देश-विदेश Archives - Dainik Yashwant, Latur https://dailyyashwant.com/category/globalnews/ Online Portal Thu, 11 Apr 2024 07:27:28 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.1 ४० विद्यार्थी असलेली स्कूल बस उलटली, ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू, १५ जखमी https://dailyyashwant.com/school-bus-carrying-40-students-overturns-6-students-killed-15-injured/4310/ https://dailyyashwant.com/school-bus-carrying-40-students-overturns-6-students-killed-15-injured/4310/#respond Thu, 11 Apr 2024 07:27:28 +0000 https://dailyyashwant.com/?p=4310 महेंद्रगड: हरयाणाच्या महेंद्रगड येथे भीषण अपघात झाला असून यामध्ये ६ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर १५ विद्यार्थी हे जखमी आहेत. सकाळच्या सुमारास स्कूल बस उलटून ही मोठी दुर्घटना घडली. महेंद्रगडच्या उन्हानी गावात हा भीषण अपघात झाला. मुलांना शाळेत घेऊन जाणारी स्कूल बल उलटून हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी […]

The post ४० विद्यार्थी असलेली स्कूल बस उलटली, ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू, १५ जखमी appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
महेंद्रगड: हरयाणाच्या महेंद्रगड येथे भीषण अपघात झाला असून यामध्ये ६ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर १५ विद्यार्थी हे जखमी आहेत. सकाळच्या सुमारास स्कूल बस उलटून ही मोठी दुर्घटना घडली. महेंद्रगडच्या उन्हानी गावात हा भीषण अपघात झाला. मुलांना शाळेत घेऊन जाणारी स्कूल बल उलटून हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी क्रेनच्या मदतीने बसला सरळ केलं. हा अपघात कसा झाला याचा तपास पोलिस करत आहेत. जेव्हा ही बस उलटली तेव्हा बसमध्ये ४० विद्यार्थी असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इदची शासकीय सुट्टी असूनही महेंद्रगडची जीएल पब्लिक स्कूल आज सुरु होती. हे मुलं स्कूलबसमध्ये बसून शाळेत जात होते. ही बस उन्हानी गावात पोहोचताच उलटली. या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले. जखमी विद्यार्थ्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाच विद्यार्थ्यांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झालेला होता, तर एकाच प्रकृती गंभीर होती. त्याला रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं मात्र काहीच वेळात त्याचाही मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि विद्यार्थ्यांचे पालक घटनास्थळी पोहोचले. सध्या रुग्णालयात जखमी विद्यार्थ्यांचा उपचार सुरु आहे. उपचार ही प्राथमिकता असून त्यानंतर या घटनेचा संपूर्ण तपास केला जाईल, असं पोलिसांनी सांगितलं.

 

The post ४० विद्यार्थी असलेली स्कूल बस उलटली, ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू, १५ जखमी appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/school-bus-carrying-40-students-overturns-6-students-killed-15-injured/4310/feed/ 0
लोकसभा निवडणुकीच्या तारखा उद्याच जाहीर होणार https://dailyyashwant.com/lok-sabha-election-dates-will-be-announced-tomorrow/4259/ https://dailyyashwant.com/lok-sabha-election-dates-will-be-announced-tomorrow/4259/#respond Fri, 15 Mar 2024 08:11:08 +0000 https://dailyyashwant.com/?p=4259 2024 च्या लोकसभा निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद उद्या 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे. त्यामुळे उद्यापासून लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. निवडणूक आयोगाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पत्रकार परिषद थेट प्रक्षेपित केले जाईल. (Loksabha Election 2024) या घोषणेमुळे लोकसभा निवडणुकीचा राजकीय लढाईचा टप्पा निश्चित होईल. ज्यामध्ये […]

The post लोकसभा निवडणुकीच्या तारखा उद्याच जाहीर होणार appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
2024 च्या लोकसभा निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद उद्या 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे. त्यामुळे उद्यापासून लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. निवडणूक आयोगाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पत्रकार परिषद थेट प्रक्षेपित केले जाईल. (Loksabha Election 2024)

या घोषणेमुळे लोकसभा निवडणुकीचा राजकीय लढाईचा टप्पा निश्चित होईल. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार दुर्मिळ तिसरी टर्म जिंकण्याची आशा करत आहे, तर विरोधक इंडिया आघाडीच्या अंतर्गत एनडीएमध्ये धक्का देण्याची आशा करत आहेत. दरम्यान, आदर्श आचारसंहिता निवडणकू घोषणा झाल्यानंतर लगेचच लागू होते, ती सुद्धा उद्याच होणार आहे.

यावेळी लोकसभेच्या निवडणुका 6 ते 7 टप्प्यात घेतल्या जातील असे मानले जात आहे. निवडणुका जाहीर होताच संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिताही लागू होणार आहे.

The post लोकसभा निवडणुकीच्या तारखा उद्याच जाहीर होणार appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/lok-sabha-election-dates-will-be-announced-tomorrow/4259/feed/ 0
भाजप खासदार ब्रिजेंद्र सिंह यांचा पक्षाला रामराम https://dailyyashwant.com/ramram-to-the-party-of-bjp-mp-brijendra-singh/4239/ https://dailyyashwant.com/ramram-to-the-party-of-bjp-mp-brijendra-singh/4239/#respond Sun, 10 Mar 2024 08:34:30 +0000 https://dailyyashwant.com/?p=4239 चंदीगड– हिसारमधील भाजप खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांनी एक्स मीडियावर पोस्ट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलंय की, राजकीय कारणासाठी भाजप पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. (Brijendra Singh Hisar MP resigns from BJP likely to join Congress with father Birender Singh Lok Sabha elections) ब्रिजेंद्र सिंह आपल्या पोस्टमध्ये म्हणालेत […]

The post भाजप खासदार ब्रिजेंद्र सिंह यांचा पक्षाला रामराम appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
चंदीगड– हिसारमधील भाजप खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांनी एक्स मीडियावर पोस्ट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलंय की, राजकीय कारणासाठी भाजप पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. (Brijendra Singh Hisar MP resigns from BJP likely to join Congress with father Birender Singh Lok Sabha elections)

ब्रिजेंद्र सिंह आपल्या पोस्टमध्ये म्हणालेत की, ‘पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी मला हिसार लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.’ ब्रिजेंद्र सिंह गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्रिजेंद्र सिंह हे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. माजी केंद्रीय मंत्री बिरेंद्र सिंह आणि भाजप खासदार ब्रिजेंद्र सिंह हे दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. त्यांच्याशी चर्चा करुन पुढील निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. हरियाणात लोकसभेच्या १० जागा आहेत. भाजपने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सर्व जागांवर विजय मिळवला होता.

ब्रिजेंद्र सिंह यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ३,१४, ०६८ मतांनी विजय झाले होते. ते केंद्रीय मंत्री बिरेंद्र सिंह यांचे पुत्र आहेत. तसेच त्यांनी आएएसची नोकरी सोडून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. त्यांचे वडील बिरेंद्र सिंह २०२२ पर्यंत राज्यसभा खासदार होते. ते पाचवेळा उचाना मतदारसंघातून आमदार होते. तसेच हरियाणा सरकारमध्ये मंत्री देखील राहिले आहेत.

The post भाजप खासदार ब्रिजेंद्र सिंह यांचा पक्षाला रामराम appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/ramram-to-the-party-of-bjp-mp-brijendra-singh/4239/feed/ 0
मंत्रालयाला भीषण आग, चार मजले आगीच्या भक्ष्यस्थानी https://dailyyashwant.com/massive-fire-at-ministry-four-floors-gutted-by-fire/4233/ https://dailyyashwant.com/massive-fire-at-ministry-four-floors-gutted-by-fire/4233/#respond Sat, 09 Mar 2024 06:30:00 +0000 https://dailyyashwant.com/?p=4233 मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये अग्नितांडव पाहायला मिळत आहे. भोपाळमध्ये राज्य सरकारच्या मंत्रालयाला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. इमारतीच्या चार मजल्यापर्यंत आग पसरली आहे.  मंत्रालयाच्या इमारतीच्या पहिल्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. भोपाळमधील वल्लभ भवन राज्य सचिवालयाला शनिवारी सकाळी भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे. मंत्रालयाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यापर्यंत आग […]

The post मंत्रालयाला भीषण आग, चार मजले आगीच्या भक्ष्यस्थानी appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये अग्नितांडव पाहायला मिळत आहे. भोपाळमध्ये राज्य सरकारच्या मंत्रालयाला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. इमारतीच्या चार मजल्यापर्यंत आग पसरली आहे.  मंत्रालयाच्या इमारतीच्या पहिल्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

भोपाळमधील वल्लभ भवन राज्य सचिवालयाला शनिवारी सकाळी भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे. मंत्रालयाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यापर्यंत आग पसरली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

