूनही अशाच प्रकारे 67 लाख चोरीला गेले होते. शासनाच्या खात्यातून अशा प्रकारे लाखो रुपये चोरीला जात असल्याने अनेकांच्य भूवया उंचावल्या आहे.

आरोपीची बँकेची खाती कोलकाता येथील 

ही गंभीर बाब आहे. हे पहिली वेळ नसून दुसरी वेळ आहे. महिन्याभरातील ही दुसरी घटना आहे. गेल्या महिन्यतच पर्यटन विभागाच्य खात्यातून 67 लाख चोरीला गेले होते. याचा तपास मरीन लाईन पोलिस करत आहे. एका महिन्यात दुसऱ्यांदा घटना घडत असून निवडणुकीच्या धामधुमीत शासनाचे विभागाकडे लक्ष आहे की नाही असाच सवाल या निमित्ताने उपस्थित आहे. मंत्रालयात जी बँक आहे तिथून ही रक्कम चोरीला गेली आहे. ज्या आरोपीच्या खात्यातून ही रक्कम चोरीला गेली आहे ही सर्व खाती कोलकाता येथील आहे. महिन्याभरातील ही दुसरी घटना असून आता तरी शासन काय करणार आहे का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

राज्याचा कारभार हाकणारी यंत्रणा सुरक्षित नाही

एका महिन्यात दुसऱ्यांदा ही घटना घडल्याने संपूर्ण राज्याचा कारभार हाकणारी यंत्रणा सुरक्षित नसल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. मंत्रालयात प्रवेश करताना प्रत्येकाची अगदी काटेकोरपणे तपासणी केली जाते. सीसीटीव्हीने सगळ्यांवर नजर असते तरीही हा प्रकार घडला आहे.  चोरीची बाब निदर्शनास ही येताच त्याने  चोरीची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांकडे गुन्हाही दाखल केला.

The post निवडणुकीच्या धामधुमीत शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून 47 लाख 60 हजार चोरीला appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/47-lakh-60-thousand-was-stolen-from-the-account-of-the-school-education-department-in-the-frenzy-of-election/4385/feed/ 0
10 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न https://dailyyashwant.com/attempted-sexual-assault-on-a-10-year-old-boy/4378/ https://dailyyashwant.com/attempted-sexual-assault-on-a-10-year-old-boy/4378/#respond Mon, 22 Apr 2024 09:08:51 +0000 https://dailyyashwant.com/?p=4378 पुणे : पुण्यातील (Pune Crime News)  वाघोली येथील  एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर शाळेतील शिपायाने  लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात पॉक्सो (POCSO)   अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पिडीत मुलाच्या आईने या संदर्भात पोलिसात तक्रार दिली आहे . अत्याचाराबाबत कोणाला  काही न सांगण्याची धमकी आरोपीने दिली होती. त्यामुळे […]

The post 10 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
पुणे : पुण्यातील (Pune Crime News)  वाघोली येथील  एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर शाळेतील शिपायाने  लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात पॉक्सो (POCSO)   अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पिडीत मुलाच्या आईने या संदर्भात पोलिसात तक्रार दिली आहे . अत्याचाराबाबत कोणाला  काही न सांगण्याची धमकी आरोपीने दिली होती. त्यामुळे पीडित मुलगा घाबरला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा 10 वर्षीय मुलगा हा वाघोलीमध्ये असलेल्या एका नामांकित शाळेत आहे. 19 एप्रिल रोजी फिर्यादी यांनी मुलाला  शाळेमध्ये सोडल्यानंतर आरोपीने पिडीत मुलाला त्याचे नाव विचारले. त्याच्याशी गोड बोलून त्याला ‘तू चित्रपट आवडतात का?’असे विचारले. पीडित मुलाने हो उत्तर दिल्यानंतर आरोपीने टॉयलेटमध्ये चल… मी तुला एक फिल्म दाखवतो असे म्हटले.  पिडीत मुलाने त्यांना नकार दिला. मात्र आरोपीने ‘इथले सगळे कॅमेरे बंद आहेत तू काही काळजी करू नकोस कोणाला काही समजणार नाही” असं सांगितलं आणि त्याच्यावर जबरदस्ती करू लागले.

पुण्यातील लोणी कंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आरोपीच्या या कृतीला घाबरून पिडीत मुलगा पळून गेला. थोड्या वेळाने आरोपी पुन्हा वर्गात येऊन “तुला इथेच फिल्म दाखवतो” असे बोलून त्यांनी मोबाईल मध्ये एक अश्लील वेबसाईट दाखवली आणि कोणाला काही सांगू नको अशी धमकी दिली.  पुण्यातील लोणी कंद पोलीस ठाण्यात या संपूर्ण प्रकरणी पॉक्सो केलं अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The post 10 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/attempted-sexual-assault-on-a-10-year-old-boy/4378/feed/ 0
लोकसभा निवडणूक भारतीय जनता पार्टी विरुद्ध भारतीय जनता अशी आहे https://dailyyashwant.com/lok-sabha-election-is-bharatiya-janata-party-vs-bharatiya-janata/4372/ https://dailyyashwant.com/lok-sabha-election-is-bharatiya-janata-party-vs-bharatiya-janata/4372/#respond Mon, 22 Apr 2024 07:10:23 +0000 https://dailyyashwant.com/?p=4372 अहमदपूर  : काँग्रेस पक्षाने गॅरंटी कार्ड जनतेला तेलंगणा, कर्नाटक निवडणुकीत दिले, तिथे काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये काँग्रेसने हे सर्व लागू केले. यासाठी भाजपने दहा वर्षांपूर्वी जे संकल्पपत्र जारी केले त्याचे काय झाले ते त्यांनी अगोदर सांगावे, असे आवाहन करुन भाजपने महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण केले, महायुतीने राज्यात आरक्षणाचे राजकारण केले, असे राजकारण यापूर्वी कधीही महाराष्ट्रात […]

The post लोकसभा निवडणूक भारतीय जनता पार्टी विरुद्ध भारतीय जनता अशी आहे appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
अहमदपूर  : काँग्रेस पक्षाने गॅरंटी कार्ड जनतेला तेलंगणा, कर्नाटक निवडणुकीत दिले, तिथे काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये काँग्रेसने हे सर्व लागू केले. यासाठी भाजपने दहा वर्षांपूर्वी जे संकल्पपत्र जारी केले त्याचे काय झाले ते त्यांनी अगोदर सांगावे, असे आवाहन करुन भाजपने महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण केले, महायुतीने राज्यात आरक्षणाचे राजकारण केले, असे राजकारण यापूर्वी कधीही महाराष्ट्रात घडले नाही. यामुळे ही निवडणूक भारतीय जनता पार्टी विरुद्ध भारतीय जनता अशी आहे. राज्यात राजकारणाचा बाजार मांडलेल्या भाजपला मतदारांनी धडा शिकवावा, असे आवाहन माजी मंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले.
रविवार दि. २१ एप्रिल रोजी माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी अहमदपूर तालुक्यातील हडोळती येथे लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली योवळी ते बोलत होते. यावेळी लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे, अहमदपूर विधानसभा मतदार संघाचे निरीक्षक माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लातूर जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे, अहमदपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. गणेश कदम, एन. आर. पाटील, चंद्रकांत मद्दे, संजय पवार, श्रीकांत बनसोडे, सिराज जहागीरदार. ज्योतीताई पवार, विलास पवार, नीलकंठ मिरकले, साजिद सय्यद, सोमेश्वर कदम, सांब महाजन, सलमान पटेल, कलीमुद्दिन अहमद, निलेश देशमुख, रामभाऊ बेलाळे, आरडी शेळके, विकास महाजन आदींसह, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, ही लढाई महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आहे. ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणीस यांच्या सभा होतील, तेथे महाविकास आघाडी जिंकेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी नांदेडला आले होते, पण सामान्य माणसाच्या जीवना बद्दल त्यांनी शब्द काढला नाही. शेतीमालाच्या हमीभावाबद्दल, शेतकरी कर्जमाफी, महागाई यासाठी काहीचे बोलले नाहीत. महायुतीने राज्यात आरक्षणाचे राजकारण केले, असे राजकारण यापूर्वी कधीही महाराष्ट्रात घडले नाही.
भाजपने दहा वर्षांपूर्वी जे संकल्पपत्र जारी केले त्याचे काय झाले ते त्यांनी सांगावे. काँग्रेसचे गॅरंटी कार्ड तेलंगणा, कर्नाटक निवडणुकीत जनतेला तिथे काँग्रेसने दिले. सत्तेत आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये काँग्रेसने हे सर्व लागू केले. त्याप्रमाणे देशात इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर काँग्रेस गॅरंटी कार्ड लागू करेल. सोयाबीन कापसाला भाव नाही, काँग्रेस गॅरंटी कार्डकडे पाहून मतदारांनी काँग्रेसला मतदान करावे. भाजपने महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण केले, माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडली, शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. महायुतीने राज्यात आरक्षणाचे राजकारण केले, असे राजकारण यापूर्वी कधीही महाराष्ट्रात घडले नाही. जात निहाय जनगणना करणे, हे इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर करेल. जातनिहाय जनगणना बिहारमध्ये झाली, महाराष्ट्रात ही झाली पाहिजे, ही निवडणूक भारतीय जनता पार्टी विरुद्ध भारतीय जनता अशी आहे. राज्यात राजकारणाचा बाजार भाजपने मांडला आहे. यामुळे मतदारांनी महायुतीला निवडणुकीत धडा शिकवावा. या गद्दारांना महाराष्ट्रातील लोकन्यायालयात जनताच सांगेल खरा पक्ष कोणता. पहिल्यांदा मतदान करण्याचा अधिकार मिळालेले असंख्य तरुण डॉ. शिवाजी काळगे यांच्या पाठीशी आहेत. अहमदपूर परिसरातील उसाची गॅरंटी मांजरा परिवार घेईल, नांदेड लातूर रोड रेल्वेचा विकासही आम्ही करणार आहोत, असे सांगून त्यांनी येत्या ७ मेला लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या नावासमोरील हात चिन्हाचे बटन दाबून त्यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
लोकांच्या प्रश्नाला भाजपने बगल 
दिली : माजी मंत्री विनायकराव  पाटील
माजी मंत्री विनायकराव पाटील म्हणाले की, जनतेने ही निवडणूक स्वत:च्या खांद्यावर हातावर घेतली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांचा प्रतिनिधी म्हणून प्रत्येक गावात जाऊन प्रचार करावा, लोकांच्या प्रश्नाला भाजपने बगल दिली. गेल्या दहा वर्षात शेतकरी खूप अडचणीत आला आहे. या लातूर जिल्ह्याचे नेतृत्व माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले तोच वारसा माजी मंत्री आमदार अमित देशमुख चालवत आहेत. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ही स्वत:च उमेदवार आहे असे समजून कामाला लागावे, असे असे सांगून त्यांनी येत्या ७ मे रोजी लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या नावासमोरील हात चिन्हाचे बटन दाबून त्यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.
भाजपच्या जाहिरातीला, थापाला बळी पडू नये: डॉ. शिवाजी काळगे
लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे म्हणाले की, महाविकास आघाडीने लोकसभेची उमेदवारी जाहीर करुन आज एक महिना झाला आहे. सर्वसामान्य जनतेने विचारपूर्वक आता मतदान करावे, भाजपच्या जाहिरातीला थापाला बळी पडू नये, भाजप सरकारने सर्वसामान्यांसाठी शेतक-यांसाठी कुठलेच काम केले नाही. शेतीमालाला हमीभाव, कर्ज माफी सारखे विषय सोडवले नाहीत. माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पाच लाख रुपये पर्यंतचे बिनव्याजी कर्ज शेतक-यांना देते.
मांजरा परिवाराने पंधराशे कोटी रुपये शेतक-यांना वितलित केले आहेत. काँग्रेस पक्षाने महिला, युवक, श्रमिक शेतक-यांसाठी न्याय गॅरंटी दिली आहे. प्रत्येक क्षेत्रात महागाई वाढली आहे. लातूरमध्ये आज रेल्वेची जाळ, पोस्टाच जाळ वाढवायची आहे, महिलांचे प्रश्न सोडवायचे आहेत, त्यामुळे त्यांनी येत्या ७ मे रोजी लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या नावासमोरील हात चिन्हाचे बटन दाबून मला विक्रमी मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. शिवाजी काळगे यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करावे
शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी म्हणाले की, भाजपने नुसत्या भुलथापा मारल्या, शेतक-याला देशोधडीला लावले, त्यांनी महागाई वाढवली, भाजप निवडून आल्यानंतर देशात पुन्हा निवडणुका होणार नाहीत, त्यामुळे त्यांनी येत्या ७ मे रोजी लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या नावासमोरील हात चिन्हाचे बटन दाबून त्यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमात अहमदपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. गणेश कदम, ज्योतीताई पवार, सिराज जहागीरदार यांनी मनोगत व्यक्त केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जाधव ज्ञानेश्वर जाधव यांनी केले.

The post लोकसभा निवडणूक भारतीय जनता पार्टी विरुद्ध भारतीय जनता अशी आहे appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/lok-sabha-election-is-bharatiya-janata-party-vs-bharatiya-janata/4372/feed/ 0
भाजपच्या मोठ्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याचा मविआचा प्लॅन होता https://dailyyashwant.com/maviyas-plan-was-to-put-senior-bjp-leaders-in-jail/4362/ https://dailyyashwant.com/maviyas-plan-was-to-put-senior-bjp-leaders-in-jail/4362/#respond Mon, 22 Apr 2024 06:46:54 +0000 https://dailyyashwant.com/?p=4362 मुंबई :  भाजपच्या (BJP)  मोठ्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याची तयारी मविआ सरकारने (Maha Vikas Aghadi)  केली होती असा गौप्यस्फोट टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री  एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde)  केलाय.  देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, गिरीश महाजन आणि प्रविण दरेकरांना  खोट्या केसेसमधे अडकवून त्यांना अटक करण्याचं षडयंत्र रचल होतं असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री शिंदेंनी केला आहे. एवढेच नाही तर 2024 […]

The post भाजपच्या मोठ्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याचा मविआचा प्लॅन होता appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
मुंबई :  भाजपच्या (BJP)  मोठ्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याची तयारी मविआ सरकारने (Maha Vikas Aghadi)  केली होती असा गौप्यस्फोट टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री  एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde)  केलाय.  देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, गिरीश महाजन आणि प्रविण दरेकरांना  खोट्या केसेसमधे अडकवून त्यांना अटक करण्याचं षडयंत्र रचल होतं असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री शिंदेंनी केला आहे. एवढेच नाही तर 2024 च्या निवडणुकांपूर्वी भाजपचे काही आमदार फोडण्याचाही प्लान होता, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे म्हणाले,  मविआ सरकारमध्ये मला खूप अपमानास्पद वागणूक मिळाली. आदित्य ठाकरेंचा माझ्या खात्यात खूप हस्तक्षेप होता. राज्यसभा उमेदवार निवडीत मला बाजूला ठेवून कहर केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरेंनी मला कायमच डावलले आहे. माझ्या नगरविकास खाते असताना मला कधीच स्वतंत्रपणे काम करु दिले नाही. कायम ठाकरे कुटुंबाकडून हस्तक्षेप होत होता.  मला कधीही स्वतंत्रपणे काम करू दिले गेले नाही. आदित्य ठाकरे कायमच ढवळाढवळ करत होते.   नगरविकास, एमएमआरडीए, सिडको आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या बैठकांना ते उपस्थित राहायचे. शिवसेनेतून बाहेर  पडण्यापूर्वी माझ्याकडून नगरविकास खाते काढून घेण्याचा ठाकरेंचा डाव होता.  मला  नक्षलवाद्यांकडून धमकी असूनही  त्यांनी मला Z+ सुरक्षा दिली नाही.

सुरतला जाताना उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना दिली ऑफर  

सुरतला जाण्याअगोदर एकनाथ शिंदेंना  मुख्यमंत्रीपदाची ऑफर होती या विषयी बोलताना  एकनाथ शिंदे म्हणाले,    मी सुरतला जाताना वसईतल्या एका चहाच्या टपरीवरुन उद्धव ठाकरेंना फोन केला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली. पण वेळ निघून गेलीय असे मी सांगितले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिल्लीतल्या भाजप नेत्यांना फोन करुन आपण पुन्हा एकत्र येऊ, एकनाथ शिंदेंसोबत का जाताय असे म्हटले, पण तोपर्यंत पुलाखालून खूप पाणी गेले होते.

शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदासाठी  उद्धव ठाकरेंचे नाव सुचवले नव्हते : मुख्यमंत्री 

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी  मुख्यमंत्रीपदासाठी  उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवल्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इन्कार केला. उलट ठाकरेंनी त्यांना मुख्यमंत्री करणार असल्याचे सांगितले होते, असे ते म्हणाले. जेव्हा महाविकस आघाडी सरकार स्थापन होत होते, तेव्हा मला मुख्यमंत्री केले जाईल या अपेक्षेने मला आणखी पोलिस बंदोबस्त मिळाला होता.  परंतु नंतर शरद पवार यांनी मला सांगितले की, ठाकरेंकडून आलेल्या लोकांनी मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावाची शिफारस केली होती.  त्यांनीच शरद पवारांना उद्धव ठाकरेंच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्याची विनंती केली होती.

उद्धव ठाकरेंना किंगमेकर नाही तर किंग बनण्याची इच्छा : एकनाथ शिंदे

उद्धव ठाकरेंचे स्वप्न मुख्यमंत्री बनण्याचे होते. महाविकास आघाडीची  स्थापना ही पूर्वनियोजित कट होती. वडिलांसारखे किंगमेकर होण्याऐवजी उद्धव यांना स्वतः राजा व्हायचे होते, असे शिंदे म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या इंग्रजी वृत्तपत्रातील मुलाखतीत काही नव्या गोष्टी देखील समोर आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,   शिवसेना 16 जागा लढवणार, मुंबईतल्या तीन असणार. म्हणजे उरलेल्या 6 पैकी पाच जागा शिवसेनेलाच मिळणार आहे.

आदित्यच्या मुख्यमंत्री होण्याच्या मार्गात मी अडथळा : एकनाथ शिंदे 

उद्धव ठकरेंच्या आदित्यला मुख्यमंत्री बनवण्याच्या गौप्यस्फोटावर देखील मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे.   उद्धव ठाकरे एका मुलाखतीत म्हणालेत, 2019 ला आदित्यला मुख्यमंत्री बनवून मी दिल्लीला जाईल, असा शब्द देवेंद फडणवीस यांनी मला दिला होता, असं दावा उद्धव ठाकरे यांनी केला.  या विषयी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले,  आदित्यच्या मुख्यमंत्री होण्याच्या मार्गात मी अडथळा ठरेन, असे त्यांना वाटत होते. पण त्यांना आदित्य बनवण्याची घाई होती.

 उमेदवार बदलणे ही पक्षाची अंतर्गत बाब : एकनाथ शिंदे 

सेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांना तिकिट नाकारण्यात आले याविषयी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले,  उमेदवार बदलणे ही पक्षाची अंतर्गत बाब होती. भाजपने आम्हाला उमेदवार बदलण्यास सांगण्याचा प्रश्नच येत नाही. शिवसेनेचा राज्यात 16 जागा लढवण्याचा मानस असून, मुंबईत तीन जागा आहेत.

The post भाजपच्या मोठ्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याचा मविआचा प्लॅन होता appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/maviyas-plan-was-to-put-senior-bjp-leaders-in-jail/4362/feed/ 0
मागच्या वर्षीच्या तुलनेत मराठवाड्यातील पाणीसाठ्यात मोठी घट https://dailyyashwant.com/big-decrease-in-water-storage-in-marathwada-compared-to-last-year/4355/ https://dailyyashwant.com/big-decrease-in-water-storage-in-marathwada-compared-to-last-year/4355/#respond Mon, 15 Apr 2024 03:45:16 +0000 https://dailyyashwant.com/?p=4355 राज्यातील पाणीसंकट(Water Crisis) अधिक गडद झालं आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत मराठवाड्यातील (Marathwada)  पाणीसाठ्यात मोठी घट झालीय. तर उत्तर महाराष्ट्रातही (North Maharashta) पाण्याची पातळी घटली असून धरणांमधील पाणीसाठा कमी झालाय. तर कोकण आणि विदर्भातील परिस्थिती तुलनेने बरी आहे. तर राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याची स्थितीही चिंताजनक आहे. मागील वर्षी अपेक्षित पाऊस झाला नसल्याने मराठवाड्यात (Marathwada) देखील पाण्याचा प्रश्न […]

The post मागच्या वर्षीच्या तुलनेत मराठवाड्यातील पाणीसाठ्यात मोठी घट appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
राज्यातील पाणीसंकट(Water Crisis) अधिक गडद झालं आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत मराठवाड्यातील (Marathwada)  पाणीसाठ्यात मोठी घट झालीय. तर उत्तर महाराष्ट्रातही (North Maharashta) पाण्याची पातळी घटली असून धरणांमधील पाणीसाठा कमी झालाय. तर कोकण आणि विदर्भातील परिस्थिती तुलनेने बरी आहे. तर राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याची स्थितीही चिंताजनक आहे. मागील वर्षी अपेक्षित पाऊस झाला नसल्याने मराठवाड्यात (Marathwada) देखील पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाण्याची टंचाई आणि दुष्काळाच्या झळा यामुळे बळीराजा मात्र हतबल झालाय.

राज्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्नही तितकाच गंभीर बनला आहे. हंडाभर पाण्यासाठी अनवाणी पावलांनी दाहीदिशा वणवण करण्याची वेळ महिलांवर आली आहे. उजनी धरणात शून्य टक्के पाणीसाठा असून मागील वर्षी याचवेळी 18 टक्के जलसाठा शिल्लक होता. कोयना धरणात 42 टक्के खडकवासला धरणात 55 टक्के पाणीसाठा आहे. लातूर, धाराशिव आणि बीडमधील  धरणांमधील परिस्थिती भीषण आहे. जायकवाडीतील धरणसाठा 16 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. मागील वर्षी याचवेळी जायकवाडीत  52  टक्के पाणीसाठा होता.

मराठवाड्यात जलसंकट निर्माण होण्याची शक्यता

मराठवाड्यात गत वर्षी 42 टक्क्यांवर असलेला पाणीसाठा यंदा मात्र फक्त 16 टक्क्यांवर आली आहे. उत्तर महाराष्ट्रात मागील वर्षी याचदिवशी 50 टक्क्यांवर असलेला धरणसाठा यंदा मात्र 25 टक्क्यावर आली आहे.  पश्चिम महाराष्ट्रातील पाणीसाठा 31 टक्क्यांवर, मागच्या वर्षी धरणांमध्ये जवळपास 39 टक्के जलसाठा होता. कोकण आणि विदर्भातील परिस्थिती तुलनेनं बरी आहे. कोकणात गतवर्षी  49  टक्के पाणीसाठा शिल्लक होता, यंदा धरणांमध्ये 47  टक्के पाणीसाठा  आहे.   पश्चिम विदर्भातील अमरावती विभागात 47  टक्के पाणीसाठा, मागील वर्षी याचवेळी 49 टक्के पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक होता. नागपूर विभागात मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होता. यंदा 44 टक्के धरणांमध्ये जलसाठा होता.  मागील वर्षी 28 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता .

उजनीत शून्य टक्के पाणीसाठा

उजनीत शून्य टक्के पाणीसाठा, मागील वर्षी याचवेळी 18 टक्के जलसाठा शिल्लक होता.  कोयना धरणात 42 टक्के जलसाठा शिल्लक होता.   पुण्यातील खडकवासला धरणात 55  टक्के पाणीसाठा  होता. लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यामधील धरणांमधील परिस्थिती भीषण परिस्थिती होती. जायकवाडीतील धरणसाठा 16  टक्क्यांपर्यंत खाली आला, मागील वर्षी याचवेळी जायकवाडीत 52  टक्के पाणीसाठा होता.  मराठवाड्यात जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे.

हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा वणवण 

छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात भीषण पाणीटंचाई जाणवते आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना दीड ते दोन किमी पर्यंत पायपीट करावी लागतेय. जीवघेणी कसरत करत खोल विहिरीतून पाणी भरावं लागतंय. लहान मुलं, वृद्ध महिलाही जीवावर उधार होवून पाण्यासाठी जीवघेणी कसरत करतायत. एरवी पाण्याचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयगावात यंदा मात्र दुष्काळाची स्थिती निर्माण झालीये. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि पणन मंत्री अब्दुल सत्तार यांचा हा मतदारसंघ आहे.. मात्र कुणालाच या पाणीसंकटाकडे लक्ष द्यायला वेळ नाही का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

The post मागच्या वर्षीच्या तुलनेत मराठवाड्यातील पाणीसाठ्यात मोठी घट appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/big-decrease-in-water-storage-in-marathwada-compared-to-last-year/4355/feed/ 0