मनोरंजन Archives - Dainik Yashwant, Latur https://dailyyashwant.com/category/entertainment/ Online Portal Fri, 12 Apr 2024 07:24:46 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.1 सयाजी शिंदे यांच्यावर साताऱ्यात हार्ट सर्जरी, प्रकृती स्थिर https://dailyyashwant.com/sayaji-shinde-underwent-heart-surgery-in-satara-his-condition-is-stable/4330/ https://dailyyashwant.com/sayaji-shinde-underwent-heart-surgery-in-satara-his-condition-is-stable/4330/#respond Fri, 12 Apr 2024 07:24:46 +0000 https://dailyyashwant.com/?p=4330 मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारे लोकप्रिय अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. साताऱ्यात (Satara) त्यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया पार पडली आहे.  काल (11 एप्रिल 2024) छातीत त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सयाजी शिंदे यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना […]

The post सयाजी शिंदे यांच्यावर साताऱ्यात हार्ट सर्जरी, प्रकृती स्थिर appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारे लोकप्रिय अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. साताऱ्यात (Satara) त्यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया पार पडली आहे.  काल (11 एप्रिल 2024) छातीत त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सयाजी शिंदे यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

सयाजी शिंदे यांच्यावर साताऱ्यातील प्रतिभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. सोमनाथ साबळे प्रकृतीबद्दल माहिती देत म्हणाले,”सयाजी शिंदेंना काही दिवसांपूर्वी असवस्थता जाणवत होती. त्यामुळे रुटीन म्हणून त्यांनी काही तपासण्या करुन घेतल्या होत्या. दरम्यान ECG मध्ये काही मायनर चेंजेस सापडले. त्यांच्या हृदयाच्या एका छोट्या भागाची हालचाल थोडी कमी असल्याचं जाणवलं होतं”.

डॉक्टर पुढे म्हणाले,”स्ट्रेस टेस्टही त्यांची करण्यात आली होती. यातही मायनर दोष सापडले. अँजिओग्राफी करण्याचा आम्ही त्यांना सल्ला दिला होता. पण दोन-तीन दिवसांपूर्वी त्यांचं एक शूटिंग रद्द झालं आणि ते साताऱ्यात आले आणि त्यांनी अँजिओग्राफी करण्याचं ठरवलं. हृदयाच्या तीन रक्तवाहिन्यांमधील दोन रक्तवाहिन्या पूर्णपणे नॉर्मल होत्या आणि उजव्या बाजूच्या रक्तवाहिनीमध्ये एक 99 टक्याच्या ब्लॉक आढळला. सयाजी शिंदे यांनी अत्यंत सकारात्मकतेने या सर्व गोष्टी पाहिल्या. हृदयविकाराचा झटका येण्याआधीच ते जागृत होते. आता त्यांची प्रकृती स्थिर असून लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळेल.

सयाजी शिंदे यांच्याबद्दल बोलताना डॉक्टर म्हणाले,”शूटिंगसह सामाजिक उपक्रमांमुळे ते महाराष्ट्रभर फिरत असतात. प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्यात उत्साह असतो. कामात ते स्वत:ला झोकून देतात. पण झोकून देतानाही शरीरातील बदल त्यांनी ओळखले आणि योग्यवेळी त्यांना योग्य उपचार मिळाल्यामुळे ते आता पुन्हा चांगलं काम करू शकतील”.

The post सयाजी शिंदे यांच्यावर साताऱ्यात हार्ट सर्जरी, प्रकृती स्थिर appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/sayaji-shinde-underwent-heart-surgery-in-satara-his-condition-is-stable/4330/feed/ 0
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर https://dailyyashwant.com/sangeet-natak-akademi-award-announced-to-veteran-actor-ashok-saraf/4198/ https://dailyyashwant.com/sangeet-natak-akademi-award-announced-to-veteran-actor-ashok-saraf/4198/#respond Wed, 28 Feb 2024 07:10:10 +0000 https://dailyyashwant.com/?p=4198 गीत, नृत्य, नाट्य क्षेत्रांत अमूल्य योगदान दिल्याबद्दल संगीत नाटक अकादमीतर्फे  दिल्या जाणाऱ्या ​फेलोशिप आणि पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमीच्यावतीने पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत संगीत नाटक अकादमी दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य आणि लोककला क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारांना सन्मानित केले जाते. संगीत नाटक […]

The post ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
गीत, नृत्य, नाट्य क्षेत्रांत अमूल्य योगदान दिल्याबद्दल संगीत नाटक अकादमीतर्फे  दिल्या जाणाऱ्या ​फेलोशिप आणि पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमीच्यावतीने पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत संगीत नाटक अकादमी दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य आणि लोककला क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारांना सन्मानित केले जाते. संगीत नाटक अकादमीतर्फे नृत्य, नाट्य आणि संगीत क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या कलाकारांचा गौरव करण्यात येतो. मंगळवारी रात्री उशिरा  पुरस्कार विजेत्यांची यादी  जाहीर करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील कलाकारांचा समावेश आहे.

संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादी

  1. अशोक सराफ, अभिनय
  2. विजय शामराव चव्हाण, ढोलकीवादक
  3. कलापिनी कोमकली, हिंदुस्तानी शास्त्रीय सगीत
  4. नंदिनी परब गुजर, सुगम संगीत
  5. सिद्धी उपाध्ये, अभिनय
  6. महेश सातारकर, लोकनृत्य
  7. प्रमिला सूर्यवंशी, लावणी
  8. अनुजा झोकरकर, हिंदुस्तानी शास्त्रीय गायक
  9. सारंग कुलकर्णी, सरोद वादक
  10. नागेश आडगावकर, अभंग संगीत
  11. ऋतुजा बागवे, अभिनय
  12. प्रियांका शक्ती ठाकूर, पारंपारिक कला

संगीत नाटक अकादमी पुरस्कार हा पुरस्कार संगीत नाटक अकादमी या कलाक्षेत्रातील सरकारी संस्थेतर्फे देण्यात येणारा पुरस्कार आहे. विविध कलाक्षेत्रातील कलावंतांना देण्यात येणारा हा एक सर्वोच्च भारतीय सन्मान आहे. संगीत, नृत्य अभिनय इतर पारंपरिक समूह नृत्य, आदिवासी नृत्य, संगीत, अभिनय आणि कठपुतळी यांतील योगदानांबद्दल हे पुरस्कार प्रदान केले जातात.

विख्यात शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली यांना संगीत नाटक पुरस्कार जाहीर झाला. तसेच प्रसिद्ध सतार वादक नीलाद्री कुमार यांनाही संगीत नाटक पुरस्कार जाहीर झाला आहे. संगीत नाटक अकादमीच्या वतीने 2023 या वर्षासाठी संगीत, नाटक, नृत्य क्षेत्रातील पुरस्कारांची घोषणा केली आहे. एक लाख रुपये आणि ताम्रपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

कलापिनी कोमकली या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील अलौकिक स्वरतपस्वी पंडित कुमार गंधर्व यांची कन्या आहेत. आपल्याकडे असलेला सुरांचा अलौकिक ठेवा जपतानाच शास्त्रीय संगीतात त्यांनी स्वत:ची गायनशैली घडवली आहे.

The post ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/sangeet-natak-akademi-award-announced-to-veteran-actor-ashok-saraf/4198/feed/ 0
ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचे दीर्घ आजाराने निधन https://dailyyashwant.com/veteran-singer-pankaj-udhas-passed-away-after-prolonged-illness/4156/ https://dailyyashwant.com/veteran-singer-pankaj-udhas-passed-away-after-prolonged-illness/4156/#respond Mon, 26 Feb 2024 11:31:02 +0000 https://dailyyashwant.com/?p=4156 आपल्या जादूई आवाजाने मागील अनेक दशके रसिकांच्या मनावर राज्य करणारे गझल गायक पंकज उधास यांचे दीर्घ आजाराने आज निधन झाले.  ते 72 वर्षांचे होते.  त्यांच्या निधनाबाबतची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली.  पंकज उदास यांनी गायलेली अनेक गाणी, गझल आजही संगीतप्रेमींच्या ओठांवर आहेत. त्यांच्या या निधनावर चित्रपटसृष्टी आणि संगीत क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.   आज सकाळी […]

The post ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचे दीर्घ आजाराने निधन appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
आपल्या जादूई आवाजाने मागील अनेक दशके रसिकांच्या मनावर राज्य करणारे गझल गायक पंकज उधास यांचे दीर्घ आजाराने आज निधन झाले.  ते 72 वर्षांचे होते.  त्यांच्या निधनाबाबतची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली.  पंकज उदास यांनी गायलेली अनेक गाणी, गझल आजही संगीतप्रेमींच्या ओठांवर आहेत. त्यांच्या या निधनावर चित्रपटसृष्टी आणि संगीत क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.   आज सकाळी 11 वाजता ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज उधास यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. (Pankaj Udhas Passed Away)

पंकज उधास यांनी गझल गायकीच्या क्षेत्रात आपले एक स्थान निर्माण केले.  1980 मध्ये आहत नावाच्या अल्बमच्या मार्फत त्यांनी आपल्या यशस्वी कारकीर्दीची सुरुवात केली.  या अल्बमने त्यांना व्यावसायिक यशाचे दरवाजे खुले झाले. पंकज उधास यांचे मुकरार, तरन्नम, मेहफिल आदी गाणी चांगलीच लोकप्रिय झाली.