भोपाळच्या सचिवालयात अचानक आग लागल्याची बातमी समोर आली आहे. 9 मार्चला सकाळी सचिवालयाच्या इमारतीतून काळ्या धुराचे लोट बाहेर पडताना दिसले. आग भीषण असल्याचा अंदाज घटनास्थळावरील व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या धुरावरून लावता येतो. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग नेमकी कशामुळे लागली, याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

भोपाळमधील अरेरा हिल्सवर असलेल्या वल्लभ भवनाच्या तिसऱ्या मजल्यावर शनिवारी सकाळी आग लागली. इमारतीच्या खिडकीतून धूर निघत असल्याचे लोकांनी पाहिल्यानंतर एकच गोंधळ उडाला. तातडीने ही माहिती महापालिकेच्या अग्निशमन नियंत्रण कक्षाला देण्यात आली. यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्याचं काम सुरू केलं. महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने मंत्रालयात कर्मचारी नव्हते. सध्या वल्लभ भवन प्रशासनाने नुकसानीची कोणतीही माहिती दिलेली नाही.

गेट क्रमांक 5 आणि 6 मधील मोठ्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली, ती पाचव्या मजल्यापर्यंत पसरली. आग वाऱ्यासह वेगाने पसरली. अग्निशमन दलाचे पाच जवान अडकल्याचे सांगण्यात येत आहे. इमारतीतून उठणाऱ्या ज्वाळा आणि धूर दुरूनच दिसत आहेत. या आगीत अनेक महत्त्वाची सरकारी कागदपत्रे जळून खाक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या आगीच्या घटनेवर चिंता व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले आहेत.

The post मंत्रालयाला भीषण आग, चार मजले आगीच्या भक्ष्यस्थानी appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/massive-fire-at-ministry-four-floors-gutted-by-fire/4233/feed/ 0
ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचे दीर्घ आजाराने निधन https://dailyyashwant.com/veteran-singer-pankaj-udhas-passed-away-after-prolonged-illness/4156/ https://dailyyashwant.com/veteran-singer-pankaj-udhas-passed-away-after-prolonged-illness/4156/#respond Mon, 26 Feb 2024 11:31:02 +0000 https://dailyyashwant.com/?p=4156 आपल्या जादूई आवाजाने मागील अनेक दशके रसिकांच्या मनावर राज्य करणारे गझल गायक पंकज उधास यांचे दीर्घ आजाराने आज निधन झाले.  ते 72 वर्षांचे होते.  त्यांच्या निधनाबाबतची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली.  पंकज उदास यांनी गायलेली अनेक गाणी, गझल आजही संगीतप्रेमींच्या ओठांवर आहेत. त्यांच्या या निधनावर चित्रपटसृष्टी आणि संगीत क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.   आज सकाळी […]

The post ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचे दीर्घ आजाराने निधन appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
आपल्या जादूई आवाजाने मागील अनेक दशके रसिकांच्या मनावर राज्य करणारे गझल गायक पंकज उधास यांचे दीर्घ आजाराने आज निधन झाले.  ते 72 वर्षांचे होते.  त्यांच्या निधनाबाबतची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली.  पंकज उदास यांनी गायलेली अनेक गाणी, गझल आजही संगीतप्रेमींच्या ओठांवर आहेत. त्यांच्या या निधनावर चित्रपटसृष्टी आणि संगीत क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.   आज सकाळी 11 वाजता ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज उधास यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. (Pankaj Udhas Passed Away)

पंकज उधास यांनी गझल गायकीच्या क्षेत्रात आपले एक स्थान निर्माण केले.  1980 मध्ये आहत नावाच्या अल्बमच्या मार्फत त्यांनी आपल्या यशस्वी कारकीर्दीची सुरुवात केली.  या अल्बमने त्यांना व्यावसायिक यशाचे दरवाजे खुले झाले. पंकज उधास यांचे मुकरार, तरन्नम, मेहफिल आदी गाणी चांगलीच लोकप्रिय झाली.

गझल गायक म्हणून यश मिळवल्यानंतर,  महेश भट्ट यांच्या नाम या चित्रपटात पंकज उधास दिसले होते. चिठ्ठी आयी है या गाण्यातून पंकज उधास घराघरात पोहचले. त्यानंतर अनेक हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. जगभरातील अल्बम आणि लाइव्ह कॉन्सर्टमुळे त्यांना गायक म्हणून प्रसिद्धी मिळाली. 2006 मध्ये संगीत क्षेत्रातील योगदानासाठी पंकज उधास यांना पद्मश्री  या  भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आले.

चांगला मित्र गमावला: सुरेश वाडकर

पंकज उधास यांनी आपल्या गझलने समस्त दुनियेला आनंद दिला. ते आपल्यातून गेले, ही धक्कादायक बातमी आहे. पंकज उधास यांचं जाणं फारच वाईट झालं, त्यांच्या कुटुंबाबत विचार करुन माझ्या अंगावर काटा येतोय. पंकज उधास यांच्या खजाना या अल्बमचं पुन्हा येणार होते.  माझ्या शाळेत त्याच्या रिहर्सल्स सुरु होत्या.  पंकज उधास उच्चशिक्षित होता, इतका मोठा गाणारा माणूस, चांगला मित्र आज आम्ही गमावला. त्यांच्या कुटुंबीयांना इतका मोठा धक्का पचवण्याची शक्ती इश्वर देवो, ही प्रार्थना अशा शब्दात ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी शोक व्यक्त केला.

पंकज उधास यांच्या निधनाने गझलचे मोठे नुकसान : भीमराव पांचाळे

पंकज उधास यांचं जाणं हे गझलचं मोठं नुकसान आहे. आमच्या कमी भेटी झाल्या, पण त्या लक्षात राहणाऱ्या होत्या. खूप मोठा माणूस होता. अतिशय साधा आणि संवादी पद्धतीने गझल सादर करत होते.  त्यांच्या गायकीची वेगळी पद्धत निर्माण झाली होती, ती अतिशय लोकप्रिय होती. त्यांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली. गझल गायक क्षेत्रात खूप संख्या कमी आहे. अन्य गायकांच्या तुलनेत ही संख्या कमी आहे, त्यात असे मोहरे जाणं हे धक्कादायक आहे. आमच्या गझल क्षेत्राचं मोठं नुकसान आहे, अशी प्रतिक्रिया गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी दिली.

पंकज उधास यांची लोकप्रिय गाणी

चिट्टी आयी है…

और आहिस्ता कीजिए बातें….

ना कजरे की धार…

चांदी जैसा रंग है तेरा…

मत कर इतना गुरुर….

आज फिर तुम पर प्यार आया है….

The post ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचे दीर्घ आजाराने निधन appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/veteran-singer-pankaj-udhas-passed-away-after-prolonged-illness/4156/feed/ 0
खाण्यापिण्यावर तर नाही, मग भारतीय सर्वाधिक पैसे कुठे खर्च करतात? https://dailyyashwant.com/if-not-on-food-and-drink-then-where-do-indians-spend-the-most-money/4145/ https://dailyyashwant.com/if-not-on-food-and-drink-then-where-do-indians-spend-the-most-money/4145/#respond Mon, 26 Feb 2024 09:27:07 +0000 https://dailyyashwant.com/?p=4145 गेल्या 10 वर्षात भारतीयांच्या एकूण घरगुती खर्चात  मोठा बदल झाल्याचं सांगण्यात आलं आहे. सर्वेक्षणानुसार, भारतीयांचा घरगुती खर्च दुप्पट झाला आहे, तर लोकांचा खाण्या-पिण्यावरील खर्च कमी झाला आहे. म्हणजे लोक खाण्यापिण्याऐवजी इतर गोष्टींवर जास्त खर्च करत असल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं आहे. सांख्यिकी मंत्रालयानं  भारतीय कुटुंबांच्या घरगुती खर्चासंदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. गेल्या दहा वर्षांत भारतीय […]

The post खाण्यापिण्यावर तर नाही, मग भारतीय सर्वाधिक पैसे कुठे खर्च करतात? appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
गेल्या 10 वर्षात भारतीयांच्या एकूण घरगुती खर्चात  मोठा बदल झाल्याचं सांगण्यात आलं आहे. सर्वेक्षणानुसार, भारतीयांचा घरगुती खर्च दुप्पट झाला आहे, तर लोकांचा खाण्या-पिण्यावरील खर्च कमी झाला आहे. म्हणजे लोक खाण्यापिण्याऐवजी इतर गोष्टींवर जास्त खर्च करत असल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

सांख्यिकी मंत्रालयानं  भारतीय कुटुंबांच्या घरगुती खर्चासंदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. गेल्या दहा वर्षांत भारतीय कुटुंबांचा घरगुती खर्च दुपटीनं वाढल्याचं या अहवालातून समोर आलं आहे. या अहवालात असं समोर आलं आहे की, भारतीय आता त्यांच्या घरातील खाद्यपदार्थांवर कमी खर्च करत आहेत, तर ब्लूमबर्गच्या या अहवालात सरकारी आकडेवारीचा हवाला देत असं म्हटलं आहे की, भारतीय आता कपडे, टेलिव्हिजन सेट आणि मनोरंजनाशी संबंधित वस्तूंवर जास्त खर्च करत आहेत.

शहरं आणि खेड्यांमध्ये खाण्यापिण्यावरील खर्च कमी 

सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार, समोर आलेल्या माहितीची जर एका दशकाशी तुलना करण्यात आली आहे. यावर जर नजर टाकली तर, ग्रामीण भागातील मासिक खर्चात खाण्यापिण्याचा वाटा 2011-12 च्या तुलनेत 53 टक्के होता, तो आता 46.4 टक्के झाला आहे. शहरी भागांबाबत बोलायचं झालं तर या काळात खर्चातील अन्नाचा वाटा 42.6 टक्क्यांवरुन 39.2 टक्क्यांवर आला आहे. शहरी भागात अन्नाऐवजी अखाद्य पदार्थांचा वाटा 57.4 टक्क्यांवरून 60.6 टक्क्यांपर्यंत वाढला आहे, तर ग्रामीण भागात 47 टक्क्यांवरून 53.6 टक्क्यांवर पोहोचला आहे.

ऑगस्ट 2022 ते जुलै 2023 दरम्यान करण्यात आलेल्या या सर्वेक्षणातून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. लोकांच्या एकूण खर्चाच्या वाढीबाबत जे चित्र निर्माण झालं आहे, त्यावरुन अंदाज बांधता येईल की, शहरी भागात सरासरी मासिक दरडोई ग्राहक खर्च अंदाजे 6,459 रुपयांपर्यंत वाढला आहे, जो 2011-12 मध्ये सुमारे 2,630 रुपये होता. रुपये होते. या कालावधीत, ग्रामीण भागातील आकडा 1,430 रुपयांवरून अंदाजे 3,773 रुपयांपर्यंत वाढला आहे. या पद्धतीने पाहिल्यास गेल्या 11 वर्षांत खाद्यपदार्थ आणि इतर वस्तू आणि सेवांवरील मासिक खर्च सरासरी अडीच पटीनं वाढला आहे.

कंज्युमर सर्वेचा वापर नेमका कुठे होतो? 

कौटुंबिक उपभोग खर्च सर्वेक्षणाच्या या आकड्यांवर नजर टाकल्यास हे स्पष्ट होतं की, भारतीयांच्या एकूण खर्चात खाद्यपदार्थांचा वाटा कमी झाला आहे, तर दुसरीकडे प्रवास आणि इतर गोष्टींवरील खर्च वाढला आहे. हे लक्षात घेण्यासारखं आहे की, या ग्राहक सर्वेक्षणाला खूप महत्त्व आहे आणि अर्थव्यवस्थेतील मागणीतील चढउतारांचा डेटा सादर केला जातो, हा डेटा सरकार किरकोळ महागाई आणि GDP मोजण्यासाठी वापरला जातो. रीडजस्ट करण्यासाठी देखील वापरला जातो.

The post खाण्यापिण्यावर तर नाही, मग भारतीय सर्वाधिक पैसे कुठे खर्च करतात? appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/if-not-on-food-and-drink-then-where-do-indians-spend-the-most-money/4145/feed/ 0
सुप्रसिद्ध निवेदक अमीन सयानी यांचे निधन https://dailyyashwant.com/renowned-narrator-amin-sayani-passed-away/4091/ https://dailyyashwant.com/renowned-narrator-amin-sayani-passed-away/4091/#respond Wed, 21 Feb 2024 06:54:52 +0000 https://dailyyashwant.com/?p=4091 मुंबई : रेडिओ, विविध भारतीवरील लोकप्रिय अनाऊंसर, निवेदक आणि टॉक शो होस्ट अमीन सयानी यांचं निधन झालं आहे. मंगळवारी संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ९१व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. अमीन सयानी यांचा मुलगा राजिल सयानी यांनी त्यांच्या निधनाचं वृत्त दिलं आहे. अमीन सयानी यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना मुंबईतील एच.एन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात […]

The post सुप्रसिद्ध निवेदक अमीन सयानी यांचे निधन appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
मुंबई : रेडिओ, विविध भारतीवरील लोकप्रिय अनाऊंसर, निवेदक आणि टॉक शो होस्ट अमीन सयानी यांचं निधन झालं आहे. मंगळवारी संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ९१व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. अमीन सयानी यांचा मुलगा राजिल सयानी यांनी त्यांच्या निधनाचं वृत्त दिलं आहे.

अमीन सयानी यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना मुंबईतील एच.एन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. अमीन सयानी यांना उच्च रक्तदाब आणि वृद्धापकाळासंबंधी इतर आजार होते. मागील १२ वर्षांपासून ते पाठीच्या दुखण्याने त्रस्त होते. त्यामुळेच त्यांना चालण्यासाठी वॉकरचा आधार घ्यावा लागत होता. अखेर २० फेब्रुवारी रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

रेडिओ सिलोन आणि विविध भारतीवर जवळपास ४२ वर्ष त्यांच्या हिंदी गाण्यांचा कार्यक्रम ‘बिनाका गीतमाला’ ने अनेक रेकॉर्ड मोडित काढले होते. अमीन सयानी यांना १९५२ मधील गीतमाला शोमधून मोठी लोकप्रियता मिळाली होती. त्यावेळी हा नंबर वन शो होता. १९५२ ते १९९४ पर्यंत शो तुफान गाजला. नंतर २००० ते २००१ आणि २००१ ते २००३ पर्यंत काही बदल करुन शो पुन्हा टेलीकास्ट करण्यात आला होता. त्यांच्या आवाजाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं.

अमीन सयानी यांच्या नावे तब्बल ५४ हजारहून अधिक रेडिओ कार्यक्रम प्रोड्यूस करणं, त्याला आवाज देण्याचा रेकॉर्ड आहे. त्याशिवाय जवळपास १९ हजार जिंगल्सला आजाव देण्यासाठीही अमीन सयानी यांचं नाव लिम्का बुक्स ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवण्यात आलं आहे.

४० ते ४५ वर्षांपूर्वी मुंबईतील रेडिओ स्टूडिओमध्ये बिग बी ऑडिशन देण्यासाठी पोहोचले होते. पण अमिताभ बच्चन त्यांच्या भेटीची वेळ न घेताच त्यांना भेटण्यासाठी पोहोचले होते. त्यामुळेच सयानी यांनी बिग बींना भेटण्यास नकार दिला होता आणि बिग बींचा आवाज न ऐकताच त्यांना रिजेक्ट केलं होतं.

The post सुप्रसिद्ध निवेदक अमीन सयानी यांचे निधन appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/renowned-narrator-amin-sayani-passed-away/4091/feed/ 0
“भ्रष्टाचाऱ्यांचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा”; शरद पवार https://dailyyashwant.com/one-slogan-of-corrupt-people-bjp-is-better-than-jail-sharad-pawar/4077/ https://dailyyashwant.com/one-slogan-of-corrupt-people-bjp-is-better-than-jail-sharad-pawar/4077/#respond Tue, 20 Feb 2024 17:40:25 +0000 https://dailyyashwant.com/?p=4077 कोल्हापूर: कामगार नेते स्वर्गीय गोविंद पानसरे यांची हत्या होऊन नऊ वर्षे झाली तरी त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्यात सर्वच यंत्रणा अयशस्वी ठरल्या आहेत. मात्र त्यांची हत्या झाली असली तरी गोविंद पानसरे यांचे कार्य, रस्त्यावरील संघर्ष हे त्यांचे अनुयायी आज ही पुढे घेऊन जात आहेत. कॉ. गोविंद पानसरे यांचे कार्य आणि संघर्ष नव्या पिढीला कळावे व प्रेरणा […]

The post “भ्रष्टाचाऱ्यांचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा”; शरद पवार appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
कोल्हापूर: कामगार नेते स्वर्गीय गोविंद पानसरे यांची हत्या होऊन नऊ वर्षे झाली तरी त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्यात सर्वच यंत्रणा अयशस्वी ठरल्या आहेत. मात्र त्यांची हत्या झाली असली तरी गोविंद पानसरे यांचे कार्य, रस्त्यावरील संघर्ष हे त्यांचे अनुयायी आज ही पुढे घेऊन जात आहेत. कॉ. गोविंद पानसरे यांचे कार्य आणि संघर्ष नव्या पिढीला कळावे व प्रेरणा मिळावी, यासाठी कोल्हापुरात त्यांच्या स्मारक उभारण्यात आले असून स्मारकाचा उद्घाटन सोहळा ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते व शाहू छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली प्रतिभानगर येथील वि. स. खांडेकर प्रशालेच्या प्रांगणात पार पडला.

पानसरे स्मारकाचे लोकार्पण

नऊ वर्षापूर्वी कॉम्रेड गोविंद पानसरे हे मॉर्निंग वॉकला गेले असताना त्यांच्यावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. आज या घटनेला नऊ वर्ष पूर्ण झाली. मात्र अद्याप मारेकरी मोकाट फिरत असून तपास यंत्रणांना अद्याप मारेकरीपर्यंत पोहोचण्यात अपयश आले आहे. मात्र नऊ वर्षांपूर्वी त्यांची हत्या झाल्यानतर कोल्हापूर महानगरपालिका पदाधिकाऱ्यांनी सामाजिक जाणिवेचे तसेच गोविंद पानसरे यांच्या सार्वजिक कार्याचे भान ठेवून त्यांच्या हत्येनंतर झालेल्या शोकसभेत उचित असे स्मारक उभे करण्यात पुढाकार घेईल असे आश्वासन दिले होते. त्यानुसार ३५ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला होता.

कमी पडणारा २५ लाखांचा निधी आमदार सतेज पाटील यांनी जिल्हा नियोजन मंडळातून उपलब्ध करून दिला आणि यातून कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे भव्य स्मारक उभारण्यात आले असून त्याचे लोकार्पण सोहळा आज खासदार शरद पवार यांच्या हस्ते तसेच शाहू छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी या सोहळ्यास भाकपचे जनरल सेक्रेटरी खासदार डी. राजा, राज्याचे जनरल सेक्रेटरी भालचंद्र कानगो, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, डॉ. जयसिंगराव पवार, मेघा पानसरे तसेच कॉ. पानसरे अनुयायी उपस्थित होते.

प्रधानमंत्री केवळ वीस मिनिटांसाठी सभागृहात येतात
कॉम्रेड पानसरे यांच्या स्मारकाच्या लोकार्पणानंतर खासदार शरद पवार यांनी अनुयायांशी संवाद साधताना हा आजचा अत्यंत महत्त्वाचा दिवस असून पानसरे, दाभोळकर यांच्यावर हल्ला करत पुरोगामी विचार संपवण्याचा प्रयत्न काही जणांनी केला. मात्र विचाराची संघर्ष करायचा असेल तर विचाराने करायला हवं मात्र ज्यांच्याकडे विचार नाही, अशा प्रवृत्तीने कायदा हातात घेऊन असा भ्याड हल्ला करू शकतात, हे त्याचे उदाहरण आहे. आज प्रतिगामी शक्ती या वाढत आहेत. ज्यांच्या हातात सत्ता आहे. त्यांना पुरोगामी विचारांची किंचित सुद्धा आस्था नाही.

The post “भ्रष्टाचाऱ्यांचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा”; शरद पवार appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/one-slogan-of-corrupt-people-bjp-is-better-than-jail-sharad-pawar/4077/feed/ 0
कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली https://dailyyashwant.com/ban-on-onion-export-lifted/4050/ https://dailyyashwant.com/ban-on-onion-export-lifted/4050/#respond Sun, 18 Feb 2024 09:04:43 +0000 https://dailyyashwant.com/?p=4050 मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वी लावण्यात आलेला कांद्यावरील निर्यात बंदी उठविण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांच्या समितीने कांद्याच्या निर्यातीला हिरवा झेंडा दाखवला. देशातील कांद्याच्या किंमतींना लगाम घालण्यासाठी सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली होती. 31 मार्च 2024 पर्यंत ही निर्यात बंदी लागू करण्यात आली होती. पण ही मुदत संपण्यापूर्वीच केंद्र […]

The post कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वी लावण्यात आलेला कांद्यावरील निर्यात बंदी उठविण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांच्या समितीने कांद्याच्या निर्यातीला हिरवा झेंडा दाखवला. देशातील कांद्याच्या किंमतींना लगाम घालण्यासाठी सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली होती. 31 मार्च 2024 पर्यंत ही निर्यात बंदी लागू करण्यात आली होती. पण ही मुदत संपण्यापूर्वीच केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदीचा निर्णय हटवला आहे. त्याचा देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.

गुजरात आणि महाराष्ट्रात सध्या कांदाचा मबुलक साठा आहे. त्यामुळे केंद्र सरकारने निर्यातीची परवानगीला मंजुरी दिली. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना देशातील कांद्याचे उत्पादन आणि साठ्याविषयी माहिती दिली. दोघांमधील चर्चेनंतर बंदी हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने 3 लाख मॅट्रिक टन कांदा निर्यातीला मंजूरी दिली आहे. तर बांगलादेशातून 50,000 टन कांद्याच्या निर्यातीला मंजुरी देण्यात आली. या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

 

The post कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/ban-on-onion-export-lifted/4050/feed/ 0
अशोक चव्हाणांबद्दल २०१४ मध्ये मोदी काय म्हणाले होते? https://dailyyashwant.com/what-did-modi-say-about-ashok-chavan-in-2014/3991/ https://dailyyashwant.com/what-did-modi-say-about-ashok-chavan-in-2014/3991/#respond Mon, 12 Feb 2024 13:40:28 +0000 https://dailyyashwant.com/?p=3991 देशातील विरोधकांमागे ईडी आणि सीबीआयचा ससेमीरा सुरू असतानाच देशातील विरोधी पक्षातील नेते सुद्धा एका मागोमाग एक या पद्धतीने भाजपमध्ये सामील होत आहेत. काहींची संस्थात्मक राजकारणासाठी राजकीय अगतिकता, तर काहींची राजकीय सोय यामागे पाहिली जात आहे. मात्र, यामुळे विचारधारा मात्र बासनात गुंडाळून ठेवावी लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशामध्ये ईडी आणि सीबीआयचे धाडसत्र सुरूच आहे. […]

The post अशोक चव्हाणांबद्दल २०१४ मध्ये मोदी काय म्हणाले होते? appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
देशातील विरोधकांमागे ईडी आणि सीबीआयचा ससेमीरा सुरू असतानाच देशातील विरोधी पक्षातील नेते सुद्धा एका मागोमाग एक या पद्धतीने भाजपमध्ये सामील होत आहेत. काहींची संस्थात्मक राजकारणासाठी राजकीय अगतिकता, तर काहींची राजकीय सोय यामागे पाहिली जात आहे. मात्र, यामुळे विचारधारा मात्र बासनात गुंडाळून ठेवावी लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशामध्ये ईडी आणि सीबीआयचे धाडसत्र सुरूच आहे.

मोदी सरकारच्या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळा

केंद्रातील सत्ताधारी मोदी सरकारकडून सातत्याने विरोधकांवर भ्रष्टाचाराचा आणि घराणेशाहीचा आरोप केला जातो. मात्र, त्याच आरोपातील नेते मागच्या दाराने भाजपमध्ये सामील होतात, हे गेल्या काही दिवसांपासून ठळकपणे दिसून येत आहे. काँग्रेस प्रणित युपीएच्या कार्यकाळातील कामकाजावर मोदी सरकारकडून श्वेतपत्रिका सादर करण्यात आली. या श्वेत पत्रिकेमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक गाजलेल्या आदर्श घोटाळ्याचा सुद्धा समावेश होता. मात्र, आता त्याच आदर्श घोटाळ्यातील मुख्य आरोपी म्हणून पाहिले गेले तेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण राजीनामा देताच भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे.

मोदींकडून अशोक चव्हाणांवर टीका

मात्र, तेच अशोक चव्हाण यांचं नाव आदर्श घोटाळ्यात आले त्यावेळी त्यांच्यावर आरोपांची राळ उडवून देण्यात पंतप्रधान मोदींपासून ते राज्यातील भाजप नेतृत्वाने कोणतीही कसर बाकी ठेवली नव्हती. इतकंच नव्हे तर आता 2014 मध्ये पीएम मोदी यांनी केलेले ट्विट सुद्धा आता सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

9 एप्रिल 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशोक चव्हाण यांच्या अनुषंगाने ट्विट करत जोरदार टीका केली होती. अशोक चव्हाण सारख्या घर चोरणाऱ्यांना आपण चौकीदार करणार का? अशी विचारणा त्यांनी सार्वजनिकरित्या केली होती. आता हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालं आहे. आता अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आता ते भाजपवासी होऊन त्यांना केंद्रामध्ये मोठं मंत्रिपद दिलं जाईल, अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे आता एका बाजूने आरोप करायचे आणि दुसऱ्या बाजूने मागचं दार उघड ठेवून त्यांनाच भाजपमध्ये सामील करून घ्यायचं असा आरोप विरोधकांकडून होत आहे. याची चर्चा आता सोशल मीडियामध्ये रंगली आहे.

 

 

The post अशोक चव्हाणांबद्दल २०१४ मध्ये मोदी काय म्हणाले होते? appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/what-did-modi-say-about-ashok-chavan-in-2014/3991/feed/ 0