गझल गायक म्हणून यश मिळवल्यानंतर,  महेश भट्ट यांच्या नाम या चित्रपटात पंकज उधास दिसले होते. चिठ्ठी आयी है या गाण्यातून पंकज उधास घराघरात पोहचले. त्यानंतर अनेक हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. जगभरातील अल्बम आणि लाइव्ह कॉन्सर्टमुळे त्यांना गायक म्हणून प्रसिद्धी मिळाली. 2006 मध्ये संगीत क्षेत्रातील योगदानासाठी पंकज उधास यांना पद्मश्री  या  भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आले.

चांगला मित्र गमावला: सुरेश वाडकर

पंकज उधास यांनी आपल्या गझलने समस्त दुनियेला आनंद दिला. ते आपल्यातून गेले, ही धक्कादायक बातमी आहे. पंकज उधास यांचं जाणं फारच वाईट झालं, त्यांच्या कुटुंबाबत विचार करुन माझ्या अंगावर काटा येतोय. पंकज उधास यांच्या खजाना या अल्बमचं पुन्हा येणार होते.  माझ्या शाळेत त्याच्या रिहर्सल्स सुरु होत्या.  पंकज उधास उच्चशिक्षित होता, इतका मोठा गाणारा माणूस, चांगला मित्र आज आम्ही गमावला. त्यांच्या कुटुंबीयांना इतका मोठा धक्का पचवण्याची शक्ती इश्वर देवो, ही प्रार्थना अशा शब्दात ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी शोक व्यक्त केला.

पंकज उधास यांच्या निधनाने गझलचे मोठे नुकसान : भीमराव पांचाळे

पंकज उधास यांचं जाणं हे गझलचं मोठं नुकसान आहे. आमच्या कमी भेटी झाल्या, पण त्या लक्षात राहणाऱ्या होत्या. खूप मोठा माणूस होता. अतिशय साधा आणि संवादी पद्धतीने गझल सादर करत होते.  त्यांच्या गायकीची वेगळी पद्धत निर्माण झाली होती, ती अतिशय लोकप्रिय होती. त्यांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली. गझल गायक क्षेत्रात खूप संख्या कमी आहे. अन्य गायकांच्या तुलनेत ही संख्या कमी आहे, त्यात असे मोहरे जाणं हे धक्कादायक आहे. आमच्या गझल क्षेत्राचं मोठं नुकसान आहे, अशी प्रतिक्रिया गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी दिली.

पंकज उधास यांची लोकप्रिय गाणी

चिट्टी आयी है…

और आहिस्ता कीजिए बातें….

ना कजरे की धार…

चांदी जैसा रंग है तेरा…

मत कर इतना गुरुर….

आज फिर तुम पर प्यार आया है….

The post ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचे दीर्घ आजाराने निधन appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/veteran-singer-pankaj-udhas-passed-away-after-prolonged-illness/4156/feed/ 0
सुप्रसिद्ध निवेदक अमीन सयानी यांचे निधन https://dailyyashwant.com/renowned-narrator-amin-sayani-passed-away/4091/ https://dailyyashwant.com/renowned-narrator-amin-sayani-passed-away/4091/#respond Wed, 21 Feb 2024 06:54:52 +0000 https://dailyyashwant.com/?p=4091 मुंबई : रेडिओ, विविध भारतीवरील लोकप्रिय अनाऊंसर, निवेदक आणि टॉक शो होस्ट अमीन सयानी यांचं निधन झालं आहे. मंगळवारी संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ९१व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. अमीन सयानी यांचा मुलगा राजिल सयानी यांनी त्यांच्या निधनाचं वृत्त दिलं आहे. अमीन सयानी यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना मुंबईतील एच.एन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात […]

The post सुप्रसिद्ध निवेदक अमीन सयानी यांचे निधन appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
मुंबई : रेडिओ, विविध भारतीवरील लोकप्रिय अनाऊंसर, निवेदक आणि टॉक शो होस्ट अमीन सयानी यांचं निधन झालं आहे. मंगळवारी संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ९१व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. अमीन सयानी यांचा मुलगा राजिल सयानी यांनी त्यांच्या निधनाचं वृत्त दिलं आहे.

अमीन सयानी यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना मुंबईतील एच.एन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. अमीन सयानी यांना उच्च रक्तदाब आणि वृद्धापकाळासंबंधी इतर आजार होते. मागील १२ वर्षांपासून ते पाठीच्या दुखण्याने त्रस्त होते. त्यामुळेच त्यांना चालण्यासाठी वॉकरचा आधार घ्यावा लागत होता. अखेर २० फेब्रुवारी रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

रेडिओ सिलोन आणि विविध भारतीवर जवळपास ४२ वर्ष त्यांच्या हिंदी गाण्यांचा कार्यक्रम ‘बिनाका गीतमाला’ ने अनेक रेकॉर्ड मोडित काढले होते. अमीन सयानी यांना १९५२ मधील गीतमाला शोमधून मोठी लोकप्रियता मिळाली होती. त्यावेळी हा नंबर वन शो होता. १९५२ ते १९९४ पर्यंत शो तुफान गाजला. नंतर २००० ते २००१ आणि २००१ ते २००३ पर्यंत काही बदल करुन शो पुन्हा टेलीकास्ट करण्यात आला होता. त्यांच्या आवाजाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं.

अमीन सयानी यांच्या नावे तब्बल ५४ हजारहून अधिक रेडिओ कार्यक्रम प्रोड्यूस करणं, त्याला आवाज देण्याचा रेकॉर्ड आहे. त्याशिवाय जवळपास १९ हजार जिंगल्सला आजाव देण्यासाठीही अमीन सयानी यांचं नाव लिम्का बुक्स ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवण्यात आलं आहे.

४० ते ४५ वर्षांपूर्वी मुंबईतील रेडिओ स्टूडिओमध्ये बिग बी ऑडिशन देण्यासाठी पोहोचले होते. पण अमिताभ बच्चन त्यांच्या भेटीची वेळ न घेताच त्यांना भेटण्यासाठी पोहोचले होते. त्यामुळेच सयानी यांनी बिग बींना भेटण्यास नकार दिला होता आणि बिग बींचा आवाज न ऐकताच त्यांना रिजेक्ट केलं होतं.

The post सुप्रसिद्ध निवेदक अमीन सयानी यांचे निधन appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/renowned-narrator-amin-sayani-passed-away/4091/feed/ 0
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली दुसऱ्यांदा झाले आईबाबा https://dailyyashwant.com/anushka-sharma-and-virat-kohli-became-parents-for-the-second-time/4079/ https://dailyyashwant.com/anushka-sharma-and-virat-kohli-became-parents-for-the-second-time/4079/#respond Tue, 20 Feb 2024 17:43:17 +0000 https://dailyyashwant.com/?p=4079 मुंबई: अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारताचा क्रिकेटपटू विराट कोहली यांनी दुसऱ्या बाळाचा जन्म दिला असून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी ही आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केली. विरुष्काला दुसरा मुलगा झाला असून त्याचे नाव त्यांनी ‘अकाय’ असे ठेवले आहे. विराटने हार्ट इमोजी पोस्ट करत ही बातमी सर्वांसोबत शेअर केली. सोशल मीडियावर त्यांच्या या पोस्टवर अभिनंदनाचा […]

The post अनुष्का शर्मा आणि विराट कोहली दुसऱ्यांदा झाले आईबाबा appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
मुंबई: अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारताचा क्रिकेटपटू विराट कोहली यांनी दुसऱ्या बाळाचा जन्म दिला असून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी ही आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केली. विरुष्काला दुसरा मुलगा झाला असून त्याचे नाव त्यांनी ‘अकाय’ असे ठेवले आहे. विराटने हार्ट इमोजी पोस्ट करत ही बातमी सर्वांसोबत शेअर केली. सोशल मीडियावर त्यांच्या या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.

The post अनुष्का शर्मा आणि विराट कोहली दुसऱ्यांदा झाले आईबाबा appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/anushka-sharma-and-virat-kohli-became-parents-for-the-second-time/4079/feed/ 0
मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल https://dailyyashwant.com/mithun-chakrabortys-condition-deteriorated-admitted-to-hospital/3936/ https://dailyyashwant.com/mithun-chakrabortys-condition-deteriorated-admitted-to-hospital/3936/#respond Sat, 10 Feb 2024 07:22:01 +0000 https://dailyyashwant.com/?p=3936 ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते आणि राजकारणी मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली आहे. ज्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 10 फेब्रुवारी रोजी कोलकाता येथील रुग्णालयात मिथुन चक्रवर्ती यांना दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखू लागलं आणि अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना कोलकात्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत […]

The post मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते आणि राजकारणी मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली आहे. ज्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 10 फेब्रुवारी रोजी कोलकाता येथील रुग्णालयात मिथुन चक्रवर्ती यांना दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखू लागलं आणि अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना कोलकात्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही अपडेट देण्यात आलेली नाहीत. दुसरीकडे ही बातमी पसरताच मिथुन चक्रवर्ती यांच्या चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मिथुनदा बरे व्हावेत म्हणून त्यांचे चाहते प्रार्थनाही करत आहेत.

मिथुन चक्रवर्ती यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येताच चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. मिथुन चक्रवर्ती यांचा रुग्णालयातील पहिला फोटो देखील समोर आला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रकृती चर्चा सुरु आहे. पण मिथुन चक्रवर्ती यांच्या कुटुंबियांकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रकृतीबद्दल अनेक चर्चा सुरु आहेत. पण रुग्णालयाकडून देखील कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या बातमीनंतर, मिथुनदा यांचे चाहते चिंतेत आहेत आणि त्याच्या प्रकृतीशी संबंधित माहितीची वाट पाहत आहेत आणि ते लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

The post मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/mithun-chakrabortys-condition-deteriorated-admitted-to-hospital/3936/feed/ 0
अजिंठा-वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘वल्ली’ सिनेमाला पुरस्कार https://dailyyashwant.com/award-for-valli-movie-at-ajantha-verul-international-film-festival/3605/ https://dailyyashwant.com/award-for-valli-movie-at-ajantha-verul-international-film-festival/3605/#respond Fri, 12 Jan 2024 02:38:49 +0000 https://dailyyashwant.com/?p=3605 संभाजी नगर : संभाजी नगर या ऐतिहासिक शहरात नामांकित ९वा अजिंठा-वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नुकताच पार पडला. आशुतोष गोवारिकर यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा समारोप झाला. ‘वल्ली’ या मराठी सिनेमाची ‘Indian Competition’ मध्ये अधिकृतरित्या निवड झाली होती. या महोत्सवामध्ये ‘वल्ली’ सिनेमाला तीन पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं आहे. दोन्ही प्रमुख कलाकारांना देवा गाडेकर आणि वर्षा सुनील अजिथ यांना […]

The post अजिंठा-वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘वल्ली’ सिनेमाला पुरस्कार appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
संभाजी नगर : संभाजी नगर या ऐतिहासिक शहरात नामांकित ९वा अजिंठा-वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नुकताच पार पडला. आशुतोष गोवारिकर यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा समारोप झाला. ‘वल्ली’ या मराठी सिनेमाची ‘Indian Competition’ मध्ये अधिकृतरित्या निवड झाली होती. या महोत्सवामध्ये ‘वल्ली’ सिनेमाला तीन पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं आहे. दोन्ही प्रमुख कलाकारांना देवा गाडेकर आणि वर्षा सुनील अजिथ यांना “सर्वोत्कृष्ट अभिनय”साठी सन्मानित करण्यात आलं.

त्याशिवाय पुण्यात १८ ते २५ जानेवारी दरम्यान होणाऱ्या २२व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (PIFF २०२४) ‘वल्ली’ चित्रपट, ‘संत तुकाराम’ सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट स्पर्धा या अंतर्गत निवडला गेला आहे.

The post अजिंठा-वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘वल्ली’ सिनेमाला पुरस्कार appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/award-for-valli-movie-at-ajantha-verul-international-film-festival/3605/feed/ 0
सलमानच्या फार्म हाऊसमध्ये तारा तोडून घुसण्याचा प्रयत्न; दोन तरुणांना अटक https://dailyyashwant.com/an-attempt-to-break-into-salmans-farm-house-by-cutting-the-wires-two-youths-arrested/3547/ https://dailyyashwant.com/an-attempt-to-break-into-salmans-farm-house-by-cutting-the-wires-two-youths-arrested/3547/#respond Mon, 08 Jan 2024 05:26:02 +0000 https://dailyyashwant.com/?p=3547 पनवेल : अभिनेता सलमान खानचं पनवेलचं फार्महाऊस खूप प्रसिद्ध आहे. मात्र त्याच्या फार्महाऊसमध्ये बेकायदा घुसण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तारा तोडून सलमानच्या फार्महाऊसमध्ये घुसण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन तरुणांना सुरक्षारक्षकांनी पकडले आणि पनवेल पोलिसांच्या ताब्यात दिले. या दोघांकडे बनावट आधार कार्ड सापडले असून गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. अजेशकुमार ओमप्रकाश गिल (वय […]

The post सलमानच्या फार्म हाऊसमध्ये तारा तोडून घुसण्याचा प्रयत्न; दोन तरुणांना अटक appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
पनवेल : अभिनेता सलमान खानचं पनवेलचं फार्महाऊस खूप प्रसिद्ध आहे. मात्र त्याच्या फार्महाऊसमध्ये बेकायदा घुसण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तारा तोडून सलमानच्या फार्महाऊसमध्ये घुसण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन तरुणांना सुरक्षारक्षकांनी पकडले आणि पनवेल पोलिसांच्या ताब्यात दिले. या दोघांकडे बनावट आधार कार्ड सापडले असून गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

अजेशकुमार ओमप्रकाश गिल (वय २३) आणि गुरुसेवकसिंग तेजासिंग सीख (वय २३, रा. पंजाब) अशी त्यांची नावे असून त्यांची चौकशी सुरू आहे. दोघांनी 4 जानेवारीला सायंकाळी 4 वाजता वाजे गाव येथील अभिनेता सलमान खान याच्या अर्पिता फार्महाऊसमध्ये तारा आणि झाडांच्या कम्पाऊंडमधून घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी फार्महाऊसच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना पकडले होते. तेव्हा त्या दोन तरूणांनी खोटी नावं सांगितली. महेशकुमार रामनिवास व विनोदकुमार राधेशाम अशी आमची नावं असून उत्तर प्रदेशचे रहिवासी असल्याचे त्यांनी सांगितलं. मात्र त्या सुरक्षारक्षकींना दोघा तरूणांचा संशय आल्याने, त्यांनी पोलिसांना बोलावलं.

त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवत तरूणांची चौकशी केली असता,  त्यांनी आपली खरी नावं सांगितली. त्यानंतर त्यांच्या मोबाईल फोनची तपासणी केली असता दोघांनी आपले छायाचित्रे वापरून बनावट नावाने आधार कार्ड बनवल्याचे आढळले. अखेर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन अटक केली. सलमान खान याला भेटण्यासाठी दोन्ही तरूणांनी घुसखोरीचा हा खटाटोप केल्याचे चौकशीत सांगितले.

The post सलमानच्या फार्म हाऊसमध्ये तारा तोडून घुसण्याचा प्रयत्न; दोन तरुणांना अटक appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/an-attempt-to-break-into-salmans-farm-house-by-cutting-the-wires-two-youths-arrested/3547/feed/ 0
दिवसरात्र दारुच्या नशेत धुंद असायची अभिनेत्री; आता तिच्या सालारने केली 650 कोटींची कमाई https://dailyyashwant.com/the-actress-used-to-be-drunk-day-and-night-now-her-salaar-has-earned-650-crores/3538/ https://dailyyashwant.com/the-actress-used-to-be-drunk-day-and-night-now-her-salaar-has-earned-650-crores/3538/#respond Sun, 07 Jan 2024 13:19:00 +0000 https://dailyyashwant.com/?p=3538 दाक्षिणात्य अभिनेता प्रभास  याचा बहुप्रतिक्षित सिनेमा सालार काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या सिनेमात अभिनेत्री श्रुती हसन मुख्य भूमिकेत आहे. श्रुतीने दाक्षिणात्य सिनेमाबरोबरचं अनेक बॉलिवूड  सिनेमांमध्येही काम केलंय. श्रुती ही दिग्गज अभिनेते कमल हसन आणि सारिका यांची मुलगी असल्याने तिची आणखी ओळख सांगण्याची गरज नाही. मात्र, कमल हसन यांची मुलगी असूनही तिने सिनेक्षेत्रात एक वेगळी ओळख […]

The post दिवसरात्र दारुच्या नशेत धुंद असायची अभिनेत्री; आता तिच्या सालारने केली 650 कोटींची कमाई appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
दाक्षिणात्य अभिनेता प्रभास  याचा बहुप्रतिक्षित सिनेमा सालार काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या सिनेमात अभिनेत्री श्रुती हसन मुख्य भूमिकेत आहे. श्रुतीने दाक्षिणात्य सिनेमाबरोबरचं अनेक बॉलिवूड  सिनेमांमध्येही काम केलंय. श्रुती ही दिग्गज अभिनेते कमल हसन आणि सारिका यांची मुलगी असल्याने तिची आणखी ओळख सांगण्याची गरज नाही. मात्र, कमल हसन यांची मुलगी असूनही तिने सिनेक्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दरम्यान तिने एका मुलाखतीमधून एक मोठा खुलासा केलाय.  (Shruti Hassan)

काय म्हणाली श्रुती हसन? 

श्रुती हसन एका मुलाखतीत म्हणाली की, “सध्या मी फार साधेपणाने आयुष्य जगत आहे. मी गेल्या 8 वर्षांपासून दारुला हात लावलेला नाही.” त्यामुळे श्रुतीचे आयुष्य फार चांगले झाले, असा खुलासा तिने केला आहे. पुढे बोलताना श्रुती म्हणाली, “एक वेळ अशी होती जेव्हा माझे आयुष्य वेगळ्याच वळणावर गेले होते. मी दिवसरात्र नशेतचं राहत होते. मला मित्रांसमवेत दारु पिण्याची इच्छा होत होती. मात्र, त्यानंतर मी स्वत:मध्ये अनेक बदल केले. आता मला कशाचाही पश्चाताप होत नाही. हँगओव्हरही नसतो आणि सर्वकाही शांत आणि चांगले राहते. मला वाटते की आयुष्यभर अशाच पद्धतीने राहावे.”

8 वर्षांपासून दारुला हात लावलेला नाही 

मी कधीही ड्रग्सला हात लावलेला नाही. मात्र, एक वेळ अशी होती की, दारु माझ्या आयुष्याचा भाग बनली होती. दिवसरात्र दारुच्या नशेत राहत होते, असेही तिने आवर्जुन सांगितले. पुढे बोलताना श्रुती म्हणाली (Shruti Hassan), “जेव्हा तुम्ही सातत्याने दारु पिणाऱ्या लोकांच्या पार्टीमध्ये जात असतात. तेव्हा त्या व्यसनातून बाहेर पडणे फार कठीण असते.”

दारु पिण्यासाठी बोलावणाऱ्या लोकांपासून दूर झाले 

श्रुती म्हणाली, मी मला दारु पिण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या आणि सातत्याने पार्टी करणाऱ्या लोकांपासून दूर झाले. त्यामुळे तिला दारूच्या व्यसनातून बाहेर पडता आले. सध्या तिचा सालार हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात ती प्रभास आमि पृथ्वीराज सुकूमारन सोबत दिसत आहे. सध्या सालार हा सिनेमा तुफान कमाई करत आहे.

The post दिवसरात्र दारुच्या नशेत धुंद असायची अभिनेत्री; आता तिच्या सालारने केली 650 कोटींची कमाई appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/the-actress-used-to-be-drunk-day-and-night-now-her-salaar-has-earned-650-crores/3538/feed/ 0
मामा, दादा ही नाती घरीच ठेवा, व्यासपीठावर एकमेकांना मान द्या https://dailyyashwant.com/keep-the-relation-of-uncle-and-grandfather-at-home-respect-each-other-on-the-platform/3534/ https://dailyyashwant.com/keep-the-relation-of-uncle-and-grandfather-at-home-respect-each-other-on-the-platform/3534/#respond Sun, 07 Jan 2024 11:22:29 +0000 https://dailyyashwant.com/?p=3534 पुणे : 100 व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी राज ठाकरे यांनी त्यांच्या नाटकाविषयीच्या प्रेमाबद्दल भाष्य केलं. नाटक पाहिलेला माणूस हा महाराष्ट्रात नाही असं होणारच नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. जसं आमच्या भाषणाला रिटेक नाही, तसं नाटकाला ही रिटेक नसतो. खरं तर हल्ली सकाळी सकाळी बातमी पाहिली की म्हणावं वाटतं की […]

The post मामा, दादा ही नाती घरीच ठेवा, व्यासपीठावर एकमेकांना मान द्या appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
पुणे : 100 व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी राज ठाकरे यांनी त्यांच्या नाटकाविषयीच्या प्रेमाबद्दल भाष्य केलं. नाटक पाहिलेला माणूस हा महाराष्ट्रात नाही असं होणारच नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. जसं आमच्या भाषणाला रिटेक नाही, तसं नाटकाला ही रिटेक नसतो. खरं तर हल्ली सकाळी सकाळी बातमी पाहिली की म्हणावं वाटतं की थोडं रिटेक घ्या, असं म्हणत राज ठाकरे यांनी खोचक टोला लगावला. या मुलाखतीदरम्यान राज ठाकरे यांनी मराठी कलाकरांचे कान टोचलेत. मराठी कलाकरांनी व्यासपीठावर,चारचौघात एकमेकांना मान द्यायलाच हवा असं राज ठाकरे यांनी म्हटलं.   (100th Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan News)

पुण्यात 100 व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलानाचे आयोजन करण्यात आले आहे. या नाट्यसंमेलानादरम्यान दीपक करंजीकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीदरम्यान राज ठाकरे यांनी त्यांच्या नाटकाच्या प्रेमाविषयी भाष्य केलं. तसेच त्यांनी मराठी कलाकरांना देखील सल्ले दिले. खरं तर मला हुरहूर होती, की दुपारच्या जेवणानंतर मंचासमोर कोणी असेल का? की फक्त प्रश्न-उत्तरं होतील असं वाटलं होतं. पण तुम्ही उपस्थित आहात, त्याबद्दल आभार. आता विषय काय आहे, “नाटक आणि मी” त्यापेक्षा “मी आणि माझी नाटकं” असा विषय असता तर तो विषय खूप रंगला असता, मात्र आयोजकांना त्यात रसचं नाही. आता नाटक म्हणून माझी मुलाखत घ्यावी इतकं माझ्यात काही नाही, फक्त नाटक एवढंच माझ्यात आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

मराठी माणूस महाराष्ट्राचा इतिहास विसरतोय

आपला मराठी माणूस हा महाराष्ट्राचा इतिहास विसरला आहे. खरं तर आपण राज्यकर्ते होतो आपण, देशाचा पंतप्रधान मराठा साम्राज्याने बसवला. आपण सगळे जातीपातीत भांडत बसलोय. आता ही जात पात फक्त राजकारणात नाही तर नाटकात, शाळेत ठिकठिकाणी आलेली आहे. हे दुर्दैव आहे.

मराठी कलाकरांनी एकमेकांना मान द्यायलाच हवा

मराठी कलाकारांनी एकमेकांना मान द्यायला हवा. पहिली आणि शेवटची गोष्ट तुम्ही कलाकारांनी एकमेकांना मान दिला नाही अन नको त्या नावाने एकमेकांना हाका देत बसलात तर मराठी चित्रपटसृष्टीतून एक ही स्टार निर्माण होणार नाही. इतर राज्यातील कलाकारांकडे बघा. रजनीकांत आणि इलाहीराजा रात्री एकत्र बसून दारू बसत असतील, मात्र मंचावर आले की ते एकमेकांना सर म्हणून आदर देतात. मराठी कलावंतांनी याचं अनुकरण करायला हवं. मानसन्मान द्या. तुम्ही जर नाक्यावर उभं राहिला तर तुम्हाला कोणी पैसे देऊन पाहायला येणार नाही. आज अशोक सराफ हे चौकात उभे राहिल्याचे दिसले नाहीत, म्हणून मी पैसे मोजूनचं त्यांना पाहायला जाईन. आता इथं प्रशांत दामले अध्यक्ष आहेत. आता मी चार भिंतीत त्यांना काहीही म्हणेन, मात्र इथं मी त्यांना सर म्हणेन. आता अशोक सराफांना हे काय म्हणतात मामा, अरे तुझा काय सख्खा मामा आहे का? अरे सर म्हणा ना? आता शरद पवार इथं आले तर मी त्यांना वाकून नमस्कार करेन, कारण ते वरिष्ठ नेते आहेत.  माझ्या भाषणात मी त्यांच्यावर बोलेन मात्र समोर आल्यावर त्यांचा त्यांना मानसन्मान देईनच. त्यामुळं मराठा कलावंतांनी ही गोष्ट पाळायला हवी, असं म्हणत राज ठाकरे यांनी मराठी कलावंतांचे कान टोचलेत.

तर सासू सूनेत खरी भांडणं होतील

मला निवडणूक लढायला लाज वाटते. कारण गेली 70 वर्षे काय तर माझे आजोबा, काका जे बोलले आज मी ही तेच बोलतोय. अरे तेच ते विषय, मग आपण पुढं कधी जाणार? नाटक, कलाकार, साहित्यिक हे नसते तर कधीच अराजकता आली असती. कारण लोक तुमच्यात गुंतून पडला त्यामुळं दुसरीकडे दुर्लक्ष झालं. तुम्ही जर रात्रीच्या मालिका बंद केल्या तर सासू सुनांमध्ये खरी भांडणं होतील. म्हणून तुमचे आभार, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

महाराष्ट्राचा भूगोल धोक्यात, पहिला रायगड बरबाद होणार

राज ठाकरे म्हणाले की, रायगड जिल्हा पहिला बरबाद होणार. बाहेरचे लोक येतात, जमिनी घेतातयत आणि मालक होणार. त्यामुळे रायगडचे लोक इथे नोकर होणार. न्हावा शेवा शिवडी सीलिंकने रायगडचं वाटोळं होणार. या आधी मी पुण्याबद्दल तसं सांगितलं होतं, आता तेच होतंय.

बुलेट ट्रेनची गरज काय हे मला अजूनही कळालं नाही. दोन तासामध्ये मुंबईमधून अहमदाबादला जाण्याने कुणाचा फायदा होणार आहे? त्यासाठी एक लाख कोटी रपये कशाला खर्च करायला पाहिजे? असा प्रश्नही त्यांनी विचारला.

महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गीय समाजाने सर्व ठिकाणी पुढे आले पाहिजे, राजकारण असो वा समाजकारण असो त्यामध्ये मध्यमवर्गाने भाग घेतला पाहिजे. कारण महाराष्ट्राने या देशाला दिशा दिली. देशातल्या सर्व विचारांना महाराष्ट्राने जन्म दिला. जातीपाती आणि इतर गोष्टींमध्ये आपण बरबटून जाण्यापेक्षा आपण सुज्ञ झाले पाहीजे असं राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्र एकसंध राहू नये म्हणून सर्वजण प्रयत्न करत आहेत, आज जे काही जातीपातीच्या नावावर सुरू आहे त्यामागे कुणीतरी वेगळेच आहेत असं राज ठाकरे म्हणाले. जसं आमच्या भाषणाला रिटेक नाही, तसं नाटकाला ही रिटेक नसतो. खरं तर हल्ली सकाळी सकाळी बातमी पाहिली की म्हणावं वाटतं की थोडं रिटेक घ्या असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.

नाटकात आणि शाळेतही जातीपातीचं राजकारण

आपला मराठी माणूस हा महाराष्ट्राचा इतिहास विसरला आहे. खरं तर आपण राज्यकर्ते होतो आपण, देशाचा पंतप्रधान मराठा साम्राज्याने बसवला. आता आपण सगळे जातीपातीत भांडत बसलोय. आता ही जातपात फक्त राजकारणात नाही तर नाटकात, शाळेत ठिकठिकाणी आलेली आहे हे दुर्दैव आहे.

 

The post मामा, दादा ही नाती घरीच ठेवा, व्यासपीठावर एकमेकांना मान द्या appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/keep-the-relation-of-uncle-and-grandfather-at-home-respect-each-other-on-the-platform/3534/feed/ 